Maharashtra Political Crisis : बाळासाहेब ठाकरे असते तर काय झालं असतं? शिंदेंनी बंडखोरी करण्याची हिंमत केली असती?
ट्वीटरवर बाळासाहेबांनी केलेलं वक्तव्य व्हायरल होत आहे. त्यात ते म्हणतात, भगवा झेंडा आणि हिंदुत्वामुळं शिवसेनेला मान-सन्मान मिळतो. त्यामुळं याच्याशी कधी गद्दारी केली जाऊ शकत नाही. शिवसेनेला काँग्रेससारखं होऊ देणार नाही. मला माहीत आहे की, असं झालं तर मला माझी दुकान बंद करावी लागेल.
सुरेंद्र कुमार वर्मा
मुंबई : शिवसेना आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर छोटी-मोठी बंडखोरी होती होती. पण, त्यांच्यासमोर उभे राहण्याची हिंमत सहसा कुणाची होत नव्हती. नारायण राणे (Narayan Rane), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिवसेना सोडली. बाळासाहेबांच्या मार्गानं उद्धव ठाकरे गेले असते तर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला नसता. उद्धव ठाकरे यांच्या हातून मुख्यमंत्री पद जाण्याची शक्यता आहे. पक्षावरूनही त्यांचं नियंत्रण कमी झाल्यास दिसून येते. शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंनी तयार केली. तोच पक्ष आता उद्धव ठाकरे यांच्या हातातून जाताना दिसत आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेना कशी हाताळली असती, असा प्रश्न निर्माण होत आहे. ज्या सिद्धांतासाठी बाळासाहेबांनी पक्ष स्थापन केला होता, उद्धव ठाकरे त्या सिद्धांतांपासून दूर जाताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यामुळं शिवसेना दोन गटात विभाजित झाली आहे.
भगवा झेंडा, हिंदुत्वामुळे सेनेला मान-सन्मान
ट्वीटरवर बाळासाहेबांनी केलेलं वक्तव्य व्हायरल होत आहे. त्यात ते म्हणतात, भगवा झेंडा आणि हिंदुत्वामुळं शिवसेनेला मान-सन्मान मिळतो. त्यामुळं याच्याशी कधी गद्दारी केली जाऊ शकत नाही. शिवसेनेला काँग्रेससारखं होऊ देणार नाही. मला माहीत आहे की, असं झालं तर मला माझी दुकान बंद करावी लागेल. देशात काही अव्यवहारिक आघाडी सरकार तयार झालीत. तरीही शिवसेनेनं आपला मतदार गमावला नाही. उत्तर प्रदेशात बसपा आणि भाजपाची सरकार आली. परंतु, मायावती यांनी आपले मतदार राखून ठेवले. परंतु, काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती केल्यामुळं मतदार शिवसेनेपासून दुरावले गेलेत, अशी सध्याची परिस्थिती आहे.
मी नसतो तर शिवसेना काँग्रेससारखी
बाळासाहेबांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात ते म्हणतात, ते राष्ट्रवादीसोबत कधीही सरकार स्थापन करणार नाहीत. बाळासाहेब व्हिडीओत म्हणतात, ज्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची सरकार पाडली. त्यांच्यासोबत सरकार स्थापन्याचा विचारही करू शकत नाही. बाळासाहेब ठाकरे म्हणतात, सोनिया गांधींसमोर नमत घेण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. मी आहे म्हणून शिवसेना आहे. मी नसतो तर शिवसेना काँग्रेससारखी झाली असती.