जिथे चंद्रकांत पाटील सलग जिंकले, तिथे संग्राम देशमुख कसे हरले?

Pune Graduate Constituency | राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड (Arun Lad wins) यांनी दणदणीत विजय मिळवला

जिथे चंद्रकांत पाटील सलग जिंकले, तिथे संग्राम देशमुख कसे हरले?
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 11:17 AM

Pune Graduate Constituency Result | पुणे : भाजपचा बालेकिल्ला असलेला पुणे पदवीधर मतदारसंघ (Pune graduate constituency result) महाविकास आघाडीने सर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड (Arun Lad wins) यांनी दणदणीत विजय मिळवून भाजपचा (BJP) हा गड खालसा केला. त्यांनी भाजप उमेदवार संग्राम देशमुख (Sangram Deshmukh) यांचा पराभव केला. अरुण लाड यांनी पहिल्या फेरीतच 48 हजार 824 मतांनी बाजी मारली. अरुण लाड यांना एकूण 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली तर विरोधी उमेदवार संग्राम देशमुख यांना 73 हजार 321 मतं पडली. (Where Chandrakant Patil won in a row, how did Sangram Deshmukh lose?)

केवळ पुणेच नाही तर भाजपने नागपूर पदवीधरचीही जागा गमावली आहे. तिथे महाविकास आघाडीच्या अभिजीत वंजारी (Abhijit vanjari) यांनी मोठी आघाडी घेतली आहे. तर भाजपचे संदीप जोशी हे पिछाडीवर पडले.

औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीने ताकद लावून राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांची जागा राखली. सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रिक केली. या निकालामुळे पदवीधरच्या तीनही जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला. भाजपसाठी हा मोठा धक्का आहे.

चंद्रकांत पाटलांना धक्का

पदवीधर निवडणुकीचा हा निकाल म्हणजे भाजपला जसा धक्का आहे, त्यापेक्षा अधिक धक्का चंद्रकांत पाटलांना आहे. कारण ज्या पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचा किंबहुना चंद्रकांत पाटलांचा दबदबा होता, तिथेच भाजपचा उमेदवार मोठ्या फरकारने पराभूत झाला. महत्त्वाचं म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी 12 वर्षे म्हणजे दोन टर्म पुणे पदवीधर मतदारसंघाचं नेतृत्त्व केलं होतं, तिथेच भाजपचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव होणं, हा भाजपपेक्षा चंद्रकांत पाटलांसाठी सेटबॅक आहे.

संग्राम देशमुख कसे हरले?

ज्या मतदारसंघात चंद्रकांत पाटील सलग दोनवेळा जिंकले, त्या मतदारसंघात संग्राम देशमुख कसे हरले हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जाणे साहजिक आहे. चंद्रकात पाटील यांनी या मतदारसंघात पूर्ण ताकद लावली होती. काहीही करुन ही जागा राखण्याचा चंग भाजपने बांधला होता. त्यासाठी उमेदवार निवडीपासून भाजपने आखीव-रेखीव नियोजन केलं.

महाविकास आघाडीकडून अरुण लाड यांना उमेदवारी निश्चित होती. त्यामुळेच भाजपने त्या तोडीचा उमेदवार निवडला. त्यासाठी सांगली जिल्ह्यातील संग्राम देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली. पुणे पदवीधर मतदारसंघ हा पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा आहे. मात्र या मतदारसंघाची रणभूमी ही सांगली होती. कारण अरुण लाड आणि संग्राम देशमुख दोन्ही उमेदवार सांगलीचेच आहेत.

अरुण लाड यांनी सहावर्षापूर्वीच आपली ताकद दाखवली होती. त्यामुळे या निवडणुकीत ते कोणत्या तयारीने उतरले असतील याचा आपण अंदाज बांधू शकतो.

मागील निवडणुकीत काय झालं होतं?

मागील पदवीधर निवडणुकीमध्ये उमेदवारी न दिल्याने बंडखोरी करणाऱ्या अरुण अण्णा लाड यांना तब्बल 48 हजार इतकी मत पडली होती. तर राष्ट्रवादीचे तत्कालीन उमेदवार सारंग पाटील यांना 50 हजाराच्या आसपास मतं पडली होती. तर भाजपचे तत्कालीन विजयी उमेदवार चंद्रकांत पाटील यांना 52 हजाराच्या आसपास मते पडली होती. अरुण लाड यांच्या त्या वेळच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी’च्या उमेदवाराचा पराभव झाला होता.

महाविकास आघाडीचं काटेकोर नियोजन

भाजपला घेरण्यासाठी महाविकास आघाडीने काटेकोर नियोजन केलं. पश्चिम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या प्रत्येक मंत्री आणि महत्त्वाच्या नेत्यांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली. प्रत्येकाने आपआपल्या जिल्ह्यात बांधणी केली आणि महाविकास आघाडीचा विजय सुकर झाला.

सतेज पाटील-हसन मुश्रीफ जोडगोळी

पुणे पदवीधर निवडणुकीत मतदारसंघाची ओळख पुणे असली, तरी त्याची रणभूमी सांगली आणि कोल्हापूर होती. चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे, त्यामुळे त्यांना तिथल्याच मुद्द्यांवर अडकवून ठेवण्याचं काम काँग्रेस नेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ या जोडगोळीने केलं. कोल्हापुरातील स्थानिक मुद्द्यांवर सतेज पाटलांनी तर ठाकरे सरकारवरील टीकेवरुन हसन मुश्रीफांनी चंद्रकांत पाटलांना घेरलं.

संग्राम देशमुख आणि स्थानिक राजकारण

सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव या मतदारसंघातील भाजपाचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना भाजपाने पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.

पलूस-कडेगाव मतदारसंघात स्वर्गीय पतंगराव कदम आणि स्वर्गीय संपतराव देशमुख हे दोन गट अनेक वर्षे एकमेकांच्या विरोधात लढत आले आहेत. पक्ष कोणते ही असले तरी, लाड आणि देशमुख या दोन्ही गटांनी नेहमी प्रत्येक निवडणुकीत एकमेकांना मदत केली आहे. मात्र, यंदा पहिल्यांदा घराण्यातील उमेदवार एकमेकांच्या थेट समोरासमोर उभे राहिले. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार हे निश्चित होतं.

“पुणे पदवीधर मतदारसंघ हा आपल्या मालकीचा आहे असं ज्या पक्षांना वाटत होतं हे चित्र मतदारांनी यावेळी बदललं आहे. सुशिक्षित आणि खेडोपाडी गावा गावातील शहरातील मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले आहेत. मतदार नक्कीच मला विजयी करतील” असा विश्वास राष्ट्रवादीचे उमेदवार अरुणा अण्णा लाड यांनी आधीच व्यक्त केला होता, तो त्यांनी सिद्ध करुन दाखवला.

(Where Chandrakant Patil won in a row, how did Sangram Deshmukh lose?)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.