तेव्हा तुमचे खासदार शेपूट घालून का बसले होते, मनसेचा एकाचवेळी ठाकरे-पवारांवर हल्ला, बंदला विरोध!

महाविकास आघाडीने शेतकरी हल्ल्याविरोधात महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी सहभाग नोंदवला आहे. मात्र भाजप आणि मनसेने या बंदला तीव्र विरोध केला आहे.

तेव्हा तुमचे खासदार शेपूट घालून का बसले होते, मनसेचा एकाचवेळी ठाकरे-पवारांवर हल्ला, बंदला विरोध!
sandeep deshpande
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 9:11 AM

मुंबई : महाविकास आघाडीने शेतकरी हल्ल्याविरोधात महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली आहे. या बंदला महाविकास आघाडीतील (maha vikas aghadi) मित्रपक्षांनी सहभाग नोंदवला आहे. मात्र भाजप आणि मनसेने (MNS) या बंदला तीव्र विरोध केला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या बंदवरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. संसदेत शेतकरी कायदा बिल पास होत असताना महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून बसले होते का? शिवसेना खासदारांची थोबाडं बंद का होती ? पवारसाहेब संसदेत अनुपस्थित होते, त्याचे कारण काय? असे सवाल संदीप देशपांडे यांनी केले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

संदीप देशपांडे म्हणाले, “आज लॉकडाऊनमुळे लोकांचे कंबरडे मोडले आहे. सणासुदीच्या दिवसात थोडा-बहुत व्यापार होतो. अशा दिवसांत तुम्ही बंद करता आहात? हा स्टेट स्पॉन्सर्ड बंद आहे. पोलोस लोकांची दुकाने बंद करीत आहेत. ही कुठली पद्धत? मावळमध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला तेव्हा समाजवादी पार्टी आणि मायवतींच्या पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये बंद केला का ?”

लखीमपूरच्या घटनेचा निषेध, पण महाराष्ट्र वेठीस का?

लखीमपूर खिरीमध्ये जी घटना झाली त्याचा निषेध व्यक्त व्हायलाच हवा पण महाराष्ट्राला वेठीस का धरता? लॉकडाऊन उठवण्यासाठी तुम्हाला हफ्तेही द्यायचे आणि बंदही पाळायचा, ही कसली दुटप्पी भूमिका ? अशी प्रश्नांची सरबत्ती संदीप देशपांडे यांनी केली.

लॉकडाऊनमुळे जनता त्रस्त असताना आता बंदची गरज आहे की नाही हे आधी पटवून द्यायला हवे. लोकांनी उस्फूर्त बंद पाळला पाहिजे. महाराष्ट्र सरकारचे पोलीस जर फिरत असतील तर जनतेच्या मनात काय आहे ते दिसतेय आणि आम्ही जनतेबरोबर आहोत. स्टेट स्पोर्न्सर बंद असेल तर तो दिसणार, पण लोकांच्या मनात आहे का ? लोकांना विचारा, तुम्ही पोलीस बळ वापरून बंद करणार असाल तर त्याला काय अर्थ आहे, असं संदीप देशपांडे म्हणाले.

शिवसेनेत ताकद उरली नाही

शिवसेनेत आता ताकद उरली नाही म्हणून पोलीस वापरावे लागत आहेत. पोलीस दुकाने बंद करीत आहेत. अशी परिस्थिती यापूर्वी महाराष्ट्रात कधी दिसली नव्हती, असं संदीप देशपांडेंनी सांगितलं.

भाजपने चुचकारलं की शिवसेनेचा विरोध मावळतो

भाजप आणि मनसेचा बंदला विरोध हा योगायोग नाही. जी गोष्ट बरोबर ती बरोबर, जी चूक ती चूकच. ज्यावेळी भाजप चुकले तेव्हाही राज ठाकरे भाजप विरोधात बोललेले आहेत. हिम्मत असेल तर खासदारांनी संसदेत गोंधळ घालावा. मुख्यमंत्री दिल्लीला जातात. मोदींशी गुलुगुलु गप्पा मारता, मग त्यावेळी एखाद्या घटनेवर का नाही निषेध व्यक्त केला ? एवढ्या विरोधानंतर पालघरची जागा बुलेट ट्रेनसाठी देऊन टाकली. म्हणजे तुमची भूमिका काय आहे. भाजपने थोडा डोक्यावरून हात फिरवला, चुचकारले की शिवसेनेचा विरोध मावळतो. त्यांची भूमिका आहे? महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे. त्यांना मदत पोहोचली आहे का ? असेही प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारले.

VIDEO :

संबंधित बातम्या 

Maharashtra bandh live updates | लासलगाव बाजार समितीतील कांदा-धान्य लिलाव बंद, 25-30 कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प

Maharashtra Bandh | पुण्यातील पीएमपीएल सेवा दुपारी 12 पर्यंत बंद, व्यापारी महासंघाचाही बंदला पाठिंबा

'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.