Ramdas Kadam: भगव्याची साथ सोडणार का? महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे संकेत? काय म्हणाले रामदास कदम?

रत्नागिरी शिवसेनेतील खदखद बोलून दाखवल्यानंतर अस्वस्थ रामदास कदम शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देणार का, असे प्रश्न विचारला जातोय. असे झाले तर महाराष्ट्राच्या राजकारणात हा मोठा भूकंप ठरू शकतो. त्यांच्या पुढील निर्णयाविषयी रामदास कदम यांनीच उत्तर दिले...

Ramdas Kadam: भगव्याची साथ सोडणार का? महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे संकेत? काय म्हणाले रामदास कदम?
शिवसेना नेते रामदास कदम
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 12:56 PM

मुंबईः गेल्या कित्येक दिवसांपासून अनिल परब (Anil Parab) आणि रामदास कदम(Ramdas Kadam) यांच्यातील वाद विकोपाला गेले असून आज रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या मनातील अस्वस्थता बोलून दाखवली. शिवसेनेशी कोण निष्ठावंत आहे आणि कोण गद्दारी करतंय, हे एकदा शिवसेनाप्रमुखांना (Shiv Sena) कळालंच पाहिजे, असा थेट इशारा त्यांनी दिला. गेल्या कित्येक दिवसांपासून माझ्या मुलाला आणि समर्थकांना सतत डावललं जातंय, यासाठी राष्ट्रवादीची मदत घेतली जातेय असा आरोप रामदास कदम यांनी केला. या सर्व अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर तुम्ही शिवसेना सोडणार का, या प्रश्नावर रामदास कदम यांनी स्पष्ट उत्तर दिलं. ते म्हणाले मी अजून त्याबाबत निर्णय घेतलेला नाही. मी आधी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेईन आणि त्यानंतरच निर्णय घेईन.

शिवसेना सोडणार का, काय म्हणाले कदम?

पुढे कोणता निर्णय घेणार या प्रश्नावर रामदास कदम म्हणाले, ‘ पुढे काय करायचं त्याचा निर्णय घेणार. माझी मुलं आणि समर्थकांसोबत चर्चा करू. लवकरच पत्रकार परिषद घेऊ. अन्याय सहन करण्याला मर्यादा असतात. नगर परिषदेच्या निवडणुकाचा निकाल लागल्यावर निर्णय घेईन. पण उद्धव साहेबांना हात जोडून विनंती आहे. तुम्ही लक्ष घाला. अनिल परबच्या डोक्यात मस्ती गेलीय. हवा गेली. त्याचे पाय जमिनीवर नाही. मी त्याला पत्रात हरामखोर म्हटलं. या हरामखोराला आवरा. नगर परिषदेच्या निवडणुकीत आम्ही गद्दारी करणार नाही.

मी भाजपात जाण्याच्या अफवा यांनीच पसरवल्या

शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले, मी भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या. पैसे देऊन वृत्तपत्रांतून त्या छापून आणल्या. त्या कुणी छापून आणल्या, कुणाचा त्यात स्वार्थ आहे, मला माहिती आहे. पण मी शिवसेनेची साथ कधीही सोडणार नाही.

मरेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही- कदम

रामदास कदम म्हणाले, ‘ मी शिवसेनेतून कदापी बाहेर पडणार नाही. मरेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही. माझ्या मुलाच्या भवितव्याची चिंता आहे. ते निर्णय घ्यायला सक्षम आहे. माझ्या मुलांचं करिअर आता सुरू झालं आहे. त्यावरच घाव घातला जात आहे. पक्षातून काढलं तरी शिवसैनिक म्हणून जगेन. अनिल परब हेच जणू काही पक्षप्रमुख आहेत. त्यांच्याविरोधात बोललो तर पक्षाच्या विरोधात बोललो असंच आहे. आता पुढील निर्णय़ काय होईल, याबाबत एक महिन्याच्या आत येऊन तुमच्याशी संवाद साधेल, असे रामदास कदम म्हणाले.

इतर बातम्या-

Ramdas Kadam: अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्हा वाऱ्यावर सोडला, त्याना तालुका प्रमुखही माहीत नाही; रामदास कदम यांचा थेट हल्ला

Chhatrapati| केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेत दोषींवर कारवाई करावी; युवराज संभाजीराजे छत्रपती, भुजबळांची मागणी

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.