Chandrashekhar Bawankule : सरकार स्थापन व्हायला वेळ का लागतोय? महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिलं उत्तर

Chandrashekhar Bawankule : एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या प्रश्नावर सुद्धा महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं. महाराष्ट्रात महायुतीला पूर्ण बहुमत मिळालय. पण सरकार स्थापन व्हायला वेळ लागतोय. त्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. अनेक प्रश्न आहेत, त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बोलले आहेत.

Chandrashekhar Bawankule : सरकार स्थापन व्हायला वेळ का लागतोय? महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिलं उत्तर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
Follow us
| Updated on: Nov 27, 2024 | 11:12 AM

“नांदेडमध्ये ईव्हीएम चांगलं होतं. नांदेडमध्ये आम्ही 1500 मतांनी हरलो. तुम्ही जिंकलात. खरच हा खोटारडेपणा आहे. पराभव स्वीकारुन आत्मचिंतन करा. आम्ही लोकसभेला हरल्यानंतर आत्मचिंतन केलं. शिकलो, त्यातून पुढे गेलो. बूथवर काम केलं. मतदान केंद्रापर्यंत जाऊन जनतेला भेटलो. मतांची टक्केवारी वाढली” असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. “मोठ्या प्रमाणात जनतेने मतदान केलं. लोकसभेनंतर जनतेने मोठ्या प्रमाणात मतदान केलं. विरोधक खोटारडेपणा करतील. दोन-चार दिवस झोप लागणार नाही. झोप लागल्यानंतर डोकं शांत राहील” अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

दिल्लीतून भाजपचे निरीक्षक 29 तारखेला येणार आहेत का? या प्रश्नावर ‘अजून निरोप आलेला नाही. निरोप आला की, तुम्हाला कळवू’ असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. कधीपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा स्पष्ट होईल? यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “आघाडीमध्ये वेळ लागतो. त्यांच्याकडे किती मंत्रीपद, आमच्याकडे किती मंत्रीपद? आकडा काय असेल? कोणाकडे कुठली खाती असतील? पालक मंत्री कोण असतील? याचं सूत्र तयार करावं लागेल. नुसता मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याच्या शपथविधीने होत नाही” “त्यांच्याकडे कुठली खाती, आमच्याकडे कुठली खाती यामध्ये काही काळ जाईल, लवकरच सरकार बनेल” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. “तीन पक्षाची मंत्रिपदं, पालकमंत्री, खाती या सर्वबाबींचा सरकार बनवताना विचार करावा लागतो. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सरकार बनत नाही” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

सरकार नोव्हेंबरमध्ये बनणार की….

सरकार नोव्हेंबरमध्ये बनणार की, डिसेंबर उजाडणार? यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी याला काही पॅरामीटर नाही असं उत्तर दिलं. “सध्या एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. आमच्यासोबत असलेले तिन्ही पक्ष, घटक पक्ष यांचं मत विचारात घ्यावं लागेल. सरकार पूर्ण क्षमतेने बनेल. सर्व पक्षांना न्याय देणार सरकार बनेल” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. एकनाथ शिंदे नाराज आहे? त्यांनी गृहमंत्रीपद मागितलं, त्यांनी उपमुख्यमंत्रीपद, केंद्रात मंत्रीपद नाकारलं? ‘त्या बद्दल मला माहित नाही’ असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.