हिमाचलमध्ये मतदारांनी कायम राखली 40 वर्षांची पंरपरा, तर गुजरातमध्ये भाजपने रचला इतिहास

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. हिमाचलमध्ये मतदारांनी ४० वर्षांची पंरपरा कायम राखली आहे.

हिमाचलमध्ये मतदारांनी कायम राखली 40 वर्षांची पंरपरा, तर गुजरातमध्ये भाजपने रचला इतिहास
Gujrat election result 2022
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 3:50 PM

Election Result 2022 : गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची जादू कायम आहे. कारण येथे भाजप सातव्यांदा सत्तेत आली आहे. भाजपने सातव्यांदा सत्ता काबिज करत इतिहास रचला आहे.तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये मतदारांनी पंरपरा कायम ठेवली आहे. येथील मतदारांनी काँग्रेसच्या (Congress) बाजुने मतदान केलं आहे.

गुजरातमध्ये काँग्रेसला फटका

गुजरातमध्ये भाजपने (BJP) सगळ्यांचा सुपडा साफ केला आहे. गुजरातमध्ये 2002 च्या निवडणुकीत (Gujrat Election Result) भाजपने 127 जागांवर विजय मिळवला होता. तेव्हा नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री होते. 1985 मध्ये काँग्रेसने राज्यामध्ये 149 जागा जिंकून रेकॉर्ड केला होता. तेव्हा माधव सिंह हे मुख्यमंत्री होते.

हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal pradesh election result) सुरुवातीला कांटे की टक्कर दिसत होती. पण नंतर काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठत विजय जवळपास निश्चित केला आहे. गेल्या चार दशकात येथे कोणताही पक्ष दुसऱ्यांदा सत्तेत आलेला नाही. तिच पंरपरा यंदा ही मतदारांनी कायम ठेवली आहे.1985 नंतर कोणत्याही पक्षाने येथे पुन्हा सत्ता मिळवली नाही.

मोदींची जादू कायम

गुजरात निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी एकूण 30 सभा घेतल्या होत्या. याचा फायदा भाजपला झाला. 1995 पासून सलग 27 वर्षे भाजप येते सत्तेत आहे. काँग्रेसला येथे पुन्हा सत्तेत येता आलेलं नाही. काँग्रेस पक्ष यंदाच्या निवडणुकीत आणखी मागे पडलाय. येथे आप भाजपला आव्हान देईल असं बोललं जात होतं. पण तसं झालेलं नाही. आपला देखील येथे काही खास कामगिरी करता आलेली नाही.

भाजपकडून देशभरात जल्लोष

गुजरातमध्ये मिळालेल्या विजयानंतर भाजपकडून जल्लोष (BJP Celebration) केला जात आहे. कारण गुजरातमध्ये जर भाजपला अपेक्षित मत मिळालं नसतं तर त्याचा थेट संदर्भ हा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाशी जोडला गेला असता. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत देखील याचा फटका भाजपला बसला असता.मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल दुसर्‍यांदा मुख्यमंत्री होणार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.