Devendra Fadnavis : हनुमान चालिसा म्हटलं म्हणून आम्ही कोणाला जेलमध्ये टाकणार नाही, राणा दाम्पत्याचं देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक

तरुण तडफदार अशी रवी राणा यांची महाराष्ट्राला ओळख आहे. आपलं सरकार कसं खुलं खुलं वाटतंय. दोन वर्षे बंदीस्त होतं, आता दहीहंडी, गणपती उत्सव, दिवाळी जोरात साजरी करायची आहे.

Devendra Fadnavis : हनुमान चालिसा म्हटलं म्हणून आम्ही कोणाला जेलमध्ये टाकणार नाही, राणा दाम्पत्याचं देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक
अमरावती दहीहंडी उत्सव Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 5:09 PM

अमरावती : आज अमरावतीमध्ये (Amravati) नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दहीहंडीचं आयोजन केलं आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये आज जल्लोष सुरु आहे. सकाळपासून अनेक राजकीय नेत्यांनी दहीहंडी महोत्सवाला उपस्थिती लावली आहे. विशेष म्हणजे आज तिथ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थिती लावली. ज्यावेळी फडणवीसांनी हातात माईक घेतला त्यावेळी कार्यकर्त्यांनी जोरात घोषणा दिल्या. तसेच फडणवीसांनी उपस्थितांच्यासमोर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) म्हटली आहे. बॉलिवूड अभिनेता गोविंदा याने सुध्दा तिथं आज उपस्थिती लावली असून त्याने एका गाण्यावर डान्स केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांच्या मते उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर गोविंदा याने सुध्दा हनुमान चालिसाचे वाचन केले. त्यावेळी स्टेजवर नवनीत राणा, रवी राणा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत बावनकुळे यांची उपस्थिती होती. दहीहंडीच्या ठिकाणी अनेक लोक जमले असल्याने दहीहंडीची अधिक चर्चा सुरु आहे.

हनुमान चालीसासाठी 14 दिवस जेलमध्ये राहणाऱ्या राणा दाम्पत्यांचा अभिमान

तरुण तडफदार अशी रवी राणा यांची महाराष्ट्राला ओळख आहे. आपलं सरकार कसं खुलं खुलं वाटतंय. दोन वर्षे बंदीस्त होतं, आता दहीहंडी, गणपती उत्सव, दिवाळी जोरात साजरी करायची आहे. हे सरकार कुणालाही हनुमान चालीसा म्हटलं म्हणून जेलमध्ये टाकणार नाही. हनुमान चालीसा वाचणाऱ्यांचा सत्कार करणार आहे. महाराष्ट्रात पाप झाले तेव्हा राणा दाम्पत्य आलं, त्यांनी म्हटलं जेलमध्ये टाकलं तरी चालेल पण हनुमान चालीसा म्हणणार असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. हनुमान चालीसासाठी 14 दिवस जेलमध्ये राहणाऱ्या राणा दाम्पत्यांचा अभिमान आहे. मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चांगल्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले आहे असं देवेंद्र फडणवीसांनी उपस्थितांना सांगितलं.

आता मागे वळून पहायचं नाही

बेघर महिलेला घर बांधून देणारे राणा दाम्पत्य खरे गरीबाचे कैवारी आहे. आता मागे वळून पहायचं नाही, विकास करायचं आहे. दहीहंडी फोडल्यानंतर मलई सर्वांनी खायची असते, आम्ही विकासाची मलई सर्वांपर्यंत पोहोचवणार आहोत असंही फडणवीस यांनी सांगितले. त्याचबरोबर आज दहीहंडीला विशेष उपस्थिती असणारे गोविंदाने देखील हनुमान चालिसा म्हटला, त्याचबरोबर उपस्थित असलेल्या नागरिकांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर नवनीत राणा रवी राणा यांना देखील शुभेच्छा दिल्या.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.