Pandharpur Result : भारत भालके की समाधान आवताडे ?, पंढरपूरच्या विजयाचा गुलाल कुणाचा?; काऊंटडाऊन सुरू
pandharpur mangalwedha bypoll election result 2021 राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. (who will win in Pandharpur Assembly by-Election?, tomorrow counting)
पंढरपूर: राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या निवडणुकी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (who will win in Pandharpur Assembly by-Election?, tomorrow counting)
राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं निधन झाल्याने पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं. या निवडणुकीत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली. भालके यांच्या उमेदवारीला शिवसेना आणि काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. तर भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन्ही पक्षांनी मोठी ताकद लावली होती. या पोटनिवडणुकीसाठी एकूण 340889 मतदारांपैकी 225498 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण 66.15 टक्के मतदान या पोटनिवडणुकीसाठी झालं. पंढरपुरात प्रचंड मतदान झाल्याने या निवडणुकीत कोण विजयी होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
सकाळी 8 वाजता मतमोजणी
रविवारी सकाळी 8 वाजता पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू होणार आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत या निवडणुकीचं चित्रं स्पष्ट होईल. तसेच दुपारी 3 वाजेच्या आत या निवडणुकीचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या नियमांचं पालन करूनच मतमोजणी होणार असल्याने निकाल हाती येण्यास उशिर होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
एक्झिट पोल काय सांगतो?
या निवडणुकीनंतर पुण्याच्या ‘द स्ट्रेलेमा’ या संस्थेने एक्झिट पोल जाहीर केला आहे. त्यानुसार भगीरथ भालके यांना 95508, समाधान आवताडे यांना 98946, अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे यांना 7124, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे यांना 8619, अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना 6596 आणि इतरांना 8693 मते मिळणार आहे. एक्झिट पोलनुसार समाधान आवताडे हे 3438 मताधिक्य घेऊन विजयी होणार असल्याचं म्हटलं आहे. म्हणजे दोन टक्के मतांनी आवताडे यांचा विजय होताना दिसत आहे. उपलब्ध संसाधने आणि सहानूभूती या स्पर्धेत संसाधनांनी सहानूभूतीवर मात केल्याचंही या निष्कर्षात नमूद केलं आहे.
कुणाला किती टक्के मतदान?
एक्झिट पोलनुसार समधान आवताडे यांना पंढरपूर शहरात 45 टक्के, पंढरपूर ग्रामीणमध्ये 36 टक्के आणि मंगळवेढ्यात 46 टक्के असे त्यांना सरासरी 44 टक्के मतदान होताना दिसत आहे. तर भगीरथ भालके यांना पंढरपूर शहरात 47 टक्के, पंढरपूर ग्रामीणमध्ये 43 टक्के आणि मंगळवेढ्यात 40 टक्के असे त्यांना सरासरी 42 टक्के मतदान होताना दिसत आहे. तर सिद्धेश्वर आवताडे यांना सरासरी 3 टक्के, सचिन शिंदे यांना सरासरी 4 टक्के, शैला गोडसे यांना सरासरी 3 टक्के आणि इतरांना सरासरी 4 टक्के मतदान होताना दिसत आहे. (who will win in Pandharpur Assembly by-Election?, tomorrow counting)
महाफास्ट न्यूज 100 | MahaFast News 100 | 7 AM | 1 May 2021 https://t.co/eG83Jcs9Yz #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 1, 2021
संबंधित बातम्या:
आवताडे जिंकणार की भालके? काय आहे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचं गणित? वाचा सविस्तर
चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का? अजित पवारांनी पाटलांना पुन्हा डिवचलं
(who will win in Pandharpur Assembly by-Election?, tomorrow counting)