Akola | शिवसेना आमदार संतोष बांगरला राज्यात फिरू देणार नाही, वंचितचे राजेंद्र पातोडे असं का म्हणाले?
आमदार संतोष बांगर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते आऊट ऑफ रेंज आहेत. त्यामुळं बांगर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. राज्यात काही ठिकाणी आमदार बांगर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे. अकोल्यातही संतोष बांगर यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
अकोला : शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली. त्यांनी गेल्या निवडणुकीत एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला. हिंगोली जिल्ह्यातील शिवसंपर्क अभियानात (Shiv Sampark Abhiyan in Hingoli District) ते बोलत होते. यातून हा वाद सुरू झाला. आता वंचित बहुजन विकास आघाडीनं यावर आक्षेप घेतलाय. शिवसेनेचे नेते तसेच महाविकास आघाडीमधील मंत्र्यांची जेलमध्ये जाण्याची स्पर्धा लागली आहे. त्याची धग आता मुख्यमंत्र्यांचे नातेवाईकापर्यंत पोहोचली आहे. यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी बांगर सारखे जुगारी आमदार बडबड करत असल्याचं वंचित बहुजन युवा आघाडी महासचिव आणि मीडिया पॅनलिस्ट राजेंद्र पातोडे (Media Panelist Rajendra Patode) यांचं म्हणण आहे.
संतोष बांगर यांच्या पुतळ्याचे दहन
या सर्व प्रकरणी आमदार संतोष बांगर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते आऊट ऑफ रेंज आहेत. त्यामुळं बांगर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. राज्यात काही ठिकाणी आमदार बांगर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे. अकोल्यातही संतोष बांगर यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यासाठी वंचितचे राजेंद्र पातोडे यांनी पुढाकार घेतला.
प्रौढ शिक्षण वर्गात पाठविण्याची गरज
वंचित वर बालीश आरोप करणारा शिवसेनेचा पाचवी शिकलेल्या अडाणी अल्पशिक्षित आमदार संतोष बांगर ह्याला प्रौढ शिक्षण वर्गात दाखल करा. त्याला साक्षर करण्याचा निर्धार युवा आघाडीने केला आहे. बौद्ध समाजाची ताकद दाखवून देण्यासाठी कार्यकर्त्यांना आदेश देण्यात आले आहेत. शिवसेनेचा जुगार चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या संतोष बांगर या आमदाराने अकलेचे तारे तोडले. 1 हजार कोटी रुपयांचा हास्यास्पद व बालीश आरोप केला आहे. वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अडाणी बांगरला आधी प्रौढ शिक्षण शाळेत घालावे, असे निर्देश दिले आहेत. जेणेकरून त्याला एक हजारावरील शून्य वाचण्याची अक्कल आली पाहिजे. आणि आमदार बांगर ह्याने दुसरा आरोप बौद्ध समाजावर केला आहे. याचे परिणाम देखील त्याला भोगावे लागतील.