अजितदादा यांच्या बंडामागे भुजबळ?, छगन भुजबळ यांनी उघड केल्या पडद्यामागच्या घडामोडी; म्हणाले, शरद पवार यांचा…

अडीच अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदावरून ठाकरे आणि फडणवीस यांच्यात वाद झाला. तेव्हा भाजपने सांगितलं आम्ही शिवसेनेला सोडतो तुम्ही येणार ना? होकार मिळाल्याने भाजपने शिवसेनेला सोडलं.

अजितदादा यांच्या बंडामागे भुजबळ?, छगन भुजबळ यांनी उघड केल्या पडद्यामागच्या घडामोडी; म्हणाले, शरद पवार यांचा...
chhagan bhujbalImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 12:30 PM

चैतन्य मनिषा अशोक, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्याने राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. या बंडामागे छगन भुजबळ असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकच्या येवल्यातूनच जाहीर सभेला सुरुवात केली आहे. भुजबळ यांना कोंडीत पकडण्यासाठी शरद पवार यांनी ही बैठक घेतल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांचा हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. मी या बंडामागे नाही, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.

शरद पवारांना वाटतं हे सर्व भुजबळांनी घडवून आणलं. हा त्यांचा चुकीचा समज आहे, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं. त्यानंतर शरद पवार यांनी भाजपसोबत चर्चा करून कशी कशी माघार घेतली याची माहितीही दिली. 2014 मध्ये भाजपने शिवसेनेला सोडलं. तेव्हा पवारांनी भाजपला सांगितलं होतं की, तुम्ही शिवसेना सोडली की आम्ही काँग्रेसला सोडू. काही महिन्याने आम्ही भाजपच्या सरकारमध्ये येऊ. नंतर राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. नंतर शरद पवारांनी अचानक भाजपला सांगितलं, आमचा पाठिंबा गृहित धरू नका. त्यानंतर फडणवीस यांनी शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन केलं, असं छगन भुजबळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा

शिवसेना नको होती

शरद पवार आणि पक्षाच्या नेत्यांच्या भाजप सोबत ज्या ज्या चर्चा झाल्या त्या चर्चेत मी नव्हतो. प्रफुल्ल पटेल वगैरे ही मंडळीच चर्चा करत होती. 2017मध्ये शरद पवार यांनी भाजपशी युतीची चर्चा करून माघार घेतली, अजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितलं. या चर्चा झाल्या तेव्हा मी तुरुंगात होतो. उद्योगपतीच्या घरी पाच दिवस चर्चा झाली. खाते ठरली. तेव्हा सरकारमध्ये शिवसेना नको, असा आग्रह शरद पवार यांनी धरला. पवारांकडून शिवसेनेला बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. 2014लाही तेच झालं. शिवसेनेला बाहेर काढ म्हणून सांगण्यात आलं. पण शिवसेना 25 वर्षापासूनचा मित्र पक्ष असल्याने भाजपने त्यास नकार दिला, असं भुजबळ म्हणाले.

मलाच दोष देता

2019मध्ये शरद पवार मोदींना भेटले. त्यांच्याशी युतीचं ठरवून आले. निवडणुकीनंतर भाजपशी समझोता करायचा ठरलं. अडीच अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदावरून ठाकरे आणि फडणवीस यांच्यात वाद झाला. तेव्हा भाजपने सांगितलं आम्ही शिवसेनेला सोडतो तुम्ही येणार ना? होकार मिळाल्याने भाजपने शिवसेनेला सोडलं. या सर्व चर्चेत मी नव्हतो. मला कधीच शरद पवार यांनी कोणत्याही चर्चेत पाठवलं नाही. मी गेलोच नाही. तुम्हीच हे सर्व केलं आणि मलाच दोष देता? असा सवाल त्यांनी केला.

माझ्यावर राग काढण्याचं कारण काय?

बडोद्याला भाजपसोबत मिटिंग ठरली. जाताना जयंत पाटील सांगायला गेले जातो म्हणून. त्यावेळी शरद पवार म्हणाले, जाऊ नको. 2019ला सांगितलं भाजपसोबत सरकार करायचं. अजित पवार यांच्यासमोर ठरलं. अचानक तुम्ही घुमजाव केलं. त्यानंतर अजित पवारांनी शपथ घेतली. हा प्रकार मला माहीतच नाही. मग येवल्याचा राग माझ्यावर काढायचं काय कारण? उलट भुजबळच सर्व ठिकाणी लढत होता, असंही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.