Rajya Sabha Election 2022: समजा मविआची तीन मतं बाद झाली तर शिवसेनेचा एक ‘संजय’ पडणार? नेमकं काय होणार? वाचा सविस्तर

Rajya Sabha Election 2022: शिवसेनेकडे एकूण 56 मते होती. मात्र, आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्याने शिवसेनेची मतांची संख्या 55 वर आली आहे. राष्ट्रवादीकडे एकूण 53 मते होती.

Rajya Sabha Election 2022: समजा मविआची तीन मतं बाद झाली तर शिवसेनेचा एक 'संजय' पडणार? नेमकं काय होणार? वाचा सविस्तर
जर मविआची आव्हाड, कांदे, ठाकूरांची तीन मतं बाद झाली तर राज्यसभेत कोण जिंकणार? Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 8:16 PM

मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) आज मतदान पार पडलं. सर्वच्या सर्व 285 आमदारांनी मतदान केलं. मात्र, मतदान सुरू असतानाच भाजपने (bjp) राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रेस (congress) नेत्या यशोमती ठाकूर आणि शिवसेना नेते सुहास कांदे यांची मते बाद करण्याची मागणी केली. या तिघांवर मतं दाखवल्याचा आरोप आहे. आक्षेप घेऊन भाजप एवढ्यावरच थांबला नाही तर भाजपने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. या तिघांची मते बाद करण्याची मागणी भाजपने केली असून त्यासाठी 2017च्या निवडणुकीत झालेल्या प्रकाराचा दाखलाही दिला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आता काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, ही तीन मते बाद झाली तर आघाडीची पुरती कोंडी होण्याची शक्यता आहे. आघाडीच्या सहाव्या क्रमांकाच्या उमेदवाराला त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही तीन मते बाद झाली तर नेमकं काय घडू शकतं, याचा घेतलेला हा मागोवा.

आधी संख्याबळावर नजर

शिवसेनेकडे एकूण 56 मते होती. मात्र, आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्याने शिवसेनेची मतांची संख्या 55 वर आली आहे. राष्ट्रवादीकडे एकूण 53 मते होती. यातील नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे भाजपचे दोन नेते तुरुंगात असल्याने राष्ट्रवादीच्या मतांची संख्या 53 वरून 51 वर आली आहे. तर, काँग्रेसकडे एकूण 44 मते आहेत. म्हणजे आघाडीकडे सध्या एकूण 150 मतांची बेगमी आहे. त्यात आघाडीला 17 अपक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आघाडीची मते 167 झाली आहेत. एमआयएमनेही आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एमआयएमची दोन मते आघाडीला मिळाली आहे. बविआचे नेते हिंतेद्र ठाकूर यांनी कुणाला मतदान केलं हे शेवटपर्यंत सांगितलं नाही. पण विकासाला कायम मदत करणाऱ्यांना मतदान केल्याचं त्यांनी सांगितलं. यावरून बविआने आघाडीला मतदान केल्याचं स्पष्ट होत आहे. बविआचीकडे तीन मते असून ही मते आघाडीकडे आल्याने आघाडीच्या मतांची संख्या 172 झाली आहे.

हे सुद्धा वाचा

तरीही चारही उमेदवार विजयी होणार

आघाडीकडे सध्या 173 मते आहेत. मते आहेत. आघाडीचे चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या 172 मतांची चार उमेदवारांमध्ये समान विभागणी केल्यास ही संख्या 43 येते. म्हणजे आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला प्रत्येकी 43 मते मिळतात. रमेश लटके यांचं निधन झाल्यामुळे, तसेच अनिल देशमुख आणि नवाब मलिक तुरुंगात असल्याने तीन मते कमी होऊन विजयी मतांचा कोटा 41 वर आला आहे. आघाडीकडे प्रत्येकी 43 मते आहेत. विशेष म्हणजे आव्हाड, कांदे आणि ठाकूर हे तिन्ही उमेदवार एकाच पक्षाचे नाहीत. आव्हाड राष्ट्रवादीचे आहेत. कांदे शिवसेनेचे तर ठाकूर काँग्रेसच्या आहेत. म्हणजे ही तीन मते बाद झाल्यास शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक मत कमी होणार आहे. म्हणजेत तिन्ही पक्षाच्या चारही उमेदवाराच्या वाट्याला येणाऱ्या 43 मतांमधील एक एक मत कमी झाल्याने ही संख्या 42 होते. विजयासाठी उमेदवाराला 41 मतांची गरज असल्याने आघाडीचे चारही उमेदवार सहज निवडून येतील, असं सांगितलं जात आहे.

पवारांची खेळी चालणार?

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे बुजुर्ग नेते आहेत. अशा निवडणुकांचा त्यांना प्रचंड अनुभव आहे. कोणत्याही निवडणुकीसाठी तयारी करताना त्याचे फायदे आणि तोटे यावरही त्यांचं लक्ष असतं. त्यामुळे त्यांनी आज सकाळी आघाडीचा प्लान बदलला. आधी 42 मतांचा कोटा ठरला होता. पवारांनी हा कोटा 44 वर नेला आहे. पवारांच्या या प्लानिंग नुसार आघाडीच्या आमदारांनी मतदान केलं असेल तर आघाडीच्या उमेदवारांना कोणताही फटका दिसणार नसल्याचं दिसून येत आहे. आघाडीचे तीन मत बाद झाल्यानंतर पवारांच्या कोट्यानुसार आघाडीच्या एका उमेदवाराला 44 तर इतर तिन्ही उमेदवारांना प्रत्येकी 43 मते मिळतील. विजयासाठी अवघ्या 41 मतांची गरज असल्याने आघाडीला कोणताही धोका नसल्याचं चित्रं होतं.

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.