राजकारणी किंवा नेते नेहमी पांढऱ्या रंगाचेच कपडे का घालतात? कारण ऐकून आश्चर्य वाटेल

पाढंऱ्या रंगाच्या कपड्यांबद्दल अनेक मतं आणि विचार आहेत. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, राजकारणी आणि नेतेमंडळी नेहमी पांढऱ्या रंगाचेच कपडे का घालतात? कारण ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

राजकारणी किंवा नेते नेहमी पांढऱ्या रंगाचेच कपडे का घालतात? कारण ऐकून आश्चर्य वाटेल
Follow us
| Updated on: Dec 16, 2024 | 3:51 PM

भारतात पांढऱ्या रंगाला फार महत्त्व आहे. तसेच रंगाचा माणसाच्या व्यक्तिमत्वावर खूप परिणाम होत असतो असंही म्हटलं जातं. पांढरा रंग शांतता, पवित्रता आणि शिक्षणाचे प्रतीक मानला जातो. यामुळे मनाला शांतता देखील मिळते.

नेते नेहमी पांढरे कपडे का घालतात?

हिंदू धर्मानुसार पांढऱ्या रंगाला फार महत्त्व आहे. विद्येची देवी सरस्वतीचा पोशाखही पांढरा असतो. तसेच काही मान्यतांनुसार शोक व्यक्त करण्यासाठीही पांढरे कपडे घातले जातात. मात्र त्यामुळे असा प्रश्न पडतो की, पांढरे कपडे शोकासाठी वापरले जात असतील तर भारतातील नेते नेहमी पांढरे कपडे का घालतात? असा प्रश्न नक्कीच कधीना कधी पडला असेलच ना. तर, याचे कारण हे अगदी स्वातंत्र्य काळापासून पुढे आलेलं आहे. जाणून घेऊयात नेमकं याचं कारण काय आहे ते?

स्वातंत्र्य काळापासून पांढरे कपडे घालण्याची प्रथा

भारताच्या स्वातंत्र लढ्यात आणि चळवळीमध्ये विदेशी कपड्यांवर बहिष्कार टाकण्यात आला होता. त्यावेळी सर्व भारतीयांनी स्वदेशी कापड परिधान न करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा सर्वांनी खादीपासून बनवलेले कपडे घालण्याचा निर्णय घेतला होता. खादीपासून बनवलेले हे कपडे बहुतेक पांढऱ्या रंगाचे होते.

त्यामुळे त्यावेळी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यवीर, नेते आणि सर्व भारतीय हेच पांढरे कपडे घालू लागले. आणि कालांतराने हाच रंग नेत्यांची ओळख बनला. तो पुढेही फॉलो केलं जाऊ लागलं.. तेव्हापासून राजकारणी फक्त पांढऱ्या रंगाच्या कपडे घालताना दिसतात असं म्हटलं जातं.

महात्मा गांधींनी केलेले आवाहन

दरम्यान या रंगाचे कपडे घालण्याचे आवाहन महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढ्यात सर्व भारतीयांना केले होते. कारण गांधीजींच्या मते पांढरे कपडे म्हणजे खादीचे कपडे हे केवळ स्वदेशीचे प्रतीक नसून यामुळे अनेकांना रोजगार मिळण्यास मदत होत होती.

त्यामुळे गांधीजींनी सर्व भारतीयांना खादीचे कपडे घालण्याचे आवाहन केले होते. गांधीजींच्या या आवाहनाला सर्वांनी पाठिंबा दिला आणि त्यानंतरही बऱ्याच प्रमाणात भारतीयांनी खादीचे कपडे घालण्यास सुरुवात केली.

पांढऱ्या रंगामुळे नेतृत्वाची जाणीव

या पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्याची परंपरा किंवा सुरुवात ही स्वातंत्र्य काळातील नेतेमंडळींपासून झाली आणि ती आजतागायत तशीच असलेली दिसून येते. कारण आजही राजकारणी किंवा नेतेमंडळी आवर्जून खादीचे, पांढरे कपडे घालताना दिसतात. शिवाय नेता किंवा एखादा राजकारणातील व्यक्ती म्हटलं की नेतृत्व करणे, त्याच्या व्यक्तीमत्त्वातून ती लीडरशीप दिसणे अपेक्षित असते आणि महत्त्वाचेही असते.

जेव्हा एखादा राजकारणी पांढरे रंगाचे कपडे घालतात तेव्हा पांढऱ्या रंगामुळे त्यांच्यात नेतृत्वाची जाणीव निर्माण होते. पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये त्यांचा साधेपण उठून दिसतो. जनतेमधला आणि त्यांच्यातील फरक जाणवू देत नाही. यामुळेच भारतीय नेते आणि बहुतांश समाजसेवक पांढरे कपडे घालतात.

तसेच पांढरा रंग हा सर्व धर्म आणि सर्व जातीच्या लोकांना एकत्रित करण्याचा प्रतीक आहे. यातून शांती आणि एकात्मतेचा संदेश मिळतो. तसेच पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक अन् पवित्र असा रंग मानला जातो. म्हणूनच बऱ्याचदा आपल्या संस्कृतीमध्ये काही धार्मिक विधींमध्ये पांढरा रंग आवर्जून परिधान केला जातो.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.