Loksabha Election 2024 | आज एक मोठा नेता महाविकास आघाडीला झटका देणार का? बिघडू शकतो खेळ

Loksabha Election 2024 | आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठी जागा वाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. महाविकास आघाडीमध्ये मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. बैठकांच सत्र पार पडतय. पण आज होणारी बैठक महत्त्वाची आहे. या बैठकीकडे एका नेत्याने पाठ फिरवल्यास गणित बिघडू शकतं.

Loksabha Election 2024 | आज एक मोठा नेता महाविकास आघाडीला झटका देणार का? बिघडू शकतो खेळ
Follow us
| Updated on: Mar 06, 2024 | 8:48 AM

Loksabha Election 2024 | आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होऊ शकतात. देशातील सर्वच पक्ष युती-आघाडी करुन राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करत आहेत. प्रमुख सामना हा NDA विरुद्ध INDIA आघाडीमध्ये होणार आहे. सध्या सर्वच पक्षांच पहिल प्राधान्य उमेदवार निश्चित करण्याला आहे. भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करुन आघाडी घेतली आहे. भाजपाने महाराष्ट्रातून अजून एकही उमेदवारी जाहीर केलेली नाही. कारण शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपचा तिढा अजून सुटलेला नाही. संपूर्ण देशाची तुलना करता महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीच वेगळी आहे. कारण मागच्या दोन वर्षात महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष फुटले. यात एक गट सत्ताधारी आघाडीत आणि दुसरा गट विरोधी पक्षामध्ये आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा कौल कोणाला असणार? यावरुन भविष्यातील राजकारणाच चित्र स्पष्ट होणार आहे.

जागावाटप निश्चित करण्यासंदर्भात महाविकास आघाडीची आज दुपारी एक महत्त्वाची बैठक होणार आहे. महाविकास आघाडीत कोण कुठल्या जागेवरुन लढणार? हे जवळपास निश्चित झालं आहे. पण प्रकाश आंबेडकर या बैठकीला येणार का? हा मुद्दा आहे. महाविकास आघाडीत आतापर्यंत ज्या बैठका झाल्या त्यात प्रकाश आंबेडकर समाधानी दिसलेले नाहीत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची महाराष्ट्रात एक वेगळी ताकद आहे. उमेदवार निवडणूक ते आणू शकत नसले, तरी उमेदवार पाडण्याची त्यांची ताकद आहे. त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला मिळणारी मत निर्णायक ठरु शकतात. त्यामुळे महाविकास आघाडीला प्रकाश आंबडेकर सोबत हवे आहेत. पण अलीकडच्या काही दिवसातील त्यांची वक्तव्य पाहता हे मनोमिनिल होईल का? हा मुद्दा आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आजच्या बैठकीला जाणार का? याकडे सगळ्यांच लक्ष असेल.

मविआत कोण किती जागांवर लढणार?

महाविकास आघाडीत वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. वंचितला 27 जागा सोडाव्यात असा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीकडे दिला होता, पण शरद पवार यांनी वंचित ला 5 ते 6 जागा देऊ शकतो असे सूतोवाच केले होते. उद्धव ठाकरे यांनी रात्री शरद पवार यांची सिल्वर ओक वर भेट घेऊन 23 जागांचा प्रस्ताव दिला आहे, तर काल काँग्रेसने टिळक भवन येथे बैठक घेऊन 22 जागा संदर्भात चर्चा करून, 19 लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक ही घेतली आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.