Congress In Rajya Sabha: काँग्रेसचं राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदही धोक्यात?; काय आहे नेमकं गणित?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या कारभाराची सूत्रे हाती घेतल्यापासून काँग्रेसचा ग्राफ सातत्याने घसरताना दिसतो आहे. आता तर पाच राज्यातील निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसल्याने काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.

Congress In Rajya Sabha: काँग्रेसचं राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदही धोक्यात?; काय आहे नेमकं गणित?
काँग्रेसचं राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदही धोक्यात?; काय आहे नेमकं गणित?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 5:58 PM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी देशाच्या कारभाराची सूत्रे हाती घेतल्यापासून काँग्रेसचा ग्राफ सातत्याने घसरताना दिसतो आहे. आता तर पाच राज्यातील निवडणुकांमध्ये काँग्रेसला (congress) मोठा फटका बसल्याने काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. विरोधी पक्षनेते पद आपल्याकडे ठेवू शकेल एवढं संख्याबळही काँग्रेसकडे लोकसभेत नाही. येणाऱ्या काळात तर काँग्रेसला अजून धक्के बसण्याची शक्यता आहे. 2022मध्ये वेगवेगळ्या कालावधीत राज्यसभेच्या 75 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात काँग्रेसला मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. या निवडणुकानंतर काँग्रेसला लोकसभेनंतर (loksabha) राज्यसभेतही विरोधी पक्षनेतेपद गमवावं लागू शकतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसं झाल्यास काँग्रेससाठी हा सर्वात मोठा झटका असू शकतो, असं सूत्रांचं म्हणणं आहे.

राज्यसभेत ज्या पक्षाकडे 10 टक्के जागा आहेत, त्या पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद असतं. गेल्या दोन निवडणुकीत काँग्रेसकडे एवढं संख्याबळ होऊ शकलं नाही. यावर्षाच्या अखेरीपर्यंत देशात राज्यसभेच्या 75 जागांवर निवडणुका होणार आहेत. काँग्रेसकडे सध्या 34 सदस्य आहेत. या निवडणुकानंतर काँग्रेसची संख्या कमी होऊन 25च्या खाली आल्यास काँग्रेसचं विरोधी पक्षनेतेपद जाईल.

असं आहे गणित

राज्यसभेत एकूण 250 सदस्य असतात. यातील 238 सदस्य निवडून येतात. तर 12 सदस्य राष्टपती नियुक्त असतात. राज्यांचे आमदार राज्यसभा सदस्यांची निवड करतात. त्यामुळे नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकांचा या निवडीवर परिणाम होणं स्वाभाविक आहे.

पुढील निवडणुका काय सांगतात?

पाच राज्यांतील निवडणुकीनंतर आता राज्यसभेच्या 13 जागांसाठी येत्या 31 मार्च रोजी निवडणुका होणार आहेत. या 13 जगांपैकी 5 जागा पंजाबमधील आहेत. पंजाबमध्ये आपचे वर्चस्व असल्याने या पाचही जागांवर आपचेच उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. उरलेल्या 8 जागांपैकी आसाममध्ये दोन, केरळातील तीन, हिमाचल प्रदेश, नागालँड आणि त्रिपुरातील प्रत्येकी एका जागेचा सामावेश आहे. या 13 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 5 एप्रिल रोजी संपत आहे. तर वर्षअखेरीपर्यंत उत्तर प्रदेशातील 11, बिहारच्या पाच, राजस्थानच्या चार, मध्यप्रदेशातील तीन आणि उत्तराखंडच्या एका जागेसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे. त्याशिवाय ओडिशा, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगना आणि आंध्रप्रदेशातील जागांवर निवडणुका होणार आहे.

भाजप बहुमताकडे

नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकांबाबत काँग्रेसला मोठी आशा होती. या निवडणुकांद्वारे पुन्हा कमबॅक करू असा विश्वास काँग्रेसला होता. मात्र, पाच राज्यांपैकी सत्ता नसलेल्या चार राज्यात काँग्रेसची कामगिरी खराब झालीच शिवाय सत्ता असलेलं पंजाब राज्यही काँग्रेसच्या हातचं निघून गेलं. काँग्रेसला पंजाबमध्ये 117 पैकी केवळ 18 जागा मिळाल्या. तर आपला 92 जागांवर विजय मिळाला. सध्या राज्यसभेत भाजपची सदस्य संख्या 97 आहे. या वर्षअखेरीपर्यंत भाजपची ही संख्या वाढून 104 होण्याची शक्यता आहे. तर एनडीएची सदस्य संख्या वाढून 122 होणार आहे. त्यामुळे भाजप राज्यसभेत बहुमतात येणार आहे.

संबंधित बातम्या:

AAP Punjab RS Nominations: कोण आहेत संदीप पाठक ज्यांना आपचे ‘अमित शाह’ म्हटलं जातं, ज्यांना केजरीवालांनी राज्यसभेवर पाठवलं?

Punjab: आपकडून राज्यसभेसाठी कुलगुरू अशोक मित्तल आणि हरभजन सिंग, आज अर्ज भरणार

जगातील सर्वात लोकप्रिय नेता म्हणून पंतप्रधान मोदींची निवड; बिडेन यांच्या मागे शुक्लकाष्ठ!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.