Breaking : वारीस पठाण यांना इंदुरमध्ये काळं फासलं? पठाण यांनी दावा फेटाळला, मग नेमकं काय घडलं?

आपण एका दर्ग्यात गेलो होतो. तिथे चादर पेश केली. तिथे काही तरुणांनी आपलं हार घालून स्वागत गेलं. तसंच एका तरुणानं नजर लागू नये म्हणून लहान मुलांना लावतात ते काजळ लावलं होतं. पण सगळ्या इंदुरमध्ये असं काजळ लावून कसं फिरणार म्हणून मी एका ठिकाणी बसून ते धुतलं. मात्र, काँग्रेसवाल्यांनी तेव्हा फोटो काढून काळं फासल्याची अफवा उठवल्याचा दावा पठाण यांनी केलाय. तसंच काँग्रेस घाबरली आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय.

Breaking : वारीस पठाण यांना इंदुरमध्ये काळं फासलं? पठाण यांनी दावा फेटाळला, मग नेमकं काय घडलं?
वारीस पठाण यांनी शाई फेक झाल्याचा आरोप फेटाळला
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 5:12 PM

मुंबई : ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एआयएमआयएमचे (AIMIM) माजी आमदार आणि नेते वारीस पठाण (Waris Pathan) यांना काळं फासल्याचा दावा करत एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. वारीस पठाण हे सध्या मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदुरच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी एका तरुणानं वारीस पठाण यांना काळं फासल्याचं बोललं जात आहे. मात्र, याबाबत वारीस पठाण यांनाच विचारलं असता अशी कुठलीही घटना घडली नसल्याचं त्यांनी सांगितलं. आपण एका दर्ग्यात गेलो होतो. तिथे चादर पेश केली. तिथे काही तरुणांनी आपलं हार घालून स्वागत गेलं. तसंच एका तरुणानं नजर लागू नये म्हणून लहान मुलांना लावतात ते काजळ लावलं होतं. पण सगळ्या इंदुरमध्ये असं काजळ लावून कसं फिरणार म्हणून मी एका ठिकाणी बसून ते धुतलं. मात्र, काँग्रेसवाल्यांनी तेव्हा फोटो काढून काळं फासल्याची अफवा उठवल्याचा दावा पठाण यांनी केलाय. तसंच काँग्रेस घाबरली आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

दरम्यान, वारीस पठाण यांनी आपल्याला काळं फासल्याचा दावा फेटाळून लावला असला तरी व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण त्यांना काळ फासून पळाल्याचं पाहायला मिळत आहे. वारीस पठाण जेव्हा दर्गाहवर चादर चढवून बाहेर येतात. त्यावेळी काही लोक तिथे उभे असतात. त्यातील एकजण त्यांना हार घालतो आणि काळं फासून पळतो. तेव्हा तिथे असलेले अन्य काही जण त्या तरुणाला पकडा असा आवाज करताना दिसत आहेत, व्हिडीओमध्ये तो गोंधळ ऐकायलाही मिळत आहे. त्यामुळे वारीस पठाण यांनी आपल्याला काळं फासलं गेलं नाही तर काजळ लावल्याचा दावा किती खरा आहे, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पोलिसांचा दावा काय?

वारीस पठाण हे इंदुरच्या खरराना दर्गाह इथे गेले होते. त्यावेळी ते दर्गाहवर चादर चढवण्यासाठी गेले. तिथून बाहेर पडताना एका तरुणाने वारीस पठाण यांना काळ फासलं आणि त्याने तिथून पळ काढला. मात्र, पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. हिंदी वृत्त वाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खजराना ठाण्याचे प्रभारी दिनेश कुमार वर्मा यांनी सांगितलं की अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव सद्दाम पटेल असं आहे. तो 320 वर्षाचा आहे. तो पेशाने मजदूर आहे. प्राथमिक चौकशीदरम्यान या तरुणाने सांगितलं की मला वारीस पठाण ही व्यक्ती आवडत नाही. कारण ती सातत्याने देशविरोधी वक्तव्ये करत असतात आणि मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचं काम करतात.

इतर बातम्या :

Hindustani Bhau : टपाटप? टपाटप? 3 दिवसांची पोलीस कोठडी, हिंदुस्तानी भाऊसोबत पोलीस काय करणार?

Budget 2022: अजित पवार म्हणतात, महाराष्ट्राच्या वाट्याला काय हे सापडणे कठिण; चव्हाण म्हणाले, नव्या स्वप्नांचे गाजर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.