Uddhav Thackeray : आमदार तर आमदार आता खासदारही भाजपच्या बाजूने; उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाशी जुळवून घेणं का गरजेचं आहे?

Uddhav Thackeray : बंडखोरी केल्यानंतर बंडखोर आमदारांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. आम्ही सत्तेसाठी भाजपसोबत गेलो नाही. भाजप हा आपला नैसर्गिक मित्रं आहे.

Uddhav Thackeray : आमदार तर आमदार आता खासदारही भाजपच्या बाजूने; उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाशी जुळवून घेणं का गरजेचं आहे?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 1:11 PM

मुंबई: संकटं येतात तर ती एकटी येत नाहीत. चोहोबाजूने येतात. त्यामुळे मोठा फटका तर बसतोच, पण त्या संकटातून सावरणं कठिण होत असतं. संकटाचा काळ हा खऱ्या अर्थाने कसोटीचा काळ असतो. या काळात तुम्ही कसे उभे राहता आणि अशा काळात कसे निर्णय घेता यावर सर्व काही अवलंबून असतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याबाबतही असंच काहीसं घडताना दिसत आहे. 40 आमदारांनी बंड करून भाजपसोबत (bjp) हातमिळवणी केली. या बंडखोर आमदारांसोबत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यही गेले आहेत. एवढ्या मोठ्या बंडानंतर शिवसेनेला (shivsena) मोठा हादरा बसला. त्यामुळे राज्यातील सत्ता गेली. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आता तर शिवसेनेवरच बंडखोरांनी दावा सांगितल्याने शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे थोडं होतं की काय आता खासदारांनीही भाजपशी जुळवून घेण्याची हाकाटी पक्षप्रमुखांकडे लावली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचं आवाहनच खासदारांनी केलं आहे. त्यामुळे शिवसेनेला आता भाजपशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. शिवसेनेने भाजपशी जुळवून घेणं कसं गरजेचं आहे, यावरही आता चर्चा सुरू झाली आहे.

दुसरा भूकंप नको म्हणून

बंडखोरी केल्यानंतर बंडखोर आमदारांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. आम्ही सत्तेसाठी भाजपसोबत गेलो नाही. भाजप हा आपला नैसर्गिक मित्रं आहे. त्यामुळे त्यांच्याशी युती झाली पाहिजे. आघाडीसोबत युती हे आम्हाला पटलेलं नाही, असं या आमदारांनी सांगितलं. तेच आता खासदारही म्हणताना दिसत आहेत. त्यांनाही भाजपसोबत युती हवी आहे. त्यामुळेच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देऊन एक पाऊल पुढे टाकण्याचं आवाहन शिवसेना खासदारांनी केलं आहे. त्यामुळे पक्षात दुसरा भूकंप होऊ नये म्हणून ठाकरे यांना भाजपशी जुळवून घेणं आवश्यक झालं आहे. नाही तर आमदार तर गेलेच पण आता हातातून खासदारही निसटण्याची चिन्हे आहेत.

हे सुद्धा वाचा

पक्षाची मान्यता वाचवण्यासाठी

शिंदे गटाच्या बंडखोरांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेला अनेक शह दिले आहेत. शिंदे गटाला गटनेतेपद मिळालं आहे. तसेच शिंदे गटाच्या पक्षप्रतोदपदालाच मान्यता मिळाली आहे. आता शिंदे गटाकडून आपणच खरी शिवसेना असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी आता शिंदे गटाकडून पक्षाच्या चिन्हावर दावा करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे पक्षाची मान्यता टिकवण्यासाठी आणि शिवसेनेचं नेतृत्व ठाकरे घराण्याकडेच असल्याचं दाखवण्यासाठीही शिवसेनेला भाजप सोबत जुळवून घ्यावं लागणार आहे. भाजपशी जुळवून घेतल्यास खासदार शिवसेनेतच राहतील. शिवाय बंडखोर आमदारही शिवसेनेत येतील. त्यामुळे पक्ष वाचेल आणि सत्ताही मिळेल.

खासदार सोबत ठेवणं गरजेचं

40 आमदार पक्षाला सोडून गेले आहेत. विधानसभा निवडणुकांना अजून अडीच वर्षावर आहेत. अडीच वर्ष हा मोठा काळ आहे. या काळात पक्ष वाढवणे हे सर्वात मोठं आव्हान शिवसेनेसमोर आहे. त्यामुळे खासदारांनी बंड करू नये म्हणून शिवसेनेला भाजपशी जुळवून घेणं महत्त्वाचं आहे.

मतदारांवर पकड ठेवण्यासाठी

40 आमदार सोडून गेल्यानंतर त्या मतदारसंघातील खासदार आपल्यासोबत ठेवणं शिवसेनेला अत्यंत महत्त्वाचं आहे. हे खासदार सोबत राहिल्यास बंडखोर आमदारांच्या मतदारसंघावर शिवसेनेला वर्चस्व ठेवता येणार आहे. शिवाय महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर अंकूश ठेवता येणार आहे. पण खासदारच जर भाजपसोबत गेल्यास अडचण होऊ शकते. त्यामुळे भाजपसोबत जुळवून घेणं अगत्याचं झालं आहे.

पक्षाचा लोकशाहीवर विश्वास असल्याचं दाखवण्यासाठी

40 आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत लोकशाही असल्याचं उद्धव ठाकरे यांना दाखवावं लागणार आहे. पक्ष चार दोन लोकांच्या भरवश्यावर चालत असल्याचा आरोप बंडखोरांनी केला आहे. त्याला छेद देण्यासाठी शिवसेनेला निर्णय घ्यावा लागणार आहे. खासदारांचं ऐकून भाजपशी जुळवून घेतल्यास शिवसेना हा लोकशाहीने चालणारा पक्ष असल्याचं उद्धव ठाकरे यांना बिंबवता येणार आहे. पक्षात आपलं ऐकलं जातं आणि त्यावर अंमलबजावणीही केली जाते, असा विश्वास शिवसैनिकांमध्ये निर्माण करण्यासाठीही भाजपशी जुळवून घ्याव लागणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.