Washim ZP Election : वाशिम जिल्हा परिषद निवडणुकीत पंचरंगी सामना, लढत कशी होणार? वाचा सविस्तर

महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीत जिल्हापरिषदेच्या काही जागांवर मतैक्य न झाल्याने आता ही निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवाराच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. या पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,भाजपा आणि वंचित जनविकास आघाडी समोरासमोर असल्याचं पंचरंगी सामना होण्याची शक्यता आहे.

Washim ZP Election : वाशिम जिल्हा परिषद निवडणुकीत पंचरंगी सामना, लढत कशी होणार? वाचा सविस्तर
वाशिम जिल्हा परिषद इमारत
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 5:20 PM

वाशिम : जिल्हा परिषदेच्या 14 आणि पंचायत समित्यांच्या 27 जागांच्या पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमा वरील स्थगिती निवडणूक आयोगाने उठविली आहे. नव्याने जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 5 ऑक्टोबर रोजी मतदान, तर 6 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीत जिल्हापरिषदेच्या काही जागांवर मतैक्य न झाल्याने आता ही निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवाराच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. या पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,भाजपा आणि वंचित जनविकास आघाडी समोरासमोर असल्याचं पंचरंगी सामना होण्याची शक्यता आहे. (Washim Zilla Parishad By-Election Political Status)

जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर पडण्यापूर्वी 5 जुलै रोजी पोटनिवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवस अखेर पर्यंत जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी 107 उमेदवाराचे 123 अर्ज दाखल झाले आहेत. तर पंचायत समितींच्या 27 जागांसाठी 180 उमेदवाराचे 197 अर्ज दाखल केले होते. आता वैध उमेदवार अर्ज पडताळणी 21 सप्टेंबर रोजी होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक ओबीसी आरक्षण होत असल्याच्या दाखल याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण रद्द केलं आहे. ओबीसी प्रवर्गातील सदस्यांची पदे रिक्त करून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता.त्यानुसार जिल्हा परिषदेच्या 14 गट आणि पंचायत समित्यांच्या 27 गणांसाठी 5 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होत आहे.

पोटनिवडणूक अटीतटीची होणार

जिल्हा परिषदेवर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत स्थान देत महविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद होते. पोटॉनिवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या गटातून वंचित बहूजन आघाडीचे 4, राष्ट्रवादी काँग्रेसचे 3, भाजपा 2, जनविकास आघाडी 2 आणि काँग्रेस , शिवसेनेचा प्रत्येकी 1, अपक्ष 1 असे सदस्य निवडूण आले होते. मात्र ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आल्याने ह्या जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळं या सर्व जागांसाठी 5 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुक होत आहे. या निवडणुकीत केवळ वंचित व जनविकास आघाडीची युती झाली आहे. तर राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेमध्ये जागांवरून मतभेद असल्यानं आघाडीत बिघाडी झाली असून त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे बोलले जाते.

वाशिम जिल्हा परिषदेत राजकीय पक्षांचं बलाबल काय?

ओबीसी आरक्षण रद्द होण्यापूर्वी वाशिम जिल्ह्यातील 52 जिल्हा परिषद सदस्य संख्या असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे 12, काँग्रेस 10, वंचित 8, भाजपा 7, वाशिम जिल्हा जनविकास आघाडी 7, शिवसेना 6, स्वाभिमानी शेतकरी संघटना 1 व अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल होत. त्यात न्यायालयाच्या आदेशाने इतर मागास प्रवर्गाच्या 14 जागा रिक्त झाल्या आहेत. वंचीत बहुजन आघाडीच्या चार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन, भाजप व जन विकास आघाडीच्या प्रत्येकी दोन, काँग्रेस व शिवसेनेची प्रत्येकी एक तर अपक्षाची एक जागा रिक्त झालेत. त्यामुळं या जागेवर पोटनिवडणुकीला समोर जावं लागतं आहे.

अनेक सभापतींचं राजकीय अस्तित्व पणाला

जिल्ह्यातील काटा, पार्डी टकमोर, उकळी पेन, पांगरी नवघरे, कवठा खुर्द, गोभणी, भर जहागीर, दाभा, कंझरा, आसेगाव, भामदेवी, कुपटा, तळप बु., फुलउमरी या जिल्हा परिषद गटात पोटनिवडणूक होत आहे. या मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जि.प. अर्थ व बांधकाम सभापती विजय खानझोडे, महिला व बालकल्याण सभापती शोभा गावंडे, रिसोड पंचायत समितीच्या सभापती गीता हरिमकर या पदाधिकाऱ्यांना पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. या निवडणुकीत पदाधिकाऱ्याचे राजकीय अस्तित्व पणाला लागल्याने ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

इतर बातम्या :

अतुल भातखळकरांचं डोकं ठिकाणावर नाही, मनिषा कांयदेंचा पलटवार

माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल तर राजीनामा देतो; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान

Washim Zilla Parishad By-Election Political Status

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.