Deepak Kesarkar : नवा मुख्यमंत्री कोण होणार? राज भवनातून बाहेर पडल्यानंतर दीपक केसरकरांनी दिलं उत्तर

Deepak Kesarkar : महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार? हा संपूर्ण राज्याला पडलेला प्रश्न आहे. शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आज राजभवनावर जाऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी तूर्तास एकनाथ शिंदेंवर काळजीवाहू मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. सरकार कधी स्थापन होणार? या महत्त्वाच्या प्रश्नावर दीपक केसरकरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

Deepak Kesarkar : नवा मुख्यमंत्री कोण होणार? राज भवनातून बाहेर पडल्यानंतर दीपक केसरकरांनी दिलं उत्तर
mahayuti
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 12:16 PM

शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आज राजभवनावर जाऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. एकनाथ शिंदे राजभवनात गेले, त्यावेळी त्यांच्यासोबत दीपक केसरकरही होते. राजीनामा देऊन राजभवनातून बाहेर येत असताना दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. “एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे. नवीन सरकार अस्तित्वात येण्याआधी ती औपचारिकता असते” असं दीपक केसरकर म्हणाले. “काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. आजपासून ते राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील” असं दीपक केसरकर म्हणाले.

सरकार कधी स्थापन होणार? या महत्त्वाच्या प्रश्नावर दीपक केसरकर यांनी नवीन सरकार लवकरच स्थापन होईल, असं सांगितलं. “भाजपची गटनेता निवडीसाठी कदाचित उद्या बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसतील, चर्चा करतील. मग पक्ष श्रेष्ठींकडे जातील. पक्ष श्रेष्ठी जो काही निर्णय घेतील, त्यानुसार ठरेल” असं दीपक केसरकर म्हणाले.

मुख्यमंत्री कोण?

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? या प्रश्नावर दीपक केसरकर म्हणाले की, “प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची भावना असते की, आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा” तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलय, ‘जो निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह घेतील तो मान्य असेल’

‘आम्ही तिघेही एकत्र आहोत’

“भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत बैठकीला बोलावलं, तर एकनाथ शिंदे तिथे जातील. दिल्लीतले निरीक्षक इथे आले, तर म्हणजे तो भाजपाचा अंतर्गत विषय आहे, त्याबद्दल मी भाष्य करणार नाही” असं दीपक केसरकर म्हणाले. “आम्ही तिघेही एकत्र आहोत, महाराष्ट्राच्या हितासाठी हे सरकार काम करेल” असं दीपक केसरकर म्हणाले. एकनाथ शिंदे नाराज आहेत का? या प्रश्नावर दीपक केसरकर म्हणाले की, “एकनाथ शिंदे अजिबात नाराज नाहीत. भाजपचे पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल”

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.