महाविकास आघाडी सरकारातील (Mahavikas Aghadi government) काही नेत्यांमध्ये सातत्याने खटके उडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेवर (shivsena) काँग्रेसमधील नेते नाराज असल्याची चर्चा रंगत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच भाजपमधील काही नेते देखील वारवांर महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचा दावा करत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी कायम एकत्र राहणार आणि लढणार असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश मानायचा असा शरद पवार साहेबांचा आदेश आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आम्हाला जो आदेश देतील तो आम्ही पाळणारच असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
दरम्यान यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. मुंबईत आमची बैठक झाली होती. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, भाजपासोबत युती करण्याचा आमचा निर्णय चुकला. आम्ही 30 वर्ष सापाच्या पिलाला पाळळे आता तो वळवळू लागल्याचे त्यांनी म्हटल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
यावेळी बोलताना त्यांनी भाजपाच्या काळात नियमबाह्य पोलीस भरती झाल्याचा देखील आरोप केला आहे. गेल्या सरकारच्या काळात नियमबाह्य पोलीस भरती झाली. मात्र आता सर्व नियमांचे पालन करून पोलीस भरती करण्यात येईल. पोलिसांचे पदे वाढवण्यात यावेत यासाठी प्रयत्न करणार असल्यचे देखील त्यांनी यावेळी म्हटले.
Video : अरे त्या ईडीपेक्षा शेतकऱ्याच्या खिशातील बिडीची किमंत जास्त, धनजंय मुंडे यांचा भाजपला टोला