कोण आहेत वसिम रिझवी, जे इस्लाम सोडून हिंदू धर्माची आज दिक्षा घेणार? का वादात आहेत?
जो कुणी रिझवींचं डोकं छाटेल त्याला 10 लाख आणि हजची मोफत ट्रिप दिली जाईल असं बक्षिस बरेलीची संघटना ऑल इंडिया फैजन ए मदिना कॉन्सिलनं जाहीर केलं. 2018 मध्ये रिझवींनी मदरशांमध्ये समलैंगिक संबंध वाढतात असा आरोप केला.
शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन आणि फिल्म प्रोड्युसर वसिम रिझवी आज इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्मात प्रवेश करणार आहेत. सकाळी 10 वाजता हा समारंभ पार पडण्याची शक्यता आहे. उत्तरप्रदेशातल्या गाझियाबादमध्ये डासन देवी मंदिर आहे. त्याचे महंत यति नरसिम्हानंद गिरी महाराज हिंदू धर्माची दिक्षा देतील. पूर्ण रितीरिवाजानुसार हिंदू धर्माचा रिझवी स्वीकार करतील. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच रिझवींनी मृत्यूनंतर दफन न करता हिंदू रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार केले जावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आज थेट ते हिंदू धर्मात प्रवेश करतील.
कोण आहेत वसिम रिझवी?(Wasim Rizvi) वसिम रिझवी हे उत्तर प्रदेशातल्या शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन आहेत. पण ते त्यावेळेस खरे चर्चेत आणि वादात आले जेव्हा त्यांनी कुराणातल्या 24 आयतींवर आक्षेप घेत हटवण्याची मागणी केली. त्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल केली जी अर्थातच फेटाळली गेली. वर्ष 2000 साली रिझवी हे लखनौच्या काश्मिरी मोहल्ल्यातून समाजवादी पार्टीच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडूण आले. त्यानंतर 2008 साली ते शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे मेंबर झाले. 2012 साली त्यांची सपातून हकालपट्टी झाली. कारण होतं शिया मौलवी कल्बे जावद यांच्याशी झालेला वाद. रिझवींनी फंड घोटाळा केल्याचा आरोप होते. प्रकरण कोर्टात गेलं तिथून ते निर्दोष सुटले.
रिझवी वादात का? वसिम रिझवी हे कट्टरतावाद्यांच्या पहिल्यापासून निशाण्यावर आहेत. त्याला कारणे आहेत ती रिझवींनी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिका. कुराणातून 26 आयत हटवण्याच्या मागणीसाठी रिझवी सुप्रीम कोर्टात गेले. रिझवींचा दावा होता की, ह्या 26 आयती मुस्लिमांमध्ये हिंसेला खतपाणी घालतात आणि त्या मुळ कुराणाचा भाग नव्हत्या. त्या नंतर कुराणात जोडल्या गेलेल्या आहे. रिझवींच्या ह्या भूमिकेवार शिया आणि सुन्नी दोन्हींचे मौलवी तुटून पडले. जो कुणी रिझवींचं डोकं छाटेल त्याला 10 लाख आणि हजची मोफत ट्रिप दिली जाईल असं बक्षिस बरेलीची संघटना ऑल इंडिया फैजन ए मदिना कॉन्सिलनं जाहीर केलं. 2018 मध्ये रिझवींनी मदरशांमध्ये समलैंगिक संबंध वाढतात असा आरोप केला. एवढच नाही तर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना पत्र लिहून त्यांनी मदरशांवर बंदी घालण्याची मागणी केली. ह्या मदरशांमध्ये दहशतवादाला खतपाणी घातलं जात असल्याचा आरोप केला.
हे सुद्धा वाचा:
देशात सेमिकंडक्टरचा तुटवडा; वाहन निर्मितीवर परिणाम
06 December 2021 Panchang : कसा असेल सोमवारचा दिवस? पाहा काय सांगतय पंचांग