कोल्हापूरचं ठरलं? सतेज पाटलांच्याविरोधात शौमिका महाडिक लढणार, आज मुंबईतून अधिकृत घोषणेची शक्यता

राहुल आवाडे हे भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरण्यास उत्सूक असल्याची चर्चा आहे. भाजपने तसा शब्दही दिल्याचं सांगितलं जातं. त्यामुळेच शौमिका की राहुल आवाडे अशी चर्चाही अधिकृत उमेदवारी जाहीर होईपर्यंत चालेल असं दिसतंय. या सर्व घटनांची आज मुंबईत चंद्रकांत पाटील फडणवीसांसोबतही चर्चा करतील

कोल्हापूरचं ठरलं? सतेज पाटलांच्याविरोधात शौमिका महाडिक लढणार, आज मुंबईतून अधिकृत घोषणेची शक्यता
SATEJ PATIL AND SHAUMIKA MAHADIK AND RAHUL AWADE
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 8:10 AM

कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीची रंगत आता भरायला सुरुवात झालीय. काँग्रेस नेते आणि मंत्री असलेले सतेज पाटील यांना सहज वाटणारी निवडणूक आता मात्र कडवी होईल अशी चिन्हं आहेत. कारण भाजपानं शौमिका महाडिक यांना पाटलांच्याविरोधात उभा करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाडिकांच्या शिरोलीत जाऊन ही उमेदवारी फिक्स केली. त्याची अधिकृत घोषणा आजच मुंबईतून होईल असा अंदाजही व्यक्त केला जातोय. शौमिका महाडिक ह्या झेडपीच्या माजी अध्यक्षा आहेत तसच माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या सुनबाई आहेत.

चंद्रकांत पाटलांची शिरोली भेट कोल्हापूर विधान परिषदेच्या एका जागेसाठी आघाडीकडून सतेज पाटलांची उमेदवारी निश्चित आहे. सत्ताधारी असल्यामुळे ही निवडणूक सतेज पाटील सहज जिंकतील अशी चर्चा रंगलेली असतानाच भाजपानं ही निवडणूक रंगतदार केलीय. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरात वेगवेगळ्या बैठका घेतायत. अशीच एक महत्वाची बैठक कोल्हापुरातल्या एका हॉटेलात 11 नोव्हेंबरला पार पडली. याच बैठकीत भाजपकडून कुणालाउमेदवारी द्यायची यावर जोरदार चर्चा झाली. बैठकीत माजी आमदार सुरेश हाळवणकर, प्रा. जयंत पाटील, समरजितसिंह घाटगे , राहुल आवाडे तसच शौमिका महाडिक यांच्या नावावर चर्चा झाली. भाजपा अर्थातच निवडणूक येण्याची क्षमता ह्या एका मुद्यावर उमेदवाराची निवडण करणारा पक्ष आहे. त्यामुळे याच बैठकीत शौमिका महाडिक यांच्या नावावर सर्वांचं एकमत झाल्याचं समजतं. जनसुराज्यचे आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे तसच महाडिकांच्या घरातली मंडळीही बैठकीला उपस्थित होती. याच बैठकीनंतर चंद्रकांत पाटलांनी काल शिरोलीत जाऊन शौमिका महाडिक यांचे सासरे महादेवराव महाडिक आणि इतर कुटुंबियांशी चर्चा केली आणि शौमिका महाडिकांची उमेदवारी निश्चित झाली.

राहुल आवाडे उत्सूक शौमिका महाडिक यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरीसुद्धा कोल्हापूरात आमचं ठरलंय हा शब्द आता आवडीचा झालेला आहे. त्यामुळेच राहुल आवाडे हे भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरण्यास उत्सूक असल्याची चर्चा आहे. भाजपने तसा शब्दही दिल्याचं सांगितलं जातं. त्यामुळेच शौमिका की राहुल आवाडे अशी चर्चाही अधिकृत उमेदवारी जाहीर होईपर्यंत चालेल असं दिसतंय. या सर्व घटनांची आज मुंबईत चंद्रकांत पाटील फडणवीसांसोबतही चर्चा करतील आणि त्यानंतरच उमेदवारी जाहीर होईल असा अंदाज आहे.

Zodiac Signs | या राशीच्या व्यक्ती कधीही खोट बोलत नाहीत, जाणून घ्या तुमच्या राशीबाबत

औरंगाबादेत वाढत्या महागाई विरोधात शिवसेनेचा मोर्चा; संजय राऊत करणार नेतृत्व

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.