Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूर्वाश्रमीचे मनसैनिक ते आताचे कट्टर काँग्रेसी, कोण आहेत कसब्याचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर?

आधी 10 वर्षे कट्टर शिवसैनिक त्यानंतर मनसैनिक आणि नंतर काँग्रेस असा त्रिकोणी प्रवास करणारे पण सामान्यांचे नेते अशी ओळख रवींद्र धंगेकर यांची आहे.

पूर्वाश्रमीचे मनसैनिक ते आताचे कट्टर काँग्रेसी, कोण आहेत कसब्याचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 1:56 PM

पुणे : खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या वर्चस्वाखालील कसबा पेठेतील भाजपचा विधानसभा मतदार संघ आज काँग्रेसच्या गुलालाने न्हाऊन निघतोय. होळीआधीच पुण्यातील कसबा पेठेत (Kasba Peth) गुलाल उधळला गेला. कारण भाजपची २८ वर्षांची सत्ता असलेला कसबा विधानसभा मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर इथे पोट निवडणूक लागली होती. भाजपने हेमंत रासने यांना इथे उमेदवारी दिली. नेहमीच्या रणनितीप्रमाणे भाजपने दिग्गजांना प्रचारात उतरवत या निवडणुकीतही पूर्ण ताकद पणाला लावली. अखेर जनतेने काँग्रेसला, महाविकास आघाडीला कौल दिला आणि रवींद्र धंगेकर विजयी झाले. 11 हजार 40 मतांनी धंगेकर यांनी विजयी आघाडी घेतली. धंगेकर यांच्या विजयात फक्त महाविकास आघाडीची आताची रणनीती नव्हे तर धंगेकर यांचा पूर्वीचा राजकीय प्रवासही कारणीभूत आहे. त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द जाणून घेणं आवश्यक आहे.

कोण आहेत धंगेकर?

  •  आधी 10 वर्षे कट्टर शिवसैनिक त्यानंतर मनसैनिक आणि नंतर काँग्रेस असा त्रिकोणी प्रवास करणारे पण सामान्यांचे नेते अशी ओळख रवींद्र धंगेकर यांची आहे.
  •  रवींद्र धंगेकर हे मागील 25 वर्षांपासून कसबा पेठेतील नगरसेवक आहेत. त्यामुळे लोकांमध्ये त्यांचा कायम वावर असतो. हाक दिली तेव्हा मदतीला धावून जाणारे नेते, अशी त्यांची ख्याती आहे.
  • धंगेकर यांनी पाच वेळ नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली. त्यापैकी दोन वेळा शिवसेना तर दोन वेळा मनसेचं प्रतिनिधित्व केलं.
  •  2009 मध्ये धंगेकर यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या गिरीश बापट यांच्याविरोधात अल्प फरकाने हार पत्करली होती. अवघ्या ७ मतांनी त्यांचा पराभव जाला. त्यावेळी ते मनसेत होते. राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू होते.
  •  2014 मध्येही रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्या लाटेपुढे धंगेकर यांचा टिकाव लागला नाही. मात्र निवडणुकीत त्यांनी कडवी झुंज दिली.
  •  शहरातील भाजपची स्थिती पाहता, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घ्यायचा निर्णय घेतला होता, मात्र भाजपमधूनच विरोध झाला आणि धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये जायचा निर्णय घेतला.
  •  2017 मध्ये धंगेकर यांनी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
  •  2019 मध्ये त्यांना विधानसभेचं तिकिट मिळण्याची आशा होती. मात्र काँग्रेसने अरविंद शिंदे यांना उमेदवारी दिली होती. इथे भाजपच्या मुक्ता टिळक यांचा विजय झाला.
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.