डोक्यात पंप हाणू म्हणणाऱ्या आमदार राम सातपुतेंवर स्पेशल रिपोर्ट; वाचा सविस्तर!

आधी कोरोनाकाळातील आलिशान विवाह सोहळा आणि आता थेट सरकारच्या डोक्यात कृषीपंप हाणू म्हणणारे राम सातपुते कोण आहेत? सातपुते यांच्या राजकीय करिअरवर टाकलेला हा झोत... (who is ram satpute? know about bjp mla)

डोक्यात पंप हाणू म्हणणाऱ्या आमदार राम सातपुतेंवर स्पेशल रिपोर्ट; वाचा सविस्तर!
राम सातपुते, आमदार, भाजप
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 12:31 PM

मुंबई: शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवावी या मागणीसाठी थेट कृषीपंप घेऊन भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी आज विधानभवनाच्या पायरीवर बसून जोरदार आंदोलन केलं. विधानभवनाच्या पायरीवरच सातपुते यांनी वीजबिल फाडून राज्यसरकारचा निषेध नोंदवल्याने सातपुते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आधी कोरोनाकाळातील आलिशान विवाह सोहळा आणि आता थेट सरकारच्या डोक्यात कृषीपंप हाणू म्हणणारे राम सातपुते कोण आहेत? सातपुते यांच्या राजकीय करिअरवर टाकलेला हा झोत… (who is ram satpute? know about bjp mla)

सातपुते आज चर्चेत का आले?

शेतकरी आणि घरगुती ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिल आले आहे. त्यामुळे सरकारने वीज कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली आहे. त्याचा निषेध म्हणून आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी राम सातपुते यांनी अनोखं आंदोलन केलं. सातपुते यांनी वीज कनेक्शन तोडण्याचा निषेध करणारं पोस्टर अंगात घातलं, हातात कृषीपंप घेतला आणि विधान भवनाच्या पायरीवर येऊन जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केल्या. त्यामुळे मीडियाचे कॅमेरेही तात्काळ सातपुते यांच्याकडे वळले. त्यानंतर सातपुते यांनी वीजबिल फाडून सरकारचा निषेध करत कृषीपंपच सरकारच्या डोक्यात हाणण्याचा इशारा दिला. त्याचे पडसाद विधानसभेतही उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली. त्यावर ऊर्जा विभागाशी संबंधित चर्चा जोपर्यंत सभागृहात होत नाही, तोपर्यंत घरगुती ग्राहक आणि शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्यात येणार नाही, अशी घोषणाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

कोण आहेत राम सातपुते?

राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 च्याा निवडणुकीत ते भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. ऊसतोड मजुराचा मुलगा ते थेट आमदार असा त्यांचा थरारक प्रवास आहे. अवघ्या 30 व्या वर्षी राम सातपुते हे आमदार झाले आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांचा पराभव करून ते थेट विधानसभेत पोहोचले आहेत. राम सातपुते यांनी पुण्यातून इंजिनिअरचे शिक्षण घेतले आहे. संघाच्या आणि भाजपच्या संपर्कात आलेल्या सातपुतेंना उमेदवारी देऊन देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

दुष्काळी गाव, वडील ऊसतोड कामगार

सातपुते हे माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी या दुष्काळी भागातील रहिवासी आहेत. त्यांचे मूळ गाव बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव-बीड रोडवरील डोईठाण हे आहे. त्यांचे वडील विठ्ठल सातपुते हे शंकर सहकारी कारखान्यात ऊसतोड कामगार होते. त्यांची आई जिजाबाई या सुद्धा शेतता मोलमजुरी करायच्या. 1990 ते 1995 ही पाच वर्षे विठ्ठल सातपुते यांनी या साखर कारखान्यासाठी ऊसतोडणीचे काम केले होते. परंतु मुलाला चांगलं शिक्षण मिळावं, आपला मुलगा ऊसतोड कामगार होऊ नये म्हणून त्यांनी राम यांना पुण्यात शिक्षणासाठी पाठवलं होतं. राम यांनी पुण्यात राहून मुद्रण तंत्र पदविका आणि पदवीचे शिक्षण घेतलं आहे. विठ्ठल सातपुते आजही त्यांच्या गावी चपला शिवायचे दुकान चालवतात.

विद्यार्थी चळवळीतून राजकारणास सुरुवात

पुण्यात असतानाच राम सातपुते हे अभाविपच्या संपर्कात आले होते. अभाविपच्या विद्यार्थी आंदोलनात त्यांनी सातत्याने भाग घेतला. काही आंदोलनाचं नेतृत्वही केलं. त्यामुळे अल्पावधीतच त्यांच्या युवा मोर्चाचे अध्यक्षपद आलं. भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर शहरी नक्षलवादावर त्यांनी अनेक शहरात जाऊन त्यांची भूमिका मांडली होती.

फडणवीसांचा आशीर्वाद

विद्यार्थी चळवळीत काम करत असतानाच राम सातपुते यांच्यावर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आली. त्यानंतर सातपुते हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले. भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर शहरी नक्षलवादावर शहराशहरात जाऊन भूमिका मांडल्या. त्यामुळे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. फडणवीसांनी सातपुतेंच्या डोक्यावर नुसताच हात ठेवला नाही तर निवडणुकीचं तिकीटही देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. (who is ram satpute? know about bjp mla)

पहिला विजय, तोही दणदणीत आणि खणखणीत

सातपुते यांनी माळशिरस मतदारसंघातून राष्ट्रवादीचे मातब्बर उमेदवार उत्तमराव जानकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली. कुशल संघटन कौशल्य, मतदारसंघाची जाण, प्रश्नांची समज आणि अमोघ वक्तृत्वाच्या बळावर सातपुते यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत जानकरांना पराभवाची धूळ चारली आणि आयुष्यातील पहिला दणदणीत आणि खणखणीत विजय नोंदवला. सातपुते यांना 1 लाख 3 हजार 507 मते मिळाली. तर जानकर यांना 1 लाख 917 मते मिळाली. (who is ram satpute? know about bjp mla)

कोरोना काळात लग्न, टिकेचं विघ्न

उत्तमराव जानकरांचा पराभव केल्यानंतर चर्चेत आलेले सातपुते दुसऱ्यांदा चर्चेत आले ते त्यांच्या लग्नामुळे. डिसेंबर 2020 मध्ये सातपुते यांचा पुण्याच्या शुभारंभ लॉन्सवर ग्रँड विवाह सोहळा पार पडला. कोरोना काळातही त्यांनी शाही विवाह सोहळ्याचे आयोजन केलं होतं. या लग्नाला फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यापासून ते भाजपचे आमदार-खासदार आणि दिग्गज नेते सहभागी झाले होते. लग्न सोहळ्यात केवळ 50 जणांनाचा परवानगी असताना या लग्नाला मोठी गर्दी जमली होती. यावेळी कुणीही तोंडाला मास्क लावले नव्हते, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडाला होता. कोरोना काळात लग्नावर केलेली उधळपट्टी आणि सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा यामुळे सातपुते चांगलेच अडचणीत आले होते. (who is ram satpute? know about bjp mla)

संबंधित बातम्या:

घरगुती ग्राहक आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोपर्यंत तोडणार नाही; अजित पवार यांची घोषणा

चित्रा वाघ रश्मी करंदीकर यांच्या भेटीला, फोटो मॉर्फ प्रकरणी तक्रार

भाजप आमदाराचं वीजपंपासह विधान भवनाच्या पायरीवर आंदोलन; वीजबिलही फाडलं

(who is ram satpute? know about bjp mla)

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.