‘गांधीजींची हत्या करणाऱ्याला हिरो बनवलं जात असेल तर तीव्र विरोध करु’, अमोल कोल्हेंच्या त्या चित्रपटाविरोधात काँग्रेस आक्रमक

अमोल कोल्हेंनी कलावंत म्हणून गोडसे साकारला असेल तर ते गांधीविरोधक ठरत नाहीत, असा शब्दात शरद पवार यांनी कोल्हेंची पाठराखण केलीय. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटाचा निषेध केलाय. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या चित्रपटाला तीव्र विरोध केला आहे.

'गांधीजींची हत्या करणाऱ्याला हिरो बनवलं जात असेल तर तीव्र विरोध करु', अमोल कोल्हेंच्या त्या चित्रपटाविरोधात काँग्रेस आक्रमक
अमोल कोल्हे यांच्या नथुराम गोडसेच्या चित्रपटाला नाना पटोलेंचा विरोध
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 4:49 PM

संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी ‘मैंने गांधी को क्यों मारा’ (Why I Killed Gandhi) या चित्रपटात नथुराम गोडसेची (Nathuram Godse) भूमिका साकारली आहे. या चित्रपटावरुन राज्यात पुन्हा एकदा मोठं राजकारण पाहायला मिळतंय. महत्वाची बाब म्हणजे अमोल कोल्हेंनी कलावंत म्हणून गोडसे साकारला असेल तर ते गांधीविरोधक ठरत नाहीत, असा शब्दात शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोल्हेंची पाठराखण केलीय. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या चित्रपटाचा निषेध केलाय. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या चित्रपटाला तीव्र विरोध केला आहे.

महात्मा गांधी हे आपल्या देशाची ओळख आहेत. त्यांची हत्या करण्याला हिरो बनवलं जात असेल तर येणाऱ्या पिढीला काय संदेश देणार? चित्रपट रिलीज झाला तर आम्ही त्याचा निषेध करु, तीव्र विरोध करु, असा इशारा पटोले यांनी दिला आहे. तसंच शरद पवार काय बोलले हा माझा विषय नाही. मात्र, गांधीजींची हत्या करण्याला हिरो बनवले जात असेल तर त्याचा आम्ही निषेध करु, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिलीय. त्याचबरोबर आपण पंतप्रधान मोदींबाबत बोललो नसल्याचं सांगत मी चूक केलेली नाही. संबंधित व्यक्तीचा जबाब पोलिसांनी घेतल्याचं पटोले म्हणाले.

भाजप कधीपासून गांधीवादी झाला? – पवार

भाजपने या चित्रपटावरुन अमोल कोल्हेंवर टीका केली आहे. भाजपच्या या टीकेची राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खिल्ली उडवली आहे. भाजपनेही अमोल कोल्हेंवर टीका केली आहे, याकडे पवारांचं मीडियाने लक्ष वेधलं. त्यावर, भाजप गांधीवादी कधीपासून झाले? भाजप आणि संघाच्या इतिहासावर मी भाष्य करू शकत नाही. एकेकाळी गांधीविरोधात वेगळी भूमिका घेणाऱ्या शक्ती आता नक्की कुठे आहेत हे पाहिलं पाहिजे., असं पवार म्हणाले.

‘म्हणून कलाकार औरंगजेब, रावण ठरत नाही’

गांधी सिनेमातही कुणी तरी गोडसेची भूमिका साकारली होती. पण भूमिका करणारा व्यक्ती कलावंत होता. तो गोडसे नव्हता. कोणत्याही सिनेमात आर्टिस्ट एखादी भूमिका करत असेल तर त्याकडे आर्टिस्ट म्हणून पाहिलं पाहिजे. शिवाजी महाराज आणि औरंगजेब संघर्ष झाला. शिवाजी महाराजांच्या सिनेमात जर कुणी शिवाजी महाराजांची भूमिका घेत असेल आणि कुणी औरंगजेबाची भूमिका करत असेल तर औरंगजेबाची भूमिका करतो म्हणून तो मोगल साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही. तो कलावंत म्हणून भूमिका करत असतो. किंवा रामराज्यातील सिनेमा असेल तर राम रावणाचा संघर्ष असेल रावणाची भूमिका करणारा व्यक्ती रावण असू शकत नाही. तो कलाकार असतो. सीतेचं अपहरण दाखवलं म्हणजे त्या कलाकाराने अपहरण केलं असं होत नाही. रावणाचा तो इतिहास या माध्यमातून दाखवला जातो, असं पवार म्हणाले.

इतर बातम्या :

Why I killed Gandhi : म्हणून मी नथुरामच्या विचारांचं उदात्तीकरण करतो, असं वाटत नाही : खा. अमोल कोल्हे

Latur : शाळा सुरु होणार पण काय असणार नियमावली? राज्य सरकारच्या होकार नंतर जिल्हा प्रशासनाच्या हाती निर्णय

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.