पदवीधर विधान परिषदेसाठी कोण? अनिल परब की वरुण सरदेसाई?; ‘मातोश्री’च्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. त्यासाठी जोमाने नोंदणी सुरू आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून तरुण नेत्याला शिवसेना ठाकरे गट उतरवण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाकडून अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पदवीधर विधान परिषदेसाठी कोण? अनिल परब की वरुण सरदेसाई?; 'मातोश्री'च्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
varun sardesaiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 05, 2023 | 8:39 PM

निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 5 डिसेंबर 2023 : मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. त्यासाठी ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. ठाकरे गट या निवडणुकीसाठी कुणाला उमेदवारी देणार याची जोरदार चर्चा रंगलेली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई आणि अनिल परब यांच्या नावाचा विचार केला जातोय. दोघांचीही नावे चर्चेत असली तरी मातोश्रीतून काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात २०२४ मध्ये निवडणुका होणार आहेत. त्यासाठी जोमाने नोंदणी सुरू आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून तरुण नेत्याला शिवसेना ठाकरे गट उतरवण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामध्ये शिवसेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या नावाचा विचार सुरू आहे. तर याच मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांना सुद्धा उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यामुळे पदवीधरची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

किशोर जैन यांच्या नावाचीही चर्चा

अनिल परब यांची विधान परिषदेची टर्म जुलै 2024 मध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे अनिल परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे उमेदवार असू शकतात. मुंबई पदवीधर विधान परिषदेच्या जागेसाठीची यादी ठाकरे गटाकडून विलास पोतनीस यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर कोकण पदवीधर मतदारसंघातून किशोर जैन यांच्या नावावर विचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

म्हणून जैन यांचे नाव चर्चेत

या पदवीधर मतदारसंघांसाठी 2018 ला निवडणूक पार पडल्या होत्या. त्यामुळे आता याची टर्म संपत आल्याने लवकरच निवडणूका होणार आहेत. कोकण मतदारसंघातून निरंजन डावखरे यांच्या विरोधात कोकणातील ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख आणि अनंत गीते यांचे विश्वासू शिवसैनिक किशोर जैन यांच्या नावाची वर्णी लागण्याची सूत्रांची माहिती आहे. आदित्य ठाकरे यांच्या नुकत्याच पार पडलेल्या कोकण खळा बैठका पार पडल्या होत्या.

कोकण आणि मुंबईच्या अहवालाची जबाबदारी ही किशोर जैन यांच्यावर होती. त्यामुळे जैन त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या निवडणुकीसाठी मतदारांची प्रारूप यादी 23 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत या याद्यांवर हरकती मागविण्यात येत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.