‘मिशन बंगाल’: ‘वाघीण’ सरस ठरणार की ‘कमळ’ फुलणार; वाचा पश्चिम बंगालचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट!

निवडणूक आयोगाने पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या आहेत. (whole scenario of west bengal politics for 2021 assembly election)

'मिशन बंगाल': 'वाघीण' सरस ठरणार की 'कमळ' फुलणार; वाचा पश्चिम बंगालचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट!
ममता बॅनर्जी
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 4:56 PM

कोलकाता: निवडणूक आयोगाने पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या आहेत. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात निवडणुका होत आहेत. त्यापैकी पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडूच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे या तिन्ही राज्यांमध्ये भाजपचं उपद्रव्यमूल्य काहीच नसल्याने भाजपने या तिन्ही राज्यांकडे विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यातही भाजपने पश्चिम बंगालवर अधिक फोकस केला आहे. पश्चिम बंगालचं राजकारण काय सांगतं? तिथलं पक्षीय बलाबल काय आहे? भाजप खरोखरच पश्चिम बंगाल सर करणार का? आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाजपला कसं तोंड देणार? याचा घेतलेला हा आढावा. (whole scenario of west bengal politics for 2021 assembly election)

पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात मतदान होणार आहे.

पहिला टप्पा – 27 मार्च, 30 जागा दुसरा टप्पा – 1 एप्रिल, 20 जागा तीसरा टप्पा – 6 एप्रिल, 31 जागा चौथा टप्पा – 10 एप्रिल, 44 जागा पाचवा टप्पा – 17 एप्रिल, 45 जागा सहावा टप्पा – 22 एप्रिल, 43 जागा सातवा टप्पा – 26 एप्रिल, 36 जागा आठवा टप्पा – 29 एप्रिल, 25 जागा मतमोजणी आणि निकाल – 2 मे रोजी

पश्चिम बंगालची राजकीय स्थिती काय?

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 211 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती. तर काँग्रेसला 44, डाव्या पक्षांना 26 आणि भाजपला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता.

जातीय समीकरण

पश्चिम बंगालमध्ये 70.54 हिंदू मतदार आहेत. तर 28 ते 30 टक्के मुस्लिम मतदारांची संख्या आहे. त्या शिवाय ब्राह्मण केवळ तीन टक्के आहेत. मात्र लोकसंख्या कमी असली तरी बंगालच्या राजकारणावर ब्राह्मणांचा प्रभाव अधिक आहे. डाव्यांपासून ते काँग्रेस ते टीएमसीपर्यंत सर्वच पक्षात ब्राह्मणांचा दबदबा अधिक आहे. त्याशिवाय दलितांमधील मतुआ ही जातही पश्चिम बंगालमधील अत्यंत महत्त्वाची मानली जाते. 2011च्या जनगणनेनुसार राज्यात दलितांची लोकसंख्या 1.84 कोटी आहे. त्यात मतुआ समुदायाची संख्या सर्वाधिक आहे. त्यांचं राजकारणातलं उपद्रव्यमूल्यही अधिक आहे. राज्यातील 9.9 कोटी लोकसंख्येत दलितांची लोकसंख्या 29 टक्के आहे. ही व्होट बँक डाव्यांची मानली जाते. मात्र, 2007 नंतर टीएमसीने ही व्होटबँक आपल्याकडे आणण्यात यश मिळविले होते. पश्चिम बंगालमध्ये 84 जागा या दलितांसाठी राखीव आहेत.

ओवेसी फॅक्टर

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ओवेसी फॅक्टरही चर्चेत आला आहे. ओवीसींच्या एमआयएमने बिहार विधानसभा निवडणुकीत पाच जागा जिंकल्या. त्यामुळे ओवीसींच्या पश्चिम बंगालमधील भूमिकेची जोरदार चर्चा सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांची संख्या 30 टक्के आहे. 294 जागांपैकी 110-110 जागांवर मुस्लिमांचं मतदान निर्णायक आहे. पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांनी नेहमीच डाव्यांना साथ दिली आहे. त्यानंतर मुस्लिमांनी ममता बॅनर्जींच्या पारड्यात मतं टाकली. आता ओवेसी आल्याने मुस्लिम समाज काय भूमिका घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ओवेसी जेवढी मुस्लिमांची मते फोडतील तेवढाच भाजपला अधिक फायदा होणार आहे. तर ममता बॅनर्जींना मोठं नुकसान सोसावं लागणार आहे. मात्र, डाव्यांनी काही चमत्कार केल्यास ममता, ओवेसी आणि भाजपला धक्का बसू शकतो, असंही राजकीय जाणकार सांगतात.

46 दिवसात 11 नेते बाहेर

हल्दर यांच्यामुळे टीएमसी सोडून जाणाऱ्या नेत्यांची संख्या 11 झाली आहे. गेल्या 46 दिवसात 11 नेत्यांनी टीएमसीला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे टीएमसीचे धाबे दणाणले आहेत. येणाऱ्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये येणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते विकास कामांचं उद्घाटन केलं जाणार आहे. त्यावेळीही टीएमसीमधून अनेक नेते भाजपमध्ये सहभागी होतील, असं सांगितलं जात आहे. टीएमसीला सोडचिठ्ठी देणाऱ्यांमध्ये चार मंत्र्यांचाही समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असलेल्या राजीव बॅनर्जी यांनी वन मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना मोठा झटका मानला जात आहे. यापूर्वी सुवेंदू अधिकारी आणि क्रीडा राज्यमंत्री लक्षमी रतन शुक्ला यांनी ममता बॅनर्जी मंत्रिमंडळातून मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तर पक्षावर सातत्याने टीका केल्याने टीएमसीने आमदार वैशाली दालमिया यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत नेते, मंत्री, आमदार पक्षाला सोडून जात असल्याने ममता बॅनर्जी यांच्यासमोरची डोकुदुखी वाढली आहे. विशेष म्हणजे राजीनामा देणारे सर्वचजण डाव्या पक्षांचा पर्याय असताना भाजपमध्ये जात असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राजकीय इतिहास काय सांगतो?

स्वाभिमान आणि क्रांतीसाठीही बंगालची विशेष ओळख आहे. खुदीराम बोस ते नेताजी सुभाषचंद्र बोस यासारख्या स्वातंत्र्यवीरांची ही भूमी आहे. पश्चिम बंगालचं राजकारण सर्वात हिंस्र राजकारण म्हणून ओळखलं जातं. राडा आणि रक्तपात हे ठरलेलं आहे. बंगालला राजकीय हिंसेची परंपरा आहे. त्याची सुरुवात व्हॉईसरॉय लॉर्ड कर्जन यांच्या 1905 मधील बंगाल विभाजनाच्या निर्णयापासून सुरु आहे ती आजतागायत आहे. त्यानंतर स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत हिंसक घडामोडी बंगालमध्ये घडतच आहेत. बंगालमध्ये अनेक वर्षे डाव्यांनी राज्य केलं. कम्युनिस्ट पक्षांच्या सत्ताकाळात रक्तपात व्हायचेच ते ममता बॅनर्जींच्या काळातही सुरुच असल्याचं चित्र आहे. मागील वर्षी अमित शाह हे पश्चिम बंगाल दौऱ्यावर होते त्यावेळीही त्याची प्रचिती आली होती. अमित शाहांच्या रोड शोमध्ये तुफान राडा झाला होता. रोड शोमध्ये दगडफेक करुन जाळपोळही केली होती. ही सर्व पार्श्वभूमी पाहता भाजपचं मिशन बंगाल कसं वर्कआऊट होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये नक्षलवाद्यांचं मोठं जाळं आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल नेहमीच धगधगत असतं. 60च्या दशकापासून ते 80 च्या दशकापर्यंत पश्चिम बंगालचा इतिहास हा हिंसेचा इतिहास मानला जातो. 1977मध्ये काँग्रेसची सत्ता जाऊन डाव्यांची सत्ता आली. त्यानंतर 2011 पर्यंत डावे सत्तेत होते. त्यामुळे पश्चिम बंगालमधील हिंसाचार कमी झाला होता. मात्र, प्रत्येक निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये हिंसा होत असते, याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही.

राजकीय गणित काय?

पश्चिम बंगालमध्ये 294 सदस्यांची विधानसभा आहे. 2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने तब्बल 219 जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवलं होतं. या विजयासाठी ममता बॅनर्जींनी सलग दुसऱ्यांदा बंगालमध्ये सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी काँग्रेसला केवळ 23, डाव्यांना 19 आणि भाजपला 16 जागाच मिळाल्या होत्या. आता भाजप आपल्या 16 जागांवरुन किती जागांवर विजय मिळवते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (whole scenario of west bengal politics for 2021 assembly election)

बंगालमधील पक्षीय बलाबल (2016)

तृणमूल काँग्रेस -219 काँग्रेस -23 डावे – 19 भाजप – 16 एकूण – 294  (whole scenario of west bengal politics for 2021 assembly election)

संबंधित बातम्या:

पाच राज्यांत आजपासून प्रचाराचं ‘तांडव’; पश्चिम बंगाल, आसाममध्ये 27 मार्चला, तर केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरीत 6 एप्रिल रोजी मतदान, 2 मे रोजी निकाल!

पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांचा बिगूल आज वाजणार; निवडणूक तारखांची घोषणा होण्याची शक्यता

बंगालमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचा भाजपात प्रवेश, मॉडेलिंग ते राजकारण, जाणून घ्या तिची सविस्तर कहाणी

तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय आहात तर केंद्र सरकारचे हे नवे नियम तुमच्यासाठी !

(whole scenario of west bengal politics for 2021 assembly election)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.