Eknath Shinde : आम्ही पाठिंबा काढतोय, सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगा; शिंदे गटाचं राज्यपालांना पत्रं?

Eknath Shinde : एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. कोर्टातील याचिकेतही त्यांनी शिवसेनेच्या 39 आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढल्याचा दावा केला आहे.

Eknath Shinde : आम्ही पाठिंबा काढतोय, सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगा; शिंदे गटाचं राज्यपालांना पत्रं?
आम्ही पाठिंबा काढतोय, सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगा; शिंदे गटाचं राज्यपालांना पत्रंImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 12:38 PM

नवी दिल्ली: राज्यातील ठाकरे सरकारसाठी अत्यंत धक्कादायक बातमी आहे. तब्बल आठ दिवसानंतर अखेर एकनाथ शिंदे गटाने ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला आहे. शिंदे गटाने (Eknath Shinde) तसं पत्रंच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagatsingh koshyari) यांना दिलं असल्याचं कळतंय. आम्ही 39 आमदार ठाकरे सरकारचा (maha vikas aghadi)पाठिंबा काढत आहोत. त्यामुळे सरकार अल्पमतात आलं असून सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगा, असं पत्रंच शिंदे गटानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे आता राज्यातील सत्तेच्या हालचालीचं केंद्र राजभवनावर केंद्रीत झालं आहे. शिंदे गटाच्या या पत्रानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय निर्णय घेतात याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. तर महाविकास आघाडीचे नेते काय भूमिका घेतात याकडेही सर्वच देशाचं लक्ष लागलं आहे. या राजकीय घडामोडी घडत असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानीही हालचाली वाढल्या आहेत.

एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. कोर्टातील याचिकेतही त्यांनी शिवसेनेच्या 39 आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सरकार अल्पमतात आलं आहे, असं शिंदे गटाने याचिकेत म्हटलं आहे. कोर्टात या मुद्द्यावर सुनावणी सुरू असतानाच आता शिंदे गटाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पत्रं पाठवून आम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचं म्हटलं आहे,  असं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष

दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे शिंदे गटाने पाठिंबा काढून घेतल्याचं पत्रं दिलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे राज्यपाल काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यपाल या पत्रावर तात्काळ कार्यवाही करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करायला सांगतात की कोर्टात याच मुद्द्यावर सुनावणी सुरू असल्याने कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिंदे गटाचा स्ट्राँग युक्तिवाद

मविआने बहुमत गमावलं आहे. सेनेच्या 39 आमदारांनी पाठिंबा काढला आहे. 39 आमदार हीच शिवसेना आहे, असं या याचिकेत म्हटलं आहे. त्यात त्यांनी कुठेही आपला गट असल्याचा उल्लेख केला नाही. सत्तेसाठी मविआकडून अधिकाराचा गैरवापर केला जात आहे. तो थांबवला जावा. विधानसभेच्या उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आहे. त्यामुळे त्यांना कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असा दावाही शिंदे गटाने कोर्टात केला आहे.

शिवसेनेचे कोण कोण आमदार शिंदेंसोबत?

एकनाथ शिंदे शहाजी पाटील अब्दुल सत्तार शंभुराज देसाई अनिल बाबर तानाजी सावंत संदीपान भुमरे चिमणराव पाटील प्रकाश सुर्वे भरत गोगावले विश्वनाथ भोईर संजय गायकवाड प्रताप सरनाईक राजकुमार पटेल राजेंद्र पाटील महेंद्र दळवी महेंद्र थोरवे प्रदीप जयस्वाल ज्ञानराज चौगुले श्रीनिवास वनगा महेश शिंदे संजय रायमूलकर बालाजी कल्याणकर शांताराम मोरे संजय शिरसाट गुलाबराव पाटील प्रकाश आबिटकर योगेश कदम आशिष जयस्वाल सदा सरवणकर मंगेश कुडाळकर दीपक केसरकर यामिनी जाधव लता सोनावणे किशोरी पाटील रमेश बोरणारे सुहासे कांदे बालाजी किणीकर उदय सामंत

अपक्ष कोण कोण शिंदेंसोबत?

बच्चू कडू राजकुमार पटेल राजेंद्र यड्रावकर चंद्रकांत पाटील नरेंद्र भोंडेकर किशोर जोरगेवार मंजुळा गावित विनोद अग्रवाल गीता जैन

राज्यातील परिस्थिती काय?

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या एकूण जागा : 288 सत्ता स्थापनेसाठी किती जागांची गरज : 145 एकनाथ शिंदेंकडे सध्या किती आमदार : 48 भाजपचं संख्याबळ किती : 106 शिवसेनेचं 2019मध्ये निवडून आलेले आमदार किती : 56 शिवसेनेचे आता फुटलेले आमदार किती : 39 शिवसेनेचे आमदार फुटल्यामुळे शिवसेनेकचे आता किती आमदार : 15 काँग्रेसकडे किती आमदार? : 44 राष्ट्रवादीकडे किती आमदार? : 55 (मलिक देशमुख तुरुंगात असल्यामुळे सध्या 53) महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना असलेलं संख्याबळ : 169 शिवसेना आमदार फुटल्यामुळे महाविकास आघाडीचं संख्याबळ किती झालं? : 121

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.