Sambhaji Raje : जातीच्या मुद्यावरुन पाडापाडीवर काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती? Video

Sambhaji Raje : देशात, महाराष्ट्रात आज पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. त्याआधी संभाजीराजे छत्रपती यांनी एक अत्यंत महत्त्वाच वक्तव्य केलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटीलही पुन्हा चर्चेत आले आहेत.

Sambhaji Raje : जातीच्या मुद्यावरुन पाडापाडीवर काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती? Video
Sambhaji Raje
Follow us
| Updated on: May 20, 2024 | 8:07 AM

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईसह महाराष्ट्रात, देशात आज पाचव्या टप्प्याच मतदान होत आहे. या मतदानाआधी छत्रपती संभाजीराजे यांनी एक अत्यंत महत्त्वाच विधान केलय. एकाबाजूला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा चर्चेत आले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी पुन्हा आंदोलन सुरु करण्याच्या तयारीत ते आहेत. सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला राज्यात भरघोस प्रतिसाद मिळाला होता. राज्यातील मराठा समाज भक्कमपणे त्यांच्या पाठिशी असल्याच चित्र दिसलं होतं. सध्या राज्यात लोकसभेच्या निवडणुका सुरु आहेत. त्यानंतर सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका येतील. त्यावेळी मनोज जरांगे पाटील आणखी आक्रमक भूमिका घेऊ शकतात.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी महत्त्वाच वक्तव्य केलय. ‘जातीचा मुद्दा करुन पाडापाडी करणं अत्यंत चुकीच आहे’, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. ‘गरीब मराठ्यांना न्याय मिळावा, यासाठी माझा लढा आहे’ असं ते म्हणाले. “अठरा पगड बार बलुतेदारांच राज्य आहे. आपल्या जातीवर आपलं प्रेम असणं यात काही चुकीच नाहीय. पण याला पाड हा या जीताचा, तो या जातीचा, मी स्वत: या मताचा नाही. मी शिवाजी महाराज शाहूंचा वंशज आहे. सगळ्या बहुजन समाजातील लोकांना सोबत घेऊन जाणं माझी जबाबदारी आहे. माझा मराठ्यांसाठी लढा का आहे? गरीब मराठ्यांना न्याय मिळालेला नाही. जो इतर समाजाला मिळाला आहे” असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले. महाराष्ट्रात किती जागांवर मतदान?

आज पाचव्या टप्प्यात देशातील 49 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. महाराष्ट्रात मतदानाचा हा शेवटचा टप्पा आहे. या टप्प्यासह महाराष्ट्रात 48 जागांवर मतदान पूर्ण होईल. मुंबईसह राज्यात एकूण 13 जागांवर आज मतदान आहे. यात मुंबईतील लोकसभेचे सहा मतदारसंघ आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.