देशभरात एकच चर्चा, अमित शाहांना कोणतं मंत्रिपद?

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी आज (30 मे) संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळातील 50 सहकारीही मंत्रिपदाची शपथ घेतील. विशेष म्हणजे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचीही वर्णी केंद्रीय मंत्रिपदी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अमित शाह यांना कोणतं मंत्रिपद दिलं जाणार, याचीच चर्चा सध्या देशभर रंगताना दिसत आहे. […]

देशभरात एकच चर्चा, अमित शाहांना कोणतं मंत्रिपद?
Follow us
| Updated on: May 30, 2019 | 1:40 PM

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी आज (30 मे) संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळातील 50 सहकारीही मंत्रिपदाची शपथ घेतील. विशेष म्हणजे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचीही वर्णी केंद्रीय मंत्रिपदी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अमित शाह यांना कोणतं मंत्रिपद दिलं जाणार, याचीच चर्चा सध्या देशभर रंगताना दिसत आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना कोणतं मंत्रिपद मिळेल, या चर्चेला सध्या उधाण आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह यांना केंद्रीय गृहमंत्रिपद मिळू शकतं. विशेष म्हणजे, मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात केंद्रीय गृहमंत्रिपद पाचही वर्षे भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी सांभाळले होते.

जर केंद्रीय गृहमंत्रिपद अमित शाह यांना दिलं गेलं, तर भाजपचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंह यांच्याकडे कोणतं मंत्रिपद दिले जाणार, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

अमित शाह यांनी गुजारतमधील भाजप सरकारमध्ये गृहमंत्रिपद सांभाळलं होतं. नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत मर्जीतील आणि निकटवर्तीय मानले जाणारे अमित शाह हे आता मोदींना केंद्रात मंत्री म्हणूनही साथ देताना दिसतील.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अमित शाह यांची कारकीर्द यशस्वीपणे सुरु असताना, त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी करुन घेण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता अमित शाह यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यास, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कुणाला स्थान मिळतं, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.