काँग्रेसच्या कोणत्या नेत्याला मिळणार विरोधी पक्षनेतेपद? 5 नावे चर्चेत, सहाव्याची एन्ट्री; आज सुटणार पेच

पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हे तिन्ही नेते अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. संघटनेवर त्यांची पकड आहे. त्यामुळे या पैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या कोणत्या नेत्याला मिळणार विरोधी पक्षनेतेपद? 5 नावे चर्चेत, सहाव्याची एन्ट्री; आज सुटणार पेच
sangram thopteImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 17, 2023 | 9:47 AM

मुंबई | 17 जुलै 2023 : राज्याचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि राज्यातील राजकीय समीकरणात झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर आजपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सत्तेत सहभागी झाल्याने शरद पवार यांचा गट अल्पमतात आला आहे. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे जाणार आहेत. या पदासाठी काँग्रेसमधील पाच नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे या पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार त्यांचा विरोधी पक्षनेता आणि विधान परिषदेची विरोधी पक्षनेता असं सूत्र ठरलेलं आहे. त्यामुळे विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद आपसूकच काँग्रेसकडे जाणार आहे. काँग्रेसने नकार दिला तरच ते राष्ट्रवादीकडे राहू शकतं. मात्र, तसं होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आज विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा करतील. अध्यक्ष कोणत्या नावाची विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा करतात आणि काँग्रेसने कुणाच्या नावाची शिफारस केलीय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

पाच नावांची चर्चा

सध्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी पाच नावे चर्चेत आहेत. मात्र. या दावेदारीत सहाव्याचीही एन्ट्री झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातील दोघे माजी मुख्यमंत्री आहेत. पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे दोन्ही माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेतेपदाच्या स्पर्धेत आहेत. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि आमदार विजय वडेट्टीवार हे तिन्ही नेते विरोधी पक्षनेतेपदाच्या चर्चेत आहेत. नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यांना पद दिल्यास पक्षाला नवा प्रदेशाध्यक्ष शोधावा लागणार आहेत. निवडणुका तोंडावर असल्याने पटोले यांना हटवण्याची रिस्क पक्ष नेतृत्व घेण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पटोले यांना विरोधी पक्षनेते पद मिळणं अशक्य आहे.

पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हे तिन्ही नेते अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. संघटनेवर त्यांची पकड आहे. त्यामुळे या पैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. विजय वडेट्टीवार हे आक्रमक नेते आहेत. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेते पद मिळण्याची शक्यता आहे. तर काही सूत्रांच्या मते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची पक्षांवर पकड अधिक असल्याने हे पद त्यांच्याकडे जाण्याची शक्यता अधिक आहे. आता प्रत्यक्षात हे पद कुणाकडे जाणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.

संग्राम थोपटे चर्चेत

दरम्यान, संग्राम थोपटे यांचं नावही विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चेत आहे. थोपटे यांनीही आपली दावेदारी सांगितली आहे. त्यामुळे या सहाव्या दावेदाराकडे हे पद जातं का? हे पाहावं लागणार आहे. थोपटे यांनी तर थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे एक प्रस्ताव पाठवला आहे. मलाच विरोधी पक्षनेता करा, अशी मागणी त्यांनी खरगे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे खरगे कुणाकडे या पदाची जबाबदारी देतात हे पाहावं लागणार आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.