ठाकरे येत आहेत…’अदानी’विरोधातील मोर्चातील मागण्या कोणत्या?; ‘ही’ मागणी महत्त्वाची

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी उद्योग समूहाला देण्यात आला आहे. पण अदानी समूहाकडून या पुनर्विकासाचा कोणताही मास्टर प्लान देण्यात आलेला नाही. त्याच्याविरोधात हा मोर्चा काढण्यात येत आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर धारावीत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तब्बल 300 पोलीस या मोर्चासाठी तैनात राहणार आहेत.

ठाकरे येत आहेत...'अदानी'विरोधातील मोर्चातील मागण्या कोणत्या?; 'ही' मागणी महत्त्वाची
Uddhav Thackeray Gautam Adani
Follow us
| Updated on: Dec 16, 2023 | 6:38 PM

मुंबई | 16 डिसेंबर 2023 : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचा आज अदानी उद्योग समूहाविरोधात जोरदार मोर्चा निघणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चात दीड लाख लोक सामील होणार असल्याचं सांगितलं जात आहे. स्वत: उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. त्यामुळे या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. धारावीत प्रचंड बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसेच या मोर्चाच्या निमित्ताने मुंबईतही होर्डिंग्ज लागले आहेत. संपूर्ण मुंबईतून लोक या मोर्चाला येणार आहेत. या मोर्चाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे शक्तीप्रदर्शन करत आहेत. त्यामुळे या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर बीकेसीच्या भारत नगर येथील अदानी बिल्डिंगला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. अदानी बिल्डिंगकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. कायदा सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अदानी ग्रुपच्या इमारती, कार्यालय समोरील सर्व रस्ते बॅरिकेड लावून बंद करण्यात आले आहेत. मुख्य रस्त्यावरही प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस व्हॅनही लावण्यात आल्या आहेत.

UBT Dharavi MahaMorcha ground report | धारावीतील अदानी यांच्या प्रकल्पावर रहिवासी का नाराज आहेत ? काय आहेत मागण्या ? येथे पाहा व्हिडीओ –

300 पोलिसांचा बंदोबस्त

धारावी ते बीकेसीपर्यंत पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 30 वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या 4 ते 5 तुकड्या, दंगल नियंत्रण पथक, महाराष्ट्र गृह रक्षक दल, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आदी 300 च्यावर पोलिसांचा या मोर्चासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धारावी ते बीकेसी मैदानापर्यंत हा पोलीस बंदोबस्त असणार आहे. पोलीस उपायुक्त, अतिरिक्त पोलिस आयुक्तही या मोर्चावर विशेष लक्ष ठेवून आहेत.

सर्वात महत्त्वाची मागणी

या मोर्चात एकूण सात मागण्या करण्यात आल्या आहेत. धारावीकरांच्या पुनर्वसनाची मागणी महत्त्वाची आहेच. पण त्यातील सर्वात महत्त्वाची मागणी टीडीआरशी संबंधित आहे. टीडीआर देण्यासाठी एक कंपनी स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. अदानी समूहाकडे टीडीआरची मक्तेदारी राहू नये यासाठी ही मागणी करण्यात आल्याने सरकारची आणि अदानी यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

मागण्या काय?

धारावीतील सर्व निवासी, अनिवासी झोपडीधारकांना पात्र ठरवून त्यांचे धारावीतच पुनर्वसन करा

निवासी झोपडीधारकांना 500 चौरस फुटांचे घर मोफत द्या

‘टीडीआर’साठी सरकारने स्वतःची कंपनी नेमावी

पालिका मालमत्ता विभागाच्या चाळी आणि इमारतींमधील रहिवाशांना 750 चौरस फुटांचे घर मोफत द्या

झोपडपट्टीत अनेकांचे व्यवसाय चालतात त्यांचे पुनर्वसन करा

नव्याने सर्वेक्षण करा, निवासी, अनिवासी जाहीर केल्यानंतरच प्रकल्प सुरू करा

प्रकल्पाचे स्वरूप समजण्यासाठी मास्टर प्लान आधी जाहीर करून सविस्तर माहिती द्या

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.