‘बेवड्यांना समर्पित सरकार’, मुनगंटीवारांचा हल्लाबोल; तर ‘सरकारला शेतकऱ्यांची नाही, बेवड्यांची काळजी’ दरेकरांचाही घणाघात
वीज स्वस्त असण्याचं कारण नाही, घरात वीज अंधार असला तरी चालेल. यातून शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही, उलट वाईन उद्योजकांनाच त्याचा फायदा होणार आहे. वाईन उद्योजक जे आहेत मी नाव घेणार नाही पण एका कंपनीचे बटिक आहेत. त्या कंपनीचं मी नाव घेणार नाही, पण त्या कंपनीची पोहोच एवढी आहे मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ती कंपनी स्वत:ला साजेसे निर्णय घेऊ शकते, असा गौप्यस्फोट मुनगंटीवार यांनी केला आहे.
मुंबई : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (Wine Sale) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पित असल्याची घणाघाती टीका सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केलीय. तर ठाकरे सरकारला (Thackeray Government) शेतकऱ्यांची नाही तर बेवड्यांची काळजी असल्याचा घणाघात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केलाय.
माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. ‘मस्त पियो, खुब जियो हा या सरकारचा मंत्र आहे. हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पित आहे. कोरोनात सर्वसामान्यांना औषधांची गरज आहे. पण आम्ही दवा नही दाऊ देंगे, असं हे सरकार आहे. कष्टकऱ्यांबाबत निर्णय घेण्यासाठी या सरकारला वेळ नाही. राजकारण करणे आणि दारुवाल्यांना प्रोत्साहन देणे. चंद्रपूरची दारुबंदी हटवली. वाईन प्रोत्साहन योजनेत 4 वर्षे आम्ही पैसे दिले नव्हते. ते पैसे यांनी कोरोनाच्या संकटकाळात आर्थिक तणावातही दिले. यांनी दारुवर जो 300 टक्के कर होता तर दीडशे टक्क्यांवर आणला. वीज स्वस्त असण्याचं कारण नाही, घरात वीज अंधार असला तरी चालेल. यातून शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही, उलट वाईन उद्योजकांनाच त्याचा फायदा होणार आहे. वाईन उद्योजक जे आहेत मी नाव घेणार नाही पण एका कंपनीचे बटिक आहेत. त्या कंपनीचं मी नाव घेणार नाही, पण त्या कंपनीची पोहोच एवढी आहे मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ती कंपनी स्वत:ला साजेसे निर्णय घेऊ शकते’, असा गौप्यस्फोट मुनगंटीवार यांनी केला आहे.
‘महाराष्ट्र आणि अन्य राज्यांची तुलना कशी होईल?’
‘महाराष्ट्राची तुलना अन्य राज्यांशी करु नका. गोव्यात निराधारांना 2 हजार रुपये अनुदान दिलं जातं. ते तुम्ही देणार आहात का? दुसऱ्या राज्याची उदाहरणं देऊन स्वत:च्या डोक्याला जंग चढला बुद्धीला हे दाखवण्याची गरज काय. महाराष्ट्रात जेव्हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र म्हणतो. मग तुम्ही विरोधकांची तोंड बंद करण्यासाठी गोव्याचं उदाहरण देणार का?’ असा सवालही मुनगंटीवार यांनी विचारलाय.
यांना शेतकऱ्यांची नाही तर दारुड्यांची काळजी- दरेकर
तर भरकटलेल्या सरकारला भरकटलेला निर्णय. सरकारला शेतकऱ्यांची नाही तर दारुड्यांची काळजी आहे. उद्याजी पिढी बर्बाद होईल, याचं या सरकारला काहीही देणंघेणं नाही. बेवड्यांना समर्पित असं हे सरकार आहे. यांना मंदिराची, शिक्षण किंवा शिक्षकांची काळजी नाही. पण दारु विक्रेत्यांची काळजी हे सरकार घेत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलीय.
राज्य सरकारचा निर्णय काय?
राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. दहा वर्षांपूर्वीचा हा प्रस्ताव आहे. त्यामुळे आज निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालत असल्याने आज हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना त्याबाबतची माहिती दिली. महाराष्ट्रात बऱ्याच वायनरी आहेत. त्यामुळे आता सरकारने नवीन पॉलिसी ठरवली आहे. सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
इतर बातम्या :