AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambadas Danve : स्वतंत्र मराठवाड्याविषयी शिवसेनेची भूमिका काय? विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मांडली खणखणीत भूमिका..

Ambadas Danve : स्वतंत्र मराठवाडा, विदर्भाविषयी शिवसेनेची भूमिका काय आहे?

Ambadas Danve : स्वतंत्र मराठवाड्याविषयी शिवसेनेची भूमिका काय? विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मांडली खणखणीत भूमिका..
दानवे यांची खणखणीत भूमिकाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 24, 2022 | 9:23 PM

उस्मानाबाद : स्वतंत्र विदर्भाच्या (Vidarbha) चळवळीने मध्यंतरी बाळसे धरले. नागपूरसह विदर्भात विदर्भवाद्यांची स्वातंत्र्यासाठी आंदोलन होतात. पण स्वतंत्र मराठवाड्याविषयी (Marathwada) अद्यापही मोठे जनमत दिसून येत नाही. अधून-मधून स्वातंत्र्याची चर्चा होते, पण गाडं काही पुढे सरकत नाही. आता विधीज्ञ गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी स्वतंत्र मराठवाड्याचा बिगूल वाजविला आहे. त्यावर शिवसेनेची खणखणीत प्रतिक्रिया ही आली आहे.

सदावर्ते यांनी मराठवाड्यासह विदर्भ अशी दोन राज्य होण्यासाठी एल्गार पुकारला आहे. आपली बाजू मांडण्यासाठी त्यांनी संवाद परिषदही बोलावली आहे. अर्थात त्यांच्या या भूमिकेला मराठवाड्यातून कितपत पाठबळ मिळते हे लवकरच स्पष्ट होईल.

पण स्वतंत्र मराठवाडा, विदर्भाबाबत शिवसेनेने त्यांच्या भूमिकेशी कसलीही तडजोड केलेली नाही. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सदावर्ते यांच्या भूमिकेवर भाष्य न करता, स्वतंत्र मराठवाड्याला विरोध केला आहे.

हे सुद्धा वाचा

“अन्याय झाला म्हणून,आपला प्रांतच तोडणे शिवसेनेला मान्य नाही”, असे खणखणीत उत्तर त्यांनी दिलं. निजामाच्या जुलमी राजवटीतून, संघर्ष करुन मराठवाडा स्वतंत्र झाला आहे. महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर मराठवाडा स्वतंत्र झाला आणि महाराष्ट्रात सहभागी झाला, याची त्यांनी आठवण करुन दिली.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाचा अनुशेष शिल्लक आहे. पण अनुशेष शिल्लक आहे म्हणून स्वतंत्र राज्य निर्मितीला शिवसेनेचा विरोध असल्याची स्पष्ट भूमिका दानवे यांनी मांडली.  विकासाच्या मुद्यावर स्वतंत्र राज्य निर्मितीला त्यांनी विरोध केला.

फुटीनंतरही मराठवाड्यात दोन्ही गटांची ताकद आहे. स्वतंत्र राज्याविषयी दानवे यांनी भूमिका जाहीर केल्याने स्वतंत्र मराठवाड्याच्या आंदोलनाला कोणताही राजकीय पक्ष आता पाठिंबा देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.