उद्धव-मोदींच्या भेटीनं महाराष्ट्रातलं सरकार ‘अस्थिर’ झालं, आता पवार-मोदींच्या भेटीनं काय होईल?; वाचा सविस्तर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीचे वेगळे अर्थ काढले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर राज्यातील आघाडी सरकार अस्थिर झालं होतं. (cm uddhav thackeray)

उद्धव-मोदींच्या भेटीनं महाराष्ट्रातलं सरकार 'अस्थिर' झालं, आता पवार-मोदींच्या भेटीनं काय होईल?; वाचा सविस्तर
sharad pawar
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 3:55 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीचे वेगळे अर्थ काढले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर राज्यातील आघाडी सरकार अस्थिर झालं होतं. आता पवार-मोदींच्या भेटीनं काय होईल? असा सवाल केला जात आहे. या भेटीमुळे काही राजकीय उलथापालथ होणार आहे का? की अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरच ही भेट आहे, याबाबतचा घेतलेला हा कानोसा. (what’s political meaning of sharad pawar and pm modi meet?, read inside story)

मोदी-ठाकरे तासभर चर्चा

8 जून 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. राज्यातील विविध प्रश्नावर मोदींशी चर्चा झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये एकांतात तासभर चर्चा झाली होती. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. या भेटीमुळे शिवसेना नेत्यांची भाषाही बदलली होती. शिवसेना नेत्यांनी मोदींवर टीका करण्याचं टाळलं होतं. तर भाजपवर थेट वार करणं बंद केलं होतं. भाजपनेही शिवसेनेवर थेट टीका करणं बंद करून नरमाईचं धोरण स्वीकारलं होतं. त्यामुळे शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाणार की काय अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. आता मोदी-पवार भेटीनं भाजप-राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ नको

प्रत्येक भेटीतून राजकीय अर्थ काढला तर त्यातून कोणतीही गोष्ट बाहेर येणार नाही. आज पवार भेटले. उद्या सेनेचे लोकंही मोदींना भेटतील. विविध पक्षाचे नेतेही मोदींना भेटतात. अधिवेशन आहे. त्यामुळे त्याचे राजकीय अर्थ लावायचे का?, असा सवाल ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी केला.

ऑफरवर चर्चा नसावी

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरील ही भेट असेल. सहकार खातं निर्माण झालं, त्याचं फंक्शनिंग कसं असावं यावर या भेटीत चर्चा झाली असावी. राजकीय चर्चेच्या पलिकडे अशा भेटीकडे पाहिलं पाहिजे. केंद्रीय यंत्रणेचा मुद्दाही या भेटीत आला असेल. सहकार खातं, केंद्रीय यंत्रणांची महाराष्ट्रातील कारवाई आणि लोकसभेचं अधिवेशन या पार्श्वभूमीवर ही बैठक असेल असं सांगतानाच मागच्या वेळी मोदींनी पवारांना एकत्र काम करण्याची ऑफर दिली होती. त्यावेळी त्यांनी प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे या भेटीत या विषयावर चर्चा झाली असेल असं वाटत नाही, असंही चोरमारे यांनी स्पष्ट केलं.

काहीही होऊ शकतं

मोदी-पवार यांची आज भेट झाली. त्याला राजकीय अंग आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत समन्वयाचा सर्वात मोठा दुवा शरद पवार आहेत. महाराष्ट्रातील 48 जागा आहेत लोकसभेच्या. त्यामुळे पवारांना महत्त्व आहे. त्या अनुषंगाने आतापासून तयारी असू शकते. महाराष्ट्रात उद्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या जागी भाजप रिप्लेस झाली तर आश्चर्य वाटायला नको. 2022 मध्ये पाच राज्यांच्या निकालाची वाट पाहण्याची गोष्ट करतात. महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. नाना पटोले सातत्याने पवारांना लक्ष करत आहेत. त्यामुळे काँग्रेसरहीत आघाडी महाराष्ट्रात होऊ शकते का, त्यादृष्टीनेही याकडे पाहायला हवं, असं राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी सांगितलं.

भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार नाही

या भेटीचा पॉलिटिकल अर्थ वाटत नाही. शरद पवारांनी पंतप्रधानांच्या भेटीची आधीच वेळ मागितली होती. शिवाय बँकिंग रेग्युलेशन अॅक्टबद्दल ऑगस्ट महिन्यात त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं होतं. नागरी सहकारी बँकांवर गदा आणली जाईल, आरबीआयकडून अंकूश येऊन महत्त्व कमी होईल, असं पवारांचं म्हणणं आहे. आजच्या बैठकीत यावरही चर्चा झालेली असू शकते. राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येतील असं पवारांनी कधीही संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे सध्या तशी शक्यता नाही, असं पत्रकार संजय जोग यांनी सांगितलं. (what’s political meaning of sharad pawar and pm modi meet?, read inside story)

संबंधित बातम्या:

“पूर्वी शरद पवार नरेंद्र मोदींना भेटले, महाराष्ट्रात 80 तासांचं सरकार बनलं, आता काय होईल?”

शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले, दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं

मराठा आरक्षण ते मेट्रो कारशेड, मुख्यमंत्र्यांनी मोदींपुढे मांडल्या 11 मागण्या; वाचा सविस्तर

(what’s political meaning of sharad pawar and pm modi meet?, read inside story)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.