Raj Thackeray : तडाखेबंद भाषणात, भडकलेल्या सीमाप्रश्नावर चकार शब्द नाही, आजच्या भाषणात राज ठाकरे यांनी सीमावादाला हातच घातला नाही..

Raj Thackeray : मनसे अध्यक्षांनी सीमावादावर काहीच वक्तव्य केले नाही..

Raj Thackeray : तडाखेबंद भाषणात, भडकलेल्या सीमाप्रश्नावर चकार शब्द नाही, आजच्या भाषणात राज ठाकरे यांनी सीमावादाला हातच घातला नाही..
सीमावादावर भाष्य नाहीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 27, 2022 | 10:24 PM

मुंबई : कर्नाटक सरकारच्या (Karnataka) अतिरेकी धोरणामुळे राज्यात गेल्या चार दिवसांपासून कन्नडिंगाविरोधात जोरदार हल्लाबोल सुरु आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी कर्नाटक सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध केला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनीही याप्रकरणी भूमिका स्पष्ट केली आहे. सीमावर्ती भागात तर या मुद्यावरुन सरळ-सरळ दोन गट पडले आहेत. या सर्व घाडमोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) त्यांच्या भाषणात कर्नाटकचा, सीमावादाचा (Border Dispute) समाचार घेतील, अशी महाराष्ट्रातील जनतेला आशा होती. पण त्यांच्या भाषणात सीमावाद पूर्णपणे दुर्लक्षित राहिला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गट अध्यक्षांचा मेळावा आज मुंबईतील नेस्को मैदानात पार पडला. त्यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या खास ठाकरी शैलीत सर्वांचाच समाचार घेतला. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींपासून राहुल गांधी, नरेंद्र मोदी, उद्योगांची पळवापळवी यावर त्यांनी टीकेची झोड उठवली.

राज ठाकरे यांनी राज्यपाल, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार प्रहार केला. उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांची तर मिमिक्री केली. राज्यातील खालावलेल्या राजकीय स्तरावर चिंता व्यक्त करत, सर्वच राजकीय पक्षांना आत्मपरिक्षण, आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला.

हे सुद्धा वाचा

पण त्यांनी सीमावादावर एक चकार शब्द काढला नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी जत तालुक्यातील 40 गावांवर, अक्कलकोटसह सोलापूर जिल्ह्यावरही दावा ठोकला आहे. त्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे कन्नडिंगाविरोधात आक्रमक भाषेचा वापर वाढला आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावर्ती भागातील गावांच्या पाणी प्रश्न सोडविण्याची भूमिका घेतली होती. बोम्मई यांनी दोन दिवसांपूर्वी सीमावर्ती भागातील कन्नड शाळांना विशेष अनुदान देण्याचीही घोषणा केली होती.

एवढेच नाहीतर ज्या कन्नड भाषिकांनी गोवा मुक्तीसाठी, स्वातंत्र्य लढ्यासाठी आणि एकीकरण चळवळीसाठी योगदान दिले, त्यांना पेन्शन लागू करण्याची घोषणा केली. राज्यभरातून कन्नड सरकारच्या या भूमिकेचा निषेध करण्यात आला.

बेळगाव, निपाणी, भालकी येथील मराठी भाषिकांची कर्नाटक सरकार गळचेपी करत आहे. त्याविरोधात दरवर्षी आंदोलन करण्यात येते. कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात येतो.

दरम्यान राज ठाकरे 29 नोव्हेंबरपासून कोकणासह कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. ते दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान राज ठाकरे सीमावादावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.