MNS : भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यामागे दडलयं काय..? राजू पाटलांनी सांगितले शिंदे गटाचे भविष्य..! 

यंदा मेळावा घेण्यासाठी काहींची ओढाताण होत असल्याचे म्हणत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. आमदारांच्या बंडानंतर त्यांनी गर्दी जमवण्याचे प्रश्न आहेत. पण मनसेकडे गर्दी आणि विचारांचे सोनेही असणार. त्यामुळे दरवर्षी यंदाचा मेळावा आकर्षक ठरणार असेही पाटील म्हणाले आहेत.

 MNS : भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यामागे दडलयं काय..? राजू पाटलांनी सांगितले शिंदे गटाचे भविष्य..! 
आ. राजू पाटीलImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 15, 2022 | 9:03 PM

ठाणे :  (MNS Party) मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी वाढत असल्या तरी (Proposal of alliance) युतीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे मनसेने यापू्र्वीच स्पष्ट केले आहे. शिवाय ज्या भागात शिंदे गटाचे खासदार आहेत त्या मतदारसंघातही भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांचे दौरे सुरु आहेत. यावर मनसेचे (Raju Patil) आमदार राजू पाटील यांनी रोखठोक उत्तर दिले आहे. अद्यापही शिंदे गटाला चिन्ह हे मिळाले नाही. जर चिन्ह हे मिळालेच नाही तर काही लोकांचा सोईस्कररित्या पराभव करता यावा म्हणून भाजप मंत्र्याच्या फेऱ्या वाढल्या असतील असा टोला त्यांनी शिंदे गटाला लावलेला आहे. अशा परस्थितीमध्ये त्यांना कुणाचा तरी आधार घ्यावाच लागेल तो ते शोधत असल्याचेही राजू पाटील यांनी सांगितले आहे.

मनसेचे राजू पाटील हे कल्याण मतदार संघाचे नेतृत्व करीत आहेत. भाजप मंत्र्यांच्या दौऱ्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली असली तरी ती शिंदे गटाला झोंबणारी आहे. अद्याप शिंदे गटाचे चिन्ह ठरलेले नाही. उद्या जर का शिंदे गटाला अपेक्षित चिन्ह मिळाले नाही तर काही लोकांना सोईस्कर पडाव यासाठी पण फेऱ्या असतील असा टोला त्यांनी लगावला आहे.

यापूर्वी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विचारांचे सोने लूटले जायचे. आता दोन ठिकाणंच सोनं लूटायचे कसे ते लोक लुटतीलच पण मनसेचा मेळावा हा जंगी असणार. येथे जनतेचा उत्साह आणि विचारांचेही सोने असेल असा विश्वास राजू पाटील यांनी व्यक्त केला आहे.

यंदा मेळावा घेण्यासाठी काहींची ओढाताण होत असल्याचे म्हणत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. आमदारांच्या बंडानंतर त्यांनी गर्दी जमवण्याचे प्रश्न आहेत. पण मनसेकडे गर्दी आणि विचारांचे सोनेही असणार. त्यामुळे दरवर्षी यंदाचा मेळावा आकर्षक ठरणार असेही पाटील म्हणाले आहेत.

लोकसभा निवडणूकांच्या अनुषंगाने भाजप मंत्र्यांचा दौरा सुरु आहे. पण तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. उद्या जर कुणाला चिन्हा मिळाले नाही, त्या जागेवर भाजपाचा डोळा असणार असा अंदाजही राजू पाटील यांनी व्यक्त करीत शिंदे गटाला टोमणा मारला आहे.

मनसेला कुणाच्याही युतीचा प्रस्ताव आलेला नाही. सरकार नवीन असल्याने राज ठाकरे आणि त्यांच्यामध्ये भेटीगाठी होत आहेत. याचा अर्थ युतीच असा नव्हे. तर मनसे कुणाच्या भरवश्यावर निवडणुका लढवत नाही. आमची स्वबळावरची तयारीही असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.