कोरोनाची लस सर्वांना मिळेल?, लस मोफत असेल?, लसीकरणाबाबत पंतप्रधानांची नेमकी भूमिका काय?; राहुल गांधींचे तीन सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावरील लसीकरणाबाबतची त्यांची नेमकी भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सर्व भारतीयांच्या कोरोनावरील लसीकरणाबाबत (Vaccination) भाजप आणि केंद्र सरकारला तीन सवाल केले आहेत. तसेच सरकार लसीकरणाबाबत वारंवार आपली भूमिका बदलत असल्याचा आरोप करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनावरील लसीकरणाबाबतची त्यांची नेमकी भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही राहुल गांधी यांनी केले आहे. (Will everyone get the corona vaccine? Will the vaccine be free? What is the role of the Prime Minister regarding vaccination? Rahul Gandhi’s questions)
राहुल गांधी यांनी गुरुवारी एक ट्विट केलं. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदी म्हणतात सर्वांना लस मिळेल. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने घोषणा केली होती की, सर्वांना मोफत लस दिली जाईल. आता यांच्या सरकारमधील लोक म्हणतात की, आम्ही कधीच म्हणालो नाही की आम्ही सर्वांना मोफत लस देणार आहोत. त्यामुळे या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची नेमकी भूमिका काय आहे? ती त्यांनी स्पष्ट करावी. कोरोनाची लस सर्वांना मिळेल का?, ती लस नागरिकांसाठी मोफत असणार का? आणि लसीकरणाबाबत पंतप्रधानांची नेमकी भूमिका काय? असे तीन सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण बुधवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले होते की, सरकार असं कधीही म्हणालं नाही की, सर्वांना कोरोनावरील लस दिली जाईल. यावरुन आता राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. भूषण बुधवारी पत्रकार परिषदेत म्हणाले होते की, मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की, देशातील सर्व नागरिकांना कोरोनावरील लस टोचली जाईल.
PM- Everyone will get vaccine.
BJP in Bihar elections- Everyone in Bihar will get free vaccine.
Now, GOI- Never said everyone will get vaccine.
Exactly what does the PM stand by?
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 3, 2020
कोरोनावरील लसीबाबत राहुल गांधींचे सरकारला तीन सवाल
1. कोरोनावरील अनेक लसी उपलब्ध होणार आहेत, भारत सरकार त्यापैकी कोणत्या लसीची निवड करणार? आणि का? 2. कोरोनावरील लस सर्वात प्रथम कोणासाठी उपलब्ध करुन दिली जाईल? लसीच्या वितरणासाठी सरकारची योजना तयारी केली आहे का? केली असेल तर ती योजना काय? 3. लस मोफत उपलब्ध व्हावी, यासाठी पीएम केअर फंडाचा वापर केला जाणार का?
प्रत्येक बिहारीला मोफत करोना लस टोचणार; भाजपची घोषणा
बिहार विधानभा निवडणुकासाठी (Bihar Assembly Election 2020) भारतीय जनता पक्षाने (BJP) 22 ऑक्टोबर रोजी त्यांचा निवडणुकीचा जाहीरनामा (Election Manifesto) प्रसिद्ध केला होता. पुढील पाच वर्षांसाठी ‘आत्मनिर्भर बिहार’चा रोडमॅप प्रसिद्ध करत अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी करोना लसीबाबत बिहारी जनतेला मोठे आश्वासन दिले होते. करोना लसीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला ही लस मोफत टोचली जाईल, असे सीतारामन म्हणाल्या होत्या. हे आमच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील महिले वचन असून कोव्हिड-19 च्या लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू होताच बिहार मधील प्रत्येक व्यक्तीचे मोफत लसीकरण केले जाईल, असे त्या म्हणाल्या होत्या.
संबंधित बातम्या
जानेवारी अखेरपर्यंत अॅस्ट्राझेनेकाच्या कोरोनावरील लसीच्या चाचणीचे निकाल येणार
फायझर-बायोएनटेक कोरोना लसीला मंजुरी देणारा पहिला देश ठरला UK! पुढील आठवड्यापासून वितरण सुरु
(Will everyone get the corona vaccine? Will the vaccine be free? What is the role of the Prime Minister regarding vaccination? Rahul Gandhi’s questions)