Uddhav Thackeray : आता मुख्यमंत्रीपद सोडतो ते पक्षप्रमुखपदालाही जय महाराष्ट्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मास्टरस्ट्रोक भाषणातले 10 मोठे मुद्दे

एकनाथ शिंदे ते मुख्यमंत्रीपद काय बोलले मुख्यमंत्री, जाणून घ्या पाच पॉई्ंट्समधून...

Uddhav Thackeray : आता मुख्यमंत्रीपद सोडतो ते पक्षप्रमुखपदालाही जय महाराष्ट्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मास्टरस्ट्रोक भाषणातले 10 मोठे मुद्दे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 6:06 PM

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या (Ekanath Shinde) बंडाळीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची डोकेदुखी वाढली आहे. यानंतर मुख्यमंत्री समोर येत माध्यामांसमोर कधी येणार, मुख्यमंत्री (CM) माध्यमांसमोर का येत नाही, असं बोललं जाऊ लागलं. अखेर आज मुख्यमंत्री माध्यमांसमोर आलेत. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदा माध्यमांसमोर आले. अर्धा तास उशिरा मुख्यमंत्री माध्यमांसमोर आल्यानं अवघा महाराष्ट्र त्यांचं भाषण ऐकण्यासाठी ताटकळत टीव्ही समोर बसलेला होता. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविडपासून सुरुवात केली.  यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक मुद्दे मांडले. यावेळी कोविड, बाळासाहेबांची शिवसेना, हिंदुत्व, एकनाथ शिंदे यावर त्यांनी भाष्य केलंय. मुख्यमंत्रींचं भाषण दहा मुद्द्यात समजून घेऊया…

  1. ‘शिवसेना बाळासाहेबांची आहे का शिवसेनेने हिंदुत्व सोडलं का मुख्यमंत्री भेटत का नव्हते. मुखऱ्यमंत्री भेटत नव्हते काही दिवसांपूर्वी सत्य होतं. कारण माझी शस्त्रक्रिया झाली. अनुभव सांगणार नाही. पण दोन ते तीन महिने मी भेटू शकत नव्हतो. हा मुद्दा बरोबर आहे. त्यानंतर मी भेटायला सुरुवात केली आहे. मी भेटत नव्हतो पण कामं थांबली नव्हतं.
  2. शिवसेना आणि हिंदुत्व घट्ट आहे. कोणी एकमेकांपासून तोडू शकत नाही. त्यामुळे आदित्य एकनाथ शिंदे आमदार खासदार अयोध्येला जाऊन आले. हिंदुत्वाबद्दल विधानसभेत बोलणारा मी कदाचित पहिला मुख्यमंत्री असेल. आता बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिली नाही असं काही लोक भासवत आहेत. मी काय नेमकं वेगळं केलं की बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही.
  3. बाळासाहेब गेल्यानंतर 2014ची एकाकी लढलो. तेव्हाही तेच होतो आताही तसेच होतो. तेव्हा 63 आमदार आले. तेव्हाही मंत्री होतो. आता मंत्रिमंडळात तेच मंत्री आहेत. मधल्या काळानंतर जे काही मिळालं ते बाळासाहेबांच्या शिवसेनेने दिलं हे लक्षात ठेवा.
  4. शिवसेनेचे आमदारा गायब सुरतला गेले. गुवाहाटीाला गेले. त्यात मला पडायचं नाही. परवा निवडणूक झाली. त्यावेळी आमदार हॉटेलात होते. मी म्हटलंही कोणती लोकशाही आहे.आपली माणसांना एकत्रं ठेवावं लागतं. अरे हा कोठे गेला तो कुठे गेला. त्यावर शंका घेतली जात होती.
  5. लघवीला गेला तरी शंका घेतो. म्हणजे लघुशंका. मला काहीच अनुभव नव्हता. पण जे काही घडलं. मी जिद्दीने काम करणारा माणूस आहे. मी शिवसेना प्रमुखांना दिलेलं वचन पूर्ण करणारचं म्हणून रगणागणात उतरलो.
  6. आपल्याला नाईलाजाने काही निर्णय घ्यावे लागेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जावं लागलं. तीन पक्षाची बैठक झाली. त्यात ठरलं. त्यानंतर पवारांनी मला बोलावलं आणि सांगितलं. हे ठरलं पण जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. मी म्हटलं पवार साहेब मस्करी करता का. मी महापालिकेत फक्त महापौरांना शुभेच्छा द्यायाल गेलो. नगरसेवक नसताना मी कसा मुख्यमंत्री होणार हे बोललो. त्यावर पवार म्हणाले. तुम्हीच जबाबदारी घ्या. ठिक आहे. घेतो म्हटलो.
  7. पवारांनी विश्वास टाकला, सोनिया गांधींनी विश्वास टाकला. त्यांनी सहाकर्य केलं. प्रशासनानेही सहाकार्य केला. काय चुकलं काय वाईट सांगितलं.
  8. आज मी नेमकं काय बोलणार मला दुख कशाचं झालं आश्चर्य कशाचं वाटलं दुखं कशाचं वाटलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको. दोन्ही पक्ष स्वतंत्र आहे. त्याचा विचार आहे.
  9. सत्तेसाठी आपण एकत्रं आलो. आज सकाळी कमलनाथ यांनी फोन केला. काल पवारांनी फोन केला. आम्ही तुमच्यासोबत आहे. त्यांनी भरवसा ठेवला. पण माझीच लोकं म्हणत असती मी मुख्यमंत्री नको. ते मला माझं मानता की नाही माहीत नाही. तुम्ही इथं येऊन का बोलले नाही.
  10. माझ्यासमोर बोलायला हवं होतं. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नालायक आहे. तुम्ही नकोत. मला एकाही आमदाराने सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री पद नको तर मी मुख्यमंत्रीपद घेणार नाही. आजच मी मातोश्रीवर मुक्काम हलवणार नाही. मला सत्तेचा मोह नाही. तुम्ही हे कशाला करत आहात. त्यामुळे कुणाचं नुकसान करायचं आहे.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.