Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांचा सरळ शरद पवार यांच्यावर हल्ला, भूमिका कशी बदलली स्पष्टच सांगितले

Ajit Pawar and Sharad Pawar : मुंबईत दोन गटाच्या बैठक बुधवारी होत्या. शरद पवार आणि अजित पवार यांनी या बैठकीच्या माध्यमातून आपले शक्तीप्रदर्शन केले. या वेळी अजित पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला.

अजित पवार यांचा सरळ शरद पवार यांच्यावर हल्ला, भूमिका कशी बदलली स्पष्टच सांगितले
Ajit Pawar
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 3:10 PM

मुंबई : राज्यातील राजकारणात रविवारपासून मोठ्या घडामोडी घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसपासून अजित पवार यांनी आपला वेगळा गट तयार केला. अजित पवार शिवसेना-भाजपसोबत गेले. त्यानंतर दोन-तीन दिवसांत शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्याकडून मुंबईत शक्तीप्रदर्शन केले गेले. यावेळी अजित पवार यांनी ही वेळ आपल्यावर का आली? हा प्रश्न मांडत भाषणाला सुरुवात केली. यावेळी शरद पवार यांच्या बदललेल्या भूमिकेवर अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला.

परिस्थिती कशी बदलली

अजित पवार यांनी शरद पवार यांचे राजकारण कसे सुरु झाले, त्यानंतर देशपातळीवर परिस्थिती कशी बदलत गेली? हे सांगताना काळाप्रमाणे बदल केले पाहिजे, असे सांगितले. ते म्हणाले, देशात जनता पक्ष आज कुठे आहे? कारण ते बदलत गेले नाही. मी साहेबांमुळेच घडलो. माझे राजकारण त्यांच्याशिवाय नाही. परंतु देशपातळीवर आणि राज्य पातळीवर जे सुरु आहे, त्याचा विचार केला पाहिजे. आपण विकासासाठी काम केले पाहिजे.

शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्न

१९९९ ला निवडणूक घेतल्या. तेव्हा काँग्रेस एकत्र होती. परंतु सोनिया गांधी या परदेशी आहेत, हे आपणास शरद पवार यांनीच सांगितले. परदेशी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकत नाही, असे सांगितले. आम्ही त्यावेळी ऐकले. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीचा जन्म झाला. मग २०१७ मध्ये आम्हाला सांगितले शिवसेना जातीवादी पक्ष आहे. मग २०१९ मध्ये शिवसेना जातीवादी राहिली नाही. त्यांच्यासोबत जाऊन सरकार स्थापन केले. दोन वर्षांत कशी ही भूमिका बदलत गेली? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.

हे सुद्धा वाचा

त्या वेळी ५८ जागा मिळाल्या

१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. त्यावेळी सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवायचा होता. पण त्यावेळी आपल्याला फक्त ५८ जागा मिळाल्या. काँग्रेसला राज्यात ताकदीचा नेता नसताना ७८ जागा मिळाल्या. विलासराव मुख्यमंत्री झाले. आम्ही सत्तेत गेलो. कामे केली. मला फक्त सात जिल्ह्याचं खातं मिळालं. प्रशासनावर माझी पकड आहे की नाही हे महाराष्ट्र जाणतो. मी जातीपातीचं नात्यागोत्याचं काम केलं नाही. प्रत्येक कार्यकर्त्याचं काम करतो. पहाटे कामाला सुरुवात करतो. आजही करतो. महाराष्ट्र पुढे जावं म्हणून हे करत असतो. देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य म्हणून मी काम करत असतो.

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.