AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राजीनामा देण्यास तयार, पण चौकशीनंतरच तो मंजूर करा’, राठोडांची मुख्यमंत्र्यांना विनंती?

संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यास किंवा त्यांच्या राजीनामा घेतल्यास शिवसेनेवर काय परिणाम होऊ शकतात? बंजारा समाजाची भावना किंवा दबाव संजय राठोड यांना वाचवणार का? अशा प्रश्नांवरही सध्या चर्चा सुरु आहे.

'राजीनामा देण्यास तयार, पण चौकशीनंतरच तो मंजूर करा', राठोडांची मुख्यमंत्र्यांना विनंती?
उद्धव ठाकरे-संजय राठोड
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 3:08 PM

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. संजय राठोड सपत्निक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री, शिवसेनेचे अन्य नेते आणि संजय राठोड यांच्याच चर्चा झाली. पण संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यास किंवा त्यांच्या राजीनामा घेतल्यास शिवसेनेवर काय परिणाम होऊ शकतात? बंजारा समाजाची भावना किंवा दबाव संजय राठोड यांना वाचवणार का? अशा प्रश्नांवरही सध्या चर्चा सुरु आहे.(What will happen to Shiv Sena if Sanjay Rathod resigns?)

‘राजीनामा देण्यास तयार, पण…’

दरम्यान, वनमंत्री संजय राठोड राजीनामा देण्यास तयार आहेत. ते राजीनामा घेऊन वर्षा बंगल्यावर गेले आहेत. मात्र, जोपर्यंत चौकशी होत नाही, तोपर्यंत राजीनामा घेऊ नये, अशी विनंती संजय राठोड यांनी केली आहे.  त्यामुळे उद्धव ठाकरे आता याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. संजय राठोड यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र दालनात चर्चा सुरु असल्याचीही माहिती मिळत आहे. संजय राठोड यांच्या संभाव्य राजीनाम्याबाबत ही चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राठोडांच्या राजीनाम्याचा शिवसेनेवर काय परिणाम होऊ शकतो?

संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला तर विदर्भात शिवसेनेला मोठ्या परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. कारण, ज्या बंजारा समाजाचं नेतृत्व संजय राठोड करत आहेत त्या बंजारा समाजाची संख्या जवळपास 2 कोटीच्या आसपास आहे. अशावेळी पोहरादेवी गडाच्या महंतांनीही संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये अशी भूमिका मांडली आहे. संजय राठोड यांचा राजीनामा घेतला गेल्यास फक्त राठोड नाही तर संपूर्ण बंजारा समाज दोषी ठरला जाईल. त्यांचा राजीनामा घेतल्यानंतर राज्यात होणाऱ्या उद्रेकाला भारतीय जनता पार्टी जबाबदार राहील, अशी आक्रमक भूमिका महंत सुनील महाराज यांनी मांडली आहे. अशावेळी बंजारा समाजाची नाराजी ओढावून घेणं शिवसेनेला परवडणारं नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मुख्यमंत्री काय निर्णय घेणार?

संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत शिवसेनेतही दोन गट पडल्याचं बोललं जात आहे. एक गट संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा अशा भूमिकेत आहे. कारण, पूजा चव्हाण प्रकरणात ठाकरे सरकारसह शिवसेनेची मोठी बदनामी होत आहे. सरकारची अब्रू वाचवण्यासाठी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जावा, अशी भूमिका एका गटाची आहे. तर दुसरा गट मात्र राठो यांचा राजीनामा आताच घेऊ नये, अशा मताचा आहे. कारण, बंजारा समाजाची नाराजी ओढावून घेणं शिवसेनेला जड जाऊ शकतं. विदर्भात शिवसेनेला याचा परिणाम भोगावा लागेल. त्यामुळे राठोड यांचा राजीनामा घेतला जाऊ नये, अशी भूमिका दुसऱ्या गटाची आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राठोड यांचा राजीनामा घेतील, अशी शक्यता व्यक्त केली जात असताना आता मुख्यमंत्री राठोड यांच्याबाबत वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतील असंही बोललं जात आहे.

संबंधित बातम्या :

संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यास वनमंत्री कोण?

संजय राठोड सपत्निक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला, मोठ्या निर्णय होणार?

What will happen to Shiv Sena if Sanjay Rathod resigns?

ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट.
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज.
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन.
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही.
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.