राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सरकार्यवाहची निवड कशी होते?; वाचा सविस्तर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघही जगातील सर्वात मोठी संघटना आहे. (Why the RSS chief executive’s election is important)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सरकार्यवाहची निवड कशी होते?; वाचा सविस्तर
Rashtriya Swayamsevak Sangh
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 1:05 PM

बेंगळुरू: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जगातील सर्वात मोठी संघटना आहे. प्रत्यक्ष राजकारणात भाग न घेणारी देशातील ही सर्वात मोठी संघटना असल्याने या संघटनेबाबतचं कुतुहूल कायम राहिलं आहे. संघात सरसंघचालकानंतर सरकार्यवाह पद सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. या पदाची निवड कशी होते? त्यासाठी कार्य प्रक्रिया पार पडते, यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप… (Why the RSS chief executive’s election is important)

संघाच्या अखिर भारतीय प्रतिनधींची सभा आजपासून बेंगळुरूमध्ये सुरू झाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीसाठीची ही सभा नागपूर ऐवजी बंगळुरूमध्ये होत आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी संघातील दुसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं पद असलेल्या सरकार्यवाह पदाची निवड केली जाणार आहे.

सरकार्यवाहची निवड निवडणुकीनेच

संघात सरसंघचालक हे पद सर्वात महत्त्वाचं आहे. नंबर एकचं हे पद आहे. संघाच्या प्रतिनिधी सभेत सरसंघचालकाची निवड केली जाते. संघाची स्वत:ची कार्यपद्धती आहे. निवडपद्धती आहे. परंतु, नव्या सरसंघचालकाची निवडीचा अंतिम निर्णय विद्यमान सरसंघचालकच घेतात. सरसंघचालकांचा उत्तराधिकारी सरसंघचालकांनीच निवडल्याची आजवर परंपरा राहिली आहे. हीच परंपरा आजवर होत आली आहे. मात्र, सरकार्यवाहाची निवड निवडणुकीद्वारेच होत असते. संघाच्या या निवडणुकीच्या प्रक्रियेत संपूर्ण केंद्रीय कार्यकारिणी, क्षेत्र व प्रांताचे संघचालक, कार्यवाह, प्रचारक आणि संघ प्रतिज्ञेसाठी सक्रिय असलेले स्वयंसेवकांकडून निवडलेले प्रतिनिधी सहभागी होतात.

दर तीन वर्षाने निवड

संघात दर तीन वर्षांनी सरकार्यवाहची निवड होते. संघटनेतील हे कार्यकारी पद आहे. तर सरसंघचालक हे मार्गदर्शकाची भूमिका निभावतात. संघाच्या नियमित कार्यांच्या संचालनाची जबाबदारी सरकार्यवाहांवर असते. म्हणजे हे एकप्रकारे महासचिव पदच असते, मात्र संघात या पदाला सरकार्यवाह म्हटलं जातं. या शिवाय प्रतिनिधी सभेत इतर पदाधिकाऱ्यांचीही निवड केली जाते. सर्व पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. प्रत्येक तीन वर्षानंतर जिल्हा स्तरावरून संघाची निवड प्रक्रिया सुरू होते. सरकार्यवाह आधी जिल्हा आणि महानगर संघचालकाची निवड करतात. त्यानंतर विभाग संचालक आणि प्रांत संघचालकांची निवड केली जाते. निवडणुकीनंतर सर्व अधिकारी आपल्या नव्या टीमची घोषणा करतात. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अखिल भारतीय स्तरावर प्रतिनिधी सभेच्या बैठकीत सरकार्यवाहची निवड होते. त्याच बैठकीत क्षेत्र संघचालकाचीही निवड केली जाते.

प्रतिनिधी सभेत शेवटच्या दिवशी निवड

संघ प्रतिनिधी सभेच्या बैठकीत शेवटच्या दिवशी सरकार्यवाहची निवडणूक होते. सरकार्यवाह आपल्या तीन वर्षाच्या कार्याकाळाचा पूर्ण लेखाजोखा सभेसमोर मांडतात. त्यानंतर तुम्हाला हव्या असलेल्या व्यक्तीची या पदासाठी निवड करा, असं ते सांगतात. त्यानंतर ते मंचावरून खाली उतरून प्रतिनिधींमध्ये जाऊन बसतात. मंचावर केवळ सरसंघचालकच असतात. त्यानंतर संघाचे सर्वात वरिष्ठ सह सरकार्यवाहच्या निवडणुकीची निवडणूक अधिकारी घोषणा करतात. निवडणुकीची घोषणा झाल्याने सरकार्यवाह पदासाठी नावे मागितली जातात. केंद्रीय प्रतिनिधी या निवडणुकीत मतदार असतात. एकही प्रचारक हा मतदार नसतो. संघातील एक व्यक्ती सरकार्यवाहपदासाठी नाव पुकारतो आणि दुसरा व्यक्ती त्याला अनुमोदन देतो. अशा वेळी कुणाला या पदासाठी आपलं नाव द्यायचं असेल तर तो 3 ते 4 अनुमोदकांसह आपल्या नावाचा प्रस्ताव देवू शकतो.

सरसंघचालकांच्या शेजारी बसण्याचा मान

या पदासाठी कोणी इच्छूक आहेत का? असं निवडणूक अधिकारी विचारतात. कुणाचंच नाव न आल्यास सर्वसंमतीने सरकार्यवाहकाच्या नावाची घोषणा केली जाते. त्यानंतर नव्या सरकार्यवाहकाला सन्मानाने मंचावर नेले जाते आणि सरसंघचालकांच्या शेजारी बसवले जाते. त्यानंतर सरकार्यवाह आपल्या टीममधील नावांची घोषणा करतात. त्यानंतर पुन्हा बैठक होते आणि आगामी कार्ययोजनेवर चर्चा केली जाते. संघाच्या इतिहासात आतापर्यंत सर्वसंमतीने सरकार्यावाह नियुक्त करण्यात आलेला आहे. (Why the RSS chief executive’s election is important)

संघाचे आतापर्यंतचे सरकार्यवाह

गोळवलकर गुरुजी संघात आधी सरकार्यवाह होते. नंतर ते सरसंघचालकही झाले. भैयाजी दानी, एकनाथ रानडे, माधवराव मुळे, बाळासाहेब देवरस, रज्जू भैय्या, हो. वे. शेषाद्री, मोहन भागवत भैय्याजी जोशी आदींनी सरकार्यवाह म्हणून काम पाहिलं आहे. सध्या भैय्याजी जोशी हे सरकार्यवाह आहेत. त्यातील अनेक सरकार्यवाह पुढे सरसंघचालकही झाले. (Why the RSS chief executive’s election is important)

संबंधित बातम्या:

सर्वसामान्यांची बत्ती गुल, ऊर्जामंत्र्यांची पॉवर फुल, नितीन राऊतांच्या घरातील झगमगटावर भाजप आक्रमक

‘UPA चं पुनर्गठन करा, सोनियांच्या जागी शरद पवार यांना अध्यक्षपदी बसवा’, संजय राऊतांचं मोठं विधान

शिवसेनेचा सर्जिकल स्ट्राईक यशस्वी; जळगावात भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा महापौर

(Why the RSS chief executive’s election is important)

पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.