टोकाच्या टीकेनंतर पहिली भेट, प. बंगालचं नाव बदला, ममता बॅनर्जींची मोदींकडे हटके मागणी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची दिल्लीत भेट घेतली. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टोकाची टीका केली होती.
नवी दिल्ली : एकमेकांमध्ये विस्तवही न जाणाऱ्या देशातील दोन बड्या नेत्यांची आज दिल्लीत भेट झाली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची दिल्लीत भेट घेतली. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टोकाची टीका केली होती. त्यानंतर आज मोदी-ममतांची भेट झाली.
जवळपास अर्धा तास दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. या भेटीनंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या, “ही केवळ औपचारिक भेट होती. या भेटीत मी कोव्हिड आणि राज्यातील कोरोना लसी आणि औषधांचा मुद्दा उपस्थित केला. याशिवाय अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या पश्चिम बंगालच्या नामांतराचा मुद्दाही मी मांडला. या मुद्द्यावर “मी बघतो” असं मोदींनी सांगितलं”
It was a courtesy meeting with PM today. During the meeting, I raised the issue of COVID & need for more vaccines & medicines in the state. I also raised the pending issue of the change of name of the state. On this issue, he said, “He will see.”: West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/XRXc3mmzJa
— ANI (@ANI) July 27, 2021
दिल्ली दौऱ्यात भेटीगाठी
पश्चिम बंगालमध्ये सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्याआधी ममता बॅनर्जींनी काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यामध्ये काँग्रेस नेते कमलनाथ (Kamal nath), आनंद शर्मा (Anand Sharma) यांचा समावेश होता. सूत्रांच्या मते, ममता बॅनर्जी या राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovid) आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचीही भेट घेणार आहेत.
ममता बॅनर्जी उद्या शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता
ममता बॅनर्जी काल म्हणजे सोमवारी दिल्लीत दाखल झाल्या. त्या पाच दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. ममतांच्या या दिल्ली दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील मोदी सरकारला आव्हान देण्यासाठी विरोधकांची एकजूट होत आहे. त्या अनुषंगाने ममता बॅनर्जी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. ममता बॅनर्जी उद्या शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या
बंगालमध्ये विधान परिषद निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजूर; प्रस्तावाच्या बाजूने 196 मते