Jitendra Awhad : शरद पवार साहेबांबद्दल बोललात तेव्हा मी बोललो, जितेंद्र आव्हाडांनी दीपक केसरकरांना करून दिली जुनी आठवण

जेव्हा तुम्ही साहेबांबद्दल बोललात तेव्हा मी उठलो. साहेबांबद्दल बोलू नका. बस, असंही जितेंद्र आव्हाड यांनी खडसावलं.

Jitendra Awhad : शरद पवार साहेबांबद्दल बोललात तेव्हा मी बोललो, जितेंद्र आव्हाडांनी दीपक केसरकरांना करून दिली जुनी आठवण
जितेंद्र आव्हाडांनी दीपक केसरकरांना करून दिली जुनी आठवणImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 5:20 PM

मुंबई : शरद पवारांबद्दल बोलल्यानं मला उठावं लागलं, असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं. पवारांबद्दलच्या जुन्या आठवणी (Memories) यावेळी आव्हाड यांनी करून दिल्या, जितेंद्र आव्हाड म्हणाले, दीपक केसरकर मी आपल्या घरी आलो होतो तो साहेबांचा निरोप घेऊन. आघाडी धर्म पाळा. आपली जवळ-जवळ अर्धातास चर्चा झाली. आपण स्पष्ट शब्दांत जी भाषा वापरली ती मी इथे लिहीत नाही. पण, मी कुठल्याही परिस्थितीत मेलो तरी चालेल. पण, राणेंचा प्रचार करणार नाही, असे सांगून आपल्या दोघांमधील संभाषण थांबले. त्यानंतर मी परत येऊन हाच निरोप आदरणीय शरद पवार साहेबांना दिला. पक्षामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहीत आहे. मी सांगितल्याशिवाय इतका मोठा निर्णय घेणार नाही. मुंबईवरुन (Mumbai) येऊन सावंतवाडीमध्ये (Sawantwadi) तुम्हांला निरोप द्यायला इतका मोठा मी पक्षामध्ये नव्हतो. त्यामुळे मला साहेबांनी निरोप दिला हे सत्य लपवू नका, असं स्पष्टपणे सांगितलं.

…तर सिंधुदुर्गात गैरसमज झाला असता

जितेंद्र आव्हाड म्हणाले, शरद कृषी भवनाच्या उद्घाटनाला आदरणीय शरद पवार साहेब आले. आपण त्या कार्यक्रमाला आलात आणि साहेबांच्या मागून चालण्याचा प्रयत्न केलात. पुढे सगळे कॅमेरावाले फोटो काढत होते. व्हिडीओ शुटींग करत होते. मी आपल्याला तिथे हटकले हे सत्य आहे. तसेही ते मला सूचित करण्यात आले होते. म्हणून मी ते काम केले. कारण, त्या फोटोवरुन पुन्हा एकदा सिंधुदुर्गामध्ये गैरसमज निर्माण झाला असता. कारण आपण जे केले होते ते उभ्या सिंधुदुर्गाला माहिती होते. तुम्हाला तेच करायचं होतं. जिल्ह्यात आणि महाराष्ट्रभर गैरसमज निर्माण करुन द्यायचे होते. तो मी नव्हेच असे चित्र तुम्हाला सिंधुदुर्गामध्ये निर्माण करायचे होते. आपल्याला हटकलं, आपल्याला बाजूला केलं. ह्याचे मला अजिबात दु:ख नाही. कारण, साहेबांचा निरोप धुडकावल्यानंतर तुम्हांला साहेबांच्या बाजूला किंवा मागे चालण्याची गरजच नव्हती. त्यामुळे केलेल्या गोष्टीची मला खंत नाही. उगाच खोटा आव आणायचा होता. तुम्हाला पक्ष सोडायचा होता. तुमचे ते आधीच ठरलेले होते. तुम्हाला फक्त कारण लागत होतं आणि ते कारण तुम्ही जितेंद्र आव्हाड यांच्यावर बिल फाडून मोकळे झालात.

अधिक इतिहासात जायला लाऊ नका

जितेंद्र आव्हाड दीपक केसरकरांना म्हणाले, हिंमत होती तर राणेंचा प्रचार करणार नाही, मी या पक्षात राहणार नाही, असा निर्णय का नाही घेतलात. अधिक इतिहासात मला जायला लावू नका. आज एवढे बोललो. याच्यानंतर परत तुमच्याबद्दल एक अवाक्षरही काढणार नाही. कारण, सत्य सांगणं ही काळाची गरज होती. ते मी आज सांगितले. तुम्ही आज मला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला म्हणून हे सत्य कथन केलं. उद्धव ठाकरेंबद्दल बोलालं तर खबरदार. ही तुमची भूमिका कौतुकास्पद आहे. आपण त्यांना 2014 साली भेटलात. पण ज्या पवारसाहेबांनी आपले आयुष्य घडविले त्यांच्याबद्दल आपण जे बोललात ते न पटल्यामुळे मी आपल्या बद्दल बोललो. गेली 7.6 वर्ष आपण मला दोष देत होतात. मी लक्ष ही देत नव्हतो. जेव्हा तुम्ही साहेबांबद्दल बोललात तेव्हा मी उठलो. साहेबांबद्दल बोलू नका. बस, असंही जितेंद्र आव्हाड यांनी खडसावलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.