‘सुपारी बाग’ व ‘बाकडा कंपनी’ला ‘अडकित्ता बाग’चा पर्याय; कसं आहे ‘संकटमोचक’ गिरीश महाजनाचं राजकारण!

भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. (who is former minister girish mahajan?)

'सुपारी बाग' व 'बाकडा कंपनी'ला 'अडकित्ता बाग'चा पर्याय; कसं आहे 'संकटमोचक' गिरीश महाजनाचं राजकारण!
girish mahajan
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 6:43 PM

मुंबई: भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. संपूर्ण जळगावचं राजकारण या दोन नेत्यांभोवती फिरतं हे सुद्धा सर्वांना माहीत आहे. परंतु, जळगावच्या राजकारणात आणखीही दोन फॅक्टर आहेत. एक म्हणजे सुपारी बाग आणि दुसरं म्हणजे बाकडा कंपनी… या दोन्ही राजकारणाला महाजन यांनी अडकित्ता बाग निर्माण करून छेद दिला आहे, तो कसा? महाजन यांचं राजकीय कारकिर्द कशी आहे, याचा घेतलेला हा आढावा. (who is former minister girish mahajan?)

विद्यार्थीदशेपासून चळवळीत

गिरीश महाजन हे विद्यार्थीदशेपासूनच भाजपच्या राजकारणाशी जोडले गेले आहेत.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत ते सक्रिय होते. 1992 मध्ये ते जामनेर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले. ते जामनेरचे सरपंचही होते. 1988 ते 1990मध्ये ते भारतीय जनता युवा मोर्चाचे जामनेर तालुका अध्यक्ष होते.

विधानसभेवर पहिल्यांदा निवडून आले अन्

1995मध्ये महाजन पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. ते 2019मध्ये जामनेरमधून सहाव्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत. पहिल्याच निवडणुकीत त्यांचा सामना माजी आमदार ईश्वरलाल जैन यांच्या विरोधात झाला. या निवडणुकीत सुरेश जैन यांनी त्यांना मोठी मदत केली. त्यामुळे महाजन निवडून आले.

सुपारी बाग आणि बाकडा कंपनीच्या राजकारणाला छेद

जळगावचे संपूर्ण राजकारण सुपारी बाग आणि बाकडा कंपनी भोवतीच फिरत होते. सुपारी बाग हे राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मालक ईश्वरलाल जैन यांचे निवासस्थान आहे. तर मोहन धारीवाल यांच्या दुकानाबाहेर जो ईश्वरलाल जैन विरोधातील तरुणांचा गट बसायचा त्याला बाकडा गट किंवा बाकडा कंपनी म्हणत असत. या गटाचे नेतृत्व मोहन धारीवाल यांच्याकडे होते. धारीवाल हे सुरेश जैन यांचे समर्थक होते. जरी जैन यांनी पहिल्या निवडणुकीत महाजन यांना मोठी मदत केली असली तरी महाजन यांनी या दोन्ही गटाच्या पारंपारिक राजकारणाला छेद दिला. त्यांनी आपल्या निवासस्थानाल अडकित्ता बाग नाव देऊन या दोन्ही गटाला पर्याय देण्याचं काम केलं.

म्हणून लोकप्रिय झाले

महाजन हे जामनेरमध्ये प्रसिद्ध होण्यामागे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे त्यांचा लोक संपर्क. कुणाचा अपघात झाला असेल तर धावून जाणे, कुणाच मृत्यू झाला असेल तर आधी त्या ठिकाणी पोहोचणे, जामनेरमध्ये मोटारसायकलवरून फिर, चहाच्या टपरीवर चहा घेता घेता लोकांशी गप्पा मार, कट्ट्यावर बसून तरुणांशी गप्पा मार, जयंती, धार्मिक उत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी होणे, तरुणांबरोबर सार्वजनिक कार्यक्रमात ठेका धरणे आदी कारणांमुळे ते जामनेरमध्ये अधिक प्रसिद्ध आहेत.

सरकारचे संकटमोचक

विद्यार्थी चळवळीपासून राजकारणात सक्रिय असलेल्या महाजन यांनी सरपंचपदापासून ते मंत्रीपदापर्यंत मजल मारली. एवढेच नव्हे तर देवेंद्र फडणवीस सरकारचे ते संकटमोचक म्हणूनही प्रसिद्ध होते. सरकारविरोधात झालेल्या अनेक आंदोलनात त्यांनी यशस्वी तोडगा काढला. अगदी समाजसेवक अण्णा हजारे यांचे मन वळवण्यातही ते यशस्वी झाले होते.

फडणवीस-खडसे वादाचा फायदा

महाजन हे आधी एकनाथ खडसे गटाचे होते. खडसे यांनी महाजनांना राजकारणात मोठी साथ दिली. परंतु फडणवीस मुख्यमंत्री होताच महाजन फडणवीसांच्या मर्जीतले झाले. त्यातच फडणवीस-खडसे वाद निर्माण झाल्याने त्याचा महाजन यांनी फायदा घेत महाजन यांच्याशी अधिकच जवळकी साधली. गिरीश, मला कोरोना झाला तर सरकारी रुग्णालयात अॅडमिट करा, असं फडणवीस सहा महिन्यांपूर्वी म्हणाले होते. यावरून फडणवीसांचा महाजनांवर किती विश्वास आहे हे दिसून येतं.

महाजन आणि वाद

महाजन यांची लोकप्रियता जशी मोठी आहे. तसेच त्यांच्या भोवतीचे वादही मोठे आहेत. गिरीश महाजन यांच्याविरोधात जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांना डांबून ठेवून मारहाण केल्याचा आणि त्यांना खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून महाजन यांनी त्यांच्यावरील हे आरोप फेटाळून लावले आहेत. तीन वर्षांपूर्वीची ही घटना आहे. तीन वर्षांमध्ये अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांना माझ्याविरोधात गुन्हा दाखल करावा वाटला नाही. ते स्वत: मोठे वकील आहेत. तरीही त्यांनी माझ्यासह 30 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यामागचा त्यांचा हेतू स्पष्ट होतो, असं महाजन यांनी आरोप नाकारताना म्हटलं होतं.

खडसेंचे आरोप

एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांवर काही आरोप केले होते. महाजनांमुळेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी नाकारण्यात आली. आपले राजकारण संपवण्याचा कट रचला गेला, असा आरोप खडसे यांनी केला होता. देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी जाणीवपूर्वक आपले तिकिट कापले असा आरोपही त्यांनी केला होता. (who is former minister girish mahajan?)

पूर परिस्थितीची पाहणी करताना सेल्फी

सांगलीली जिल्ह्यात पूर आला होता तेव्हा महाजन पूर परिस्थिची पाहणी करण्यासाठी सांगलीला आले होते. त्यावेळी राष्ट्रीय आपत्ती दलाच्या नावेत बसून महाजन यांनी सेल्फी काढले. त्यांचे हसतानाचे आणि सेल्फी काढतानाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे ते चांगलेच ट्रोल झाले होते. विरोधकांनीही त्यांच्यावर टीका केली होती. (who is former minister girish mahajan?)

संबंधित बातम्या:

वयाच्या 13व्या वर्षी संघात, आणीबाणीत भूमिगत नेत्यांना मदत; हरिभाऊ बागडेंची दमदार इनिंग!

लाल दिव्याची गाडी, पण हक्काचं घर नाही; बच्चू कडूंचं खरं नाव माहीत आहे का?

संघ प्रचारक, कार्यालय प्रमुख ते आमदार; अतुल भातखळकरांची उंच भरारी!

(who is former minister girish mahajan?)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.