आम्ही मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करणारच, तशा आम्हाला पवार साहेबांच्या सूचना – आव्हाड

भाजपमधील काही नेते देखील वारवांर महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचा दावा करत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी कायम एकत्र राहणार आणि लढणार असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

आम्ही मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करणारच, तशा आम्हाला पवार साहेबांच्या सूचना - आव्हाड
जितेंद्र आव्हाड
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 6:42 PM

महाविकास आघाडी सरकारातील (Mahavikas Aghadi government) काही नेत्यांमध्ये सातत्याने खटके उडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेवर (shivsena) काँग्रेसमधील नेते नाराज असल्याची चर्चा रंगत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच भाजपमधील काही नेते देखील वारवांर महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचा दावा करत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी कायम एकत्र राहणार आणि लढणार असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश मानायचा असा शरद पवार साहेबांचा आदेश आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आम्हाला जो आदेश देतील तो आम्ही पाळणारच असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

भाजपावर टीका

दरम्यान यावेळी बोलताना  जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. मुंबईत आमची बैठक झाली होती. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, भाजपासोबत युती करण्याचा आमचा निर्णय चुकला. आम्ही 30 वर्ष सापाच्या पिलाला पाळळे आता तो वळवळू लागल्याचे त्यांनी म्हटल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

भाजपाच्या काळात नियमबाह्य भरती

यावेळी बोलताना त्यांनी भाजपाच्या काळात नियमबाह्य पोलीस भरती झाल्याचा देखील आरोप केला आहे. गेल्या सरकारच्या काळात नियमबाह्य पोलीस भरती झाली. मात्र आता सर्व नियमांचे पालन करून पोलीस भरती करण्यात येईल. पोलिसांचे पदे वाढवण्यात यावेत यासाठी प्रयत्न करणार असल्यचे देखील त्यांनी यावेळी म्हटले.

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल फेकल्याची घटना, पिंपरीत भाजप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणे मेट्रोल दिल्या लिखित शुभेच्छा, शुभेच्छांची प्रत ‘टीव्ही 9 मराठी’कडे; मोदी नेमकं काय म्हणाले?

Video : अरे त्या ईडीपेक्षा शेतकऱ्याच्या खिशातील बिडीची किमंत जास्त, धनजंय मुंडे यांचा भाजपला टोला

बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.