Eknath Shinde : NDA च्या आजच्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले….

Eknath Shinde : भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच सरकार येणार हे स्पष्ट आहे. आज एनडीएची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. या बैठकीला जाण्याआधी एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला.

Eknath Shinde : NDA च्या आजच्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले....
CM Eknath Shinde
Follow us
| Updated on: Jun 07, 2024 | 11:34 AM

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे NDA चे नेते आहेत. शिवसेना भाजपाच नातं खूप जुनं आहे. विचारधारा एक आहे. आम्ही सुरुवातीपासून भाजपा एनडीए बरोबर कायम आहोत. आमचा पाठिंबा त्यांना आहे. आज एनडीएच्या संसदीय पक्षाची बैठक आहे. परवाच्या बैठकीत सर्व घटक पक्षांनी सर्वानुमते नरेंद्र मोदी यांना एनडीएच्या संसदीय पक्षाच नेता म्हणून निवडलं” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. “पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पहिली बैठक होत आहे. ही महत्त्वाची बैठक आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनावेत, हे सर्व देशवासियांच स्वप्न साकार होईल” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

“विरोधी पक्ष अपयशी ठरले. मोदी हटाव बोलणाऱ्यांना जनतेने हटवलं. बहुमत एनडीएला दिलं. ही अभिमानाची बाब आहे. आमची आघाडी मोदींसोबत आहे. त्यांचे हात मजबूत करणार. 10 वर्षात काम करुन दाखवलं. अजून पाच वर्ष संधी मिळालीय. ही अभिमानाची बाब आहे. मागच्या 10 वर्षात देशाचा जेवढा विकास झाला, तेवढा मागच्या 50-60 वर्षात झालेला नाही” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

जनतेने त्यांनाच तडीपार केलय

“नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनणार हा ऐतिहासिक क्षण आहे. मोदींना पंतप्रधान बनवायचा आमचा उद्देश आहे, तो यशस्वी होतोय. मोदींना तडीपार करा बोलणाऱ्यांना जनतेने तडीपार केलय” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.