वडिलांच्या निधनानंतर पार्टी बदलली, टोकाचा निर्णय का घेतला?; वाचा निरंजन डावखरेंचं ‘राज’कारण!

निरंजन डावखरे हे भाजपच्या युवा नेत्यांपैकी एक आहेत. घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळालेल्या निरंजन यांचा अल्पावधीतच राष्ट्रवादीचे भाजप असा प्रवास झाला. (Why Niranjan Davkhare quits NCP?, know his politics)

वडिलांच्या निधनानंतर पार्टी बदलली, टोकाचा निर्णय का घेतला?; वाचा निरंजन डावखरेंचं 'राज'कारण!
Niranjan Davkhare
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 7:40 AM

मुंबई: निरंजन डावखरे हे भाजपच्या युवा नेत्यांपैकी एक आहेत. घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळालेल्या निरंजन यांचा अल्पावधीतच राष्ट्रवादीचे भाजप असा प्रवास झाला. सध्या ते भाजपचे आमदार म्हणून सक्रिय आहेत. अत्यंत तरुण असलेल्या या नेत्याच्या राजकीय कारकिर्दीवर टाकलेला हा प्रकाश. (Why Niranjan Davkhare quits NCP?, know his politics)

निरंजन डावखरे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ दिवंगत नेते वसंत डावखरे यांचे चिरंजीव आहेत. पुण्याच्या सिम्बॉयसिस शाळेतून त्यांनी शिक्षण घेतलं. त्यानंतर मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्यांनी 2000मध्ये पदवी घेतली. महाविद्यालयात असतानाच त्यांनी कॉलेजमधील विद्यार्थी चळवळीत भाग घेतला. त्यामुळे 1999मध्ये ते कॉलेजमध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आले. पुढे त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं. चर्चगेट येथील शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं. निरंजन यांना घरातूनच राजकारणाचा वारसा मिळाला. त्या आधी ते सामाजिक कार्यात आघाडीवर होते. समन्वय प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य सुरू होते. राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.

राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड

विद्यार्थी संघटनेतील त्यांच्या कामाची दखल घेऊन निरंजन यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यांसंबंधी घोषणा केली होती. त्याचवेळी युवक काँग्रेसच्या इतर पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या होत्या.

आमदार म्हणून विजयी

राष्ट्रवादीकडून त्यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडून आणलं होतं. पहिल्यांदाच ते विधानपरिषदेत पोहोचले होते. या विजयामुळे निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीत चांगलाच जम बसवला होता. 2012 रोजी ही निवडणूक झाली होती. तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून निरंजन हे 5604 मतांनी विजयी झाले होते. विशेष म्हणजे कोकण पदवीधर मतदारसंघ 20 वर्षे भाजपच्या ताब्यात होता. त्यालाच निरंजन यांनी सुरुंग लावला होता. त्यामुळे ते चर्चेत आले होते.

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

निरंजन यांचे वडील वसंत डावखरे यांचं निधन झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी पालघरमधील जाहीर सभेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीत झालेल्या कोंडीला वैतागून पक्ष सोडत असल्याचं सांगतानाच पक्ष सोडू नये म्हणून राष्ट्रवादीतून दबाव आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. तसेच शरद पवार हे मोठे नेते आहेत. पण मोदींच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा आहे, असं सांगत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

वसंत डावखरे हे पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. वसंत डावखरे यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंधही होते. मात्र जानेवारी 2018मध्ये डावखरे यांचं निधन झालं. त्यामुळे निरंजन हे पक्षात एकटे पडले होते. शिवाय ठाण्यात जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांचे वर्चस्व वाढल्याने तिकीट मिळण्याची शक्यता धुसर वाटू लागल्याने निरंजन यांनी थेट भाजपमध्ये जाणं पसंत केल्याचं सांगण्यात येतं.

सहा वर्षासाठी हकालपट्टी

दरम्यान, निरंजन डावखरे भाजपमध्ये जाणार असल्याची कुणकुण लागताच राष्ट्रवादीनेही पत्रक काढून निरंजन यांची पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी करण्यात येत असल्याचं जाहीर केलं होतं. यावेळी राष्ट्रवादीने निरंजन यांना देण्यात आलेल्या पदांचा पाढाही वाचला होता. तसेच त्यांना संधीसाधूही म्हटलं होतं. (Why Niranjan Davkhare quits NCP?, know his politics)

संबंधित बातम्या:

शिवसेनेच्या गडाला खिंडार ते जन आशीर्वादचे सूत्रधार; कसं आहे संजय केळकर यांचं राजकारण?

‘पाणीवाली बाई’मुळे आयुष्याला टर्निंग पॉईंट मिळाला; वाचा, कशी आहे विद्या चव्हाणांची राजकीय जडणघडण!

प्रशांत ठाकूर; डॅशिंग, कार्यसम्राट आणि घराण्याचा वारसा असलेला राजकारणी!

(Why Niranjan Davkhare quits NCP?, know his politics)

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.