शिवसेना कुणाची..? सुधीर मुनगंटीवारांनी वर्तवलेले अंदाज खरे ठरणार का..!
गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबईत शिंदे गट आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यामध्ये राडा झाला होता. त्यावरुन सत्तेत येताच शिंदे गट आणि भाजपाकडून अरेरावीची भाषा केली जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. मात्र, शिवसेना नेत्यांनी यापूर्वीच आमचा पक्ष हा गुंडांचा पक्ष असल्याचे जाहिर केले आहे.
मुंबई : राज्यात (Eknath Shinde) शिंदे सरकारची स्थापना होऊन तीन महिने होत आले तरी, (Shivsena Party) शिवसेना कुणाची हे निश्चित झालेले नाही. याबाबत शिंदे गट आणि शिवसेना पक्षाने कोर्टात धाव घेतली आहे. शिवाय दिवसेंदिवस यावरील सुनावणी देखील लांबणीवर पडत आहे. असे असताना दुसरीकडे मात्र, राजकीय नेते हे शक्यता वर्तवण्यात दंग आहेत. आता (Sudhir Mungantiwar) मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वेगळाच अंदाज मांडला आहे. लोकशाहीत बहुमत कुणाचे हे पाहिले जाते. तर बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणारीच खरी शिवसेना असल्याचे म्हणत त्यांनी शिंदे गटाकडे कल दिला आहे. तर अर्जासोबत जे प्रश्न विचारले गेले आहेत, त्यावरही बरेच काही अवलंबून असल्याचे ते म्हणाले आहेत.
भाजपा नव्हे शिवसेनेचा गुंडाचा पक्ष
गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबईत शिंदे गट आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यामध्ये राडा झाला होता. त्यावरुन सत्तेत येताच शिंदे गट आणि भाजपाकडून अरेरावीची भाषा केली जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. मात्र, शिवसेना नेत्यांनी यापूर्वीच आमचा पक्ष हा गुंडांचा पक्ष असल्याचे जाहिर केले आहे. त्याला दानवे यांनी शिक्कामोर्तब केल्याचे मुनगंटीवार म्हणाले आहेत.
‘हा’ तर मॅनेजमेंटचा भाग
मुख्यंत्र्यांच्या पैठण येथील सभेला पैसे देऊन गर्दी केल्याचा आरोप होत आहे. पण हे सर्व आरोप शिंदे गटानेच नाहीतर आता भाजपानेही फेटाळले आहेत. हा विषय मॅनेजमेंटचा असल्याचे म्हणत हे सर्व घडून आणल्याते मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री हे गावोगावी शिवसेना वाढवत आहेत. त्यामुळेच विरोधकांना दु:ख होत असून यातूनच हे होत आहे. मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता कमी काळात अधिक झाल्याचे हे परिणाम पाहवयास मिळत असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.
म्हणून तर अफवा पसरवली जात आहे
भाजपा हे दंगली घडवणार ही अफवा पसरवण्यामागेही राजकारण आहे. यातून त्यांना मुस्लिमांच्या मनात भिती निर्माण करायची आहे. एवढेच नाही तर त्यांच्या हातामध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेचा झेंडा द्यायचा असल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.