NCP: ज्या नेत्यांनी शिवसेना सोडली नंतर त्यांचा पराभव झाला, जयंत पाटलांनी उद्धव ठाकरेंची जमेची बाजू सांगितली
आमच्याबरोबर कोणतीही चर्चा झाली नाही. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आज शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना आवाहन केलं गेलंय. मुंबईत येऊन बोलावं. त्यानंतर ते निर्णय घेतील असं सेनेने म्हटलं आहे.
मुंबई: शिवसेना (shivsena) सोडून जाणाऱ्या प्रत्येकाचा पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभव झाला आहे. हा शिवसेनेचा इतिहास आहे. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते हे आमदारांच्या बरोबर नसतात. ते पक्षाबरोबर असतात हे शिवसैनिकांनी अनेकवेळेला दाखवून दिलं आहे. त्यामुळे शिवसेनेकडे आमदार किती आहेत याची आज चिंता करण्याची आवश्यकता नाही. फक्त संख्याबळ सरकार टिकणवण्यासाठी काय आहे हे महत्त्वाचं आहे. त्यांनी एकत्र बसून याबाबत निर्णय घेतला तर ते कळवतील, असं सांगत राष्ट्रवादीचे (ncp) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी शिवसेनेची जमेची बाजू मांडली. ते मीडियाशी संवाद साधत होते. सरकार गेल्यानंतर सर्वांना विरोधी पक्षात बसावंच लागतं. त्यात काही गैर नाही, असं सांगतानाच सरकारला कोणताही धोका नाही. सरकार भक्कम आहे, असंही त्यांनी सांगितलं.
आमच्याबरोबर कोणतीही चर्चा झाली नाही. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आज शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना आवाहन केलं गेलंय. मुंबईत येऊन बोलावं. त्यानंतर ते निर्णय घेतील असं सेनेने म्हटलं आहे. पाहू काय होतंय ते, असं जयंत पाटील म्हणाले. जे आमदार गुवाहाटीला गेले आहेत. त्यांनी ठाकरेंचा पाठिंबा काढला नाही. पक्ष सोडण्याचं विधान केलं नाही. ते मुंबईत आले आणि त्यांची शिवसेना नेतृत्वबरोबर बैठक झाली तर पाहू, असंही त्यांनी सांगितलं.
सत्ता गेल्यावर विरोधी बाकावर बसावंच लागतं
काँग्रेसने विरोधी बाकावर बसण्याची तयारी दर्शवली आहे. त्याकडे त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. सरकार गेल्यानंतर विरोधी बाकावरच बसावं लागणार आहे. त्यात नवीन काही नाही. पाहू काय होतं ते, असं त्यांनी सांगितलं.
हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे
वर्षा सोडून मातोश्रीवर जाणं हा मुख्यमंत्र्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. परिस्थिती पाहून त्यांनी निर्णय घेतला. ते आजही मुख्यमंत्री आहेत. मातोश्रीवर बसून ते काम करत आहेत. आमच्यात कोणतीही नाराजी नाही. त्यांनी कुठे रहावं हा त्यांचा प्रश्न आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. आज संध्याकाळी आमची बैठक आहे. त्यात राज्यातील परिस्थितीवर चर्चा केली जाईल, असंही ते म्हणाले.