तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार, भाजपची शिवसेनेला सर्वात मोठी ऑफर

चंद्रकांत पाटील म्हणाले, "आमची वाघाशी दोस्ती आहेच. उद्धव ठाकरे म्हणातात त्यांचं मोदीजींशी जमतं, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी जमतं नाही. का ते माहीत नाही. पण वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत"

तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार, भाजपची शिवसेनेला सर्वात मोठी ऑफर
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jun 09, 2021 | 6:41 PM

पुणे : “वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत. आमची दुश्मनी कधीच नव्हती. आमच्या नेत्याची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा असते. जर मोदीजींनी तशी इच्छा व्यक्त केली, तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही तयार आहेच”, असं स्पष्ट आणि थेट विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं. ते पुण्यात (Pune) बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत झालेली बंद दाराआढ बैठकीनंतर, चंद्रकांत पाटलांच्या या विधानाला महत्तवं आहे. (We are always ready to do friendship with tiger BJPs Chandrakant Patils open offer to Shiv Sena after Uddhav Thackeray meet Narendra Modi)

चंद्रकांत पाटील म्हणाले, “आमची वाघाशी दोस्ती आहेच. उद्धव ठाकरे म्हणातात त्यांचं मोदीजींशी जमतं, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी जमतं नाही. का ते माहीत नाही. पण वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत”.

पुण्यातील एका कार्यक्रमात वन्यजीव अभ्यासक अनुज खरे यांनी चंद्रकांत पाटील यांना वाघाची प्रतिकृती भेट दिली. त्याचा संदर्भ घेऊन चंद्रकांत पाटील बोलले.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले? 

वाघाशी दोस्ती करावी यासाठी मला वाघ भेट दिला, पण वाघाशी आमची दुश्मनी कधीच नव्हती. उद्धवजीं जुनी मैत्री मोदीजींशी आहे असं सांगितलं. त्यांचं म्हणणं फडणवीस-पाटलांशी जमत नाही. इकडे दोस्ती असती तर 18 महिन्यापूर्वीच सरकार आलं असतं. मोदींनी जर सांगितलं, त्यांची इच्छा असेल तर त्यांची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा. मोदींजींनी आदेश दिल्यावर काय वाटेल ते करु. जरी भाजप-शिवसेनेचं सरकार आलं, असं मी म्हणत नाही, पण तुम्ही ज्या चर्चा करताय, त्यानुसार जरी सरकार आलं तरी निवडणुका वेगळ्याच होणार, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

ठाकरे-मोदी भेटीवर प्रतिक्रिया

यावेळी चंद्रकात पाटील यांनी ठाकरे-मोदी भेटीवरही भाष्य केलं. “दोन व्यक्तींची भेट झाली त्यात काय चर्चा झाली ते आपल्याला कसं समजणार”, असं ते म्हणाले. शिवाय 12 आमदारांचा प्रश्न मोदींचा नव्हे तर राज्याचा असल्याचंही चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

मराठा आरक्षणावरुन दिशाभूल

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील मराठा समाजाची दिशाभूल केली जातेय, पंतप्रधानाकडे यासंदर्भात काहीच नाही. मराठा समाज हा मागास आहे हे आधी ठरवावं लागेल. राज्य सरकारकडून धूळफेक सुरू आहे, असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या सवलती मराठा समाजाला दिल्यात त्या तरी द्या, अशी मागणीही त्यांनी केली. ओबीसींचे राजकीय आरक्षण गेलं ते फक्त महाराष्ट्रात गेलं त्याला मोदी काय करणार असाही सवाल त्यांनी केला.

VIDEO : चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

संबंधित बातम्या 

उद्धव ठाकरे- नरेंद्र मोदी भेटीचे तीन अर्थ, फडणवीस-पवार भेटीशी संबंध आहे का?

‘ते’ दुखणं कायमचं दूर करु, मुख्यमंत्र्यांसमोर अजित पवारांचा पंतप्रधान मोदींना शब्द

मराठा आरक्षण ते मेट्रो कारशेड, मुख्यमंत्र्यांनी मोदींपुढे मांडल्या 12 मागण्या; वाचा सविस्तर

(We are always ready to do friendship with tiger BJPs Chandrakant Patils open offer to Shiv Sena after Uddhav Thackeray meet Narendra Modi)

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.